Sep 2022

Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin 5th September 2022

प्रेसिडेंट डॉ मृणाल नेर्लेकरचे मनोगत

Rotary Designated Month

सप्टेंबर महिना हा आपल्या रोटरीचा लिटरसी महिना आहे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे आणि 8 सप्टेंबर हा वर्ल्ड लिटरसी डे

Programs done in August

1. Breaking the News
2. फोटोग्राफीचे फ़ंडे – annet ओजस गाडगीळ
3. पं. शौनक अभिषेकी- मानद सदस्य

Projects done in August

1. Baby warmer distribution
2. International SERVICE and PEACE

Beyond Boundaries

RC of Mumbai Parleshwar’s herculean work in Pandemic- “Positive Impact to negative covid 19 impact”

Our Participation In District

 1. Club Administration Seminar Ayojan
 2. District membership awards – Indradhanu

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

संगीतानुभव

काही गाणी त्यातील शब्द, सूर, संगीत किंवा लय – ह्यामुळे आपल्या मानाचं ठाव घेतात. एक वेगळीच अनुभूती देतात. पाहू या … ह्या सदरातून

भाषा भगिनी

ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity, Equity, and Inclusion” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे. त्यावर आधारित “Diversity and Inclusion- अर्थात भाषा भगिनी ” हे दृकश्राव्य सदर …

होम मेकर्स आणि बरंच काही!

नेहा पाठक

ही हकीकत आहे आपल्या नेहाची. नेहा पाठकची.  नेहा पूर्वाश्रमीची वैशाली मुळे.  ती मूळची मुंबईची.  घरात एक धाकटा भाऊ आणि आई-वडील अशा सधन चौकोनी कुटुंबातली. तिचं लहानपण खूप मजेत, लाडाकोडात गेलं.  एवढंच नाही तर तिचं “लक” असं की थोर वाटणाऱ्या अशा काही लोकांकडून तिला विविध विषयातलं मार्गदर्शनही लाभलं. ख्यातनाम “मार्गारेट विल्सन” यांनी काढलेल्या “सेंट कोलंबा”  शाळेत ती शिकली आणि मग हिंदुजा कॉलेजमधून तिने बी.  कॉम. ची पदवी मिळवली. कॉमर्सची पदवीधर म्हणजे नोकरी मिळायला भरपूर वाव.  पण तिला नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती. तिनं नोकरी करायची नाही असं पक्क ठरवलंच  होतं. एवढंच नाही तर लग्नासाठी नवराही नोकरी करण्याची अट न घालणाराच हवाअसं तिने आई-वडिलांना स्वच्छ सांगितलंही होतं.  या गोष्टीला तिच्या आई-वडिलांनी विरोध केला नाही.  मात्र आई स्वतः खूप उद्योगी असल्याने लहानपणापासूनच तिने नेहाला काही ना काही शिकण्यात ,करण्यात व्यस्त राहण्याची सवय लावली होती . अर्थात नेहाला ही गाणं, ड्रॉईंग ,पेंटिंग इत्यादी गोष्टींची खूप आवड होती. त्यामुळे वयाच्या नऊ-दहा वर्षांपासूनच ती गाणं शिकत होती.  तेही मुंबईतल्या प्रसिद्ध व्ही . आर . देवधर स्कूलमध्ये . हे देवधर म्हणजे कुमार गंधर्वांचे गुरु आणि विष्णू दिगंबरांचे (पलुस्कर) शिष्य ! त्यामुळे नेहाला देवधर सरांच्या वाढदिवसाला कुमार गंधर्वांचे गाणे ऐकण्याची संधी बरेच वेळा मिळाली . नेहानेही गाणं शिकण्यात सातत्य ठेवलं.  त्यामुळे लग्न ठरेपर्यंत तिने गाण्यातील “विशारद” पदवीही मिळवलेली होती

नेहाच्या शाळेत शिवणकाम, भरतकाम ,ड्रॉइंग शिकवत.  तसेच “बागकाम” ही नियमितपणे शिकवले जाई.  तेही नेहाला खूप आवडे. किंबहुना त्यामुळे तिला लहानपणापासूनच बागकामची आवड निर्माण झाली. नेहाचं ड्रॉइंग चांगलं होतं.  पण तिला पेंटिंगची जास्त आवड होती . त्यामुळे पेंटिंग शिकायला ती गेली ते थेट प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडे. त्यावेळेला तिने साड्या, बेडशीट्स ,ओढण्या, दारांचे मोठमोठे पडदे अशा बऱ्याच गोष्टी पेंट केल्या.

नेहा म्हणाली,” आमची कॉलनी मोठी होती.  तिथे गणपतीत , दिवाळीत कार्यक्रम केले जात . लीलाताई भागवत आमच्या कॉलनीतच राहत.  त्या वेळोवेळी कार्यक्रम बसवत.”  त्यात नेहा भाग घेत असे.  त्या काळात लीलाताई भागवत मुंबई रेडिओवरच्या “वनिता मंडळ”  या महिलांसाठीच्या कार्यक्रमाच्या संचालिका होत्या.  त्यावेळी त्या खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत्या. त्यावेळी संगीत “शारदा”  नाटकात नेहाने गाणाऱ्या “वल्लरी”ची भूमिका साकारली होती. तसच संगीत शाकुंतल नाटकाच्या गाण्यांना प्ले बॅक दिला होता. असंच त्या काळात प्रसिद्ध असलेल्या सिंधु डोक्रस यांच्याकडे नेहाने “पर्सनल चार्म” हा चार महिन्यांचा मेकअप वगैरे बाबतचा कोर्सही केला होता.

बी. कॉम.  ची पदवी घेतल्यानंतर लगेचच नेहाचं लग्न ठरलं आणि लग्न करून ती पुण्यात आली. घरात प्रमोद , ती आणि सासू-सासरे अशी इन मिन चार माणसं.  सासू-सासरे दोघेही ऍक्टिव्ह आणि खूप प्रेमळ. नेहा म्हणते, “त्या दोघांनी मला आपल्या मुलीप्रमाणे खरोखरच सदैव प्रेम दिलं.” त्यामुळे पुण्यात नव्याने आलेल्या नेहाला सोपं गेलं. ती म्हणाली, ” पुण्यात माझे माहेरचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि ओळखीही नव्हत्या. सासरे बँकेत होते.  खूप जिनियस.  सदैव उद्योगात असत.  बँकेत फार थोड्या काळात त्यांनी वरची पदे मिळवली होती.” 

Click here to read more …

ऍन नेहा पाठक

समजा , तुम्हाला नोकरी करायला आवडत नाही म्हणून  तुम्ही नोकरी करायचीच नाही असं ठरवलेलं आहे.  पण योगायोगाने सहजपणे नोकरी तुमच्या पुढ्यात आलीच आणि नाकारायला काही सबळ कारण नसेल तर काय होईल?

कदाचित तुम्ही ती स्वीकाराल.  पण तुम्ही काहीशा नाराज असाल. तुमची चिडचिड होऊ शकेल आणि तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही, वगैरे वगैरे. पण आपली एक मैत्रीण अशी आहे की तिने अशा परिस्थितीत वडिलधाऱ्यांचा मान राखलानोकरी स्वीकारली  आणि ती अगदी शांत, स्वच्छ मनाने नोकरीला सामोरी गेली !

आणि काय आश्चर्य!  त्या नोकरीने तिला २८-२९  वर्षे खूप आनंद दिलाप्रेमळ मैत्रिणी दिल्या , आणि मुख्यतः तिला तिची स्वतंत्र ओळख देऊन आयुष्यभरासाठी प्रचंड आत्मविश्वास दिला!  पैसे तर मिळालेच पण नोकरीला सुरुवात करताना पैशाचा हेतु मुख्य नव्हता त्यामुळे बाकीचे मुद्दे अधिक महत्त्वाचे ! असं तिला वाटलं.

Upcoming Programs

सप्टेंबर महिन्याचे कार्यक्रम:

 • १) ५ सप्टेंबर : गौरी निमित्त सुट्टी
 • २) ९ सप्टेंबर : Club Picnic
 • ३) १२ सप्टेंबर: Teacher’s Day
 • ४) १९ सप्टेंबर: पितृ पंधरवडा – मनोरंजक विश्लेषण -श्री. माधव केळकर
 • ५) २६ सप्टेंबर: Japan Calling – PP Shrikant Bhave and Rtn Reshma Kulkarni

Support Group

September month support group
 • Leader: Rtn Madhuri Gokhale
 • Spouse Vijay Gokhale
 • Ann Shobhana Date
 • Ann Aruna Jituri
 • Ann Poonam Gaikwad
 • Rtn. Manasi Oak
 • Rtn. Shrikant Date
 • Rtn. Prashant Jituri
 • Rtn. Prakash Gaikwad