Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin February 2024

नमस्कार

फेब्रुवारी चा पुश तुमच्या हातात देताना सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते .

या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने  केली.  एक आणि दोन तारखेला अंध शाळेतील मुलींना आणि माध्यमिक शाळेतील मुलींना रूबेला, धनुर्वात आणि घटसर्प यांचं लसीकरण केलं.  त्याचा त्यांना लॉंग टर्म उपयोग होईल. पाच तारखेला एलजीबीटी क्यू या कम्युनिटी शी रिलेटेड एक सेमिनार झाला. त्यात आपण Co-host होतो.  तीन वक्ते होते. त्यापैकी दोन  वक्ते स्वतःच ह्या कम्युनिटी मधील होते. त्यांनी त्यांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या. त्यांना एक माणूस म्हणून योग्य तो आदर आणि प्रतिष्ठा मिळायला हवी हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ही दोघेही आता, आपल्यासारख्या, इतरांना अवहेलना सहन करायला लागू नये म्हणून काम करत आहेत. तिसऱ्या वक्त्या होत्या ,एका मुलाची माता, एक उच्चशिक्षित विदुषी.  ही परिस्थिती कशी हाताळला हवी हे तिने स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांगितलं.  दोन टक्के असलेल्या या ग्रुप विषयी बरच काही करायला हवं ही जाणीव हा सेमिनार अटेंड केल्यानंतर झाली.

आठ तारखेला हॉटेल अविस्मरा येथे आपली DG visit झा‌ली. आपले डॉक्युमेंट्स सगळे परफेक्ट होते. आपण करत असलेल्या कामाच ही त्यांनी कौतुक केलं. सीएसआर साठी आणि फौंडेशनच्या डोनेशन मध्ये अजून काम व्हायला हवं असं मत त्यांनी नोंदवलं आणि ते का व्हायला हवं हेही त्यांनी सांगितलं.
एकंदर विजिट छान झाली. सगळ्यांनी मनापासून कामं केली आणि बरेच जण आवर्जून उपस्थित राहिले. सर्वांचे मनापासून आभार.
19,20 ला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स झाली पंडित फार्मस वर. एस्ट्रोनॉट राकेश वर्मा आणि जलदुर्गा शालू कोल्हे यांची मुलाखत छान झाली. वनराई बंधाऱ्याच्या प्रोजेक्टमध्ये आपण सहभागी झालो त्यासाठी डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून आपल्याला सर्टिफिकेट मिळालं ही एक जमेची बाजू.
22 तारखेला आपण सुट्टी घेतली कारण नुकतीच ही कॉन्फरन्स झाली होती. आणि त्या दिवशी सगळी जणंच राममय झाली होती. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही उक्ती किती सार्थ आहे ते राम मंदिर झाल्यानंतर जाणवलं.
28 ला नेहमीच्या उत्साहाने बावरची नाईट पार पडली. सगळ्या बावरचिंच कौतुक करावं तितकं कमीच आहे. रोटेरियन आनंद आणि जयश्री यांना आपण आपले समजून त्यांच्या lawn वर बरेचदाहा कार्यक्रम करतो. ती दोघेही अतिशय उत्साहाने lawn सजवून आपल्या ताब्यात देतात. त्यांचे मनापासून आभार.
फेब्रुवारी महिना हा शांतता महिना म्हणून पाळला जातो. हा महिना तुम्हा सर्वांना शांततेचा आणि सौहार्दतेचा जावो.
काही प्रोजेक्टची तयारी सुरू आहे त्याविषयी पुढच्या पुश मध्ये बोलेनच.

तूर्तास एवढेच..

Rotary Masters - February 2023

Rotary Vishesh

Know more about what is happening in Rotary World …

Programs done in Previous Month

1. District Governor’s visit
2. Deodhar Awards
3. बावर्ची नाईट

Projects done in Previous Month

1. रुबेलाचे लसीकरण
2. LGBTQ Seminar
3. मूक बधिर शाळेत पुस्तकांचे वाटप

February 2024 Support Group ( Peace, Club Day & DG Visit)

1) Rtn Shirish Kshirsagar (Leader)
2) Rtn Pradeep Wagh
3) Ann Netra Wagh
4) Rtn Achyut Gokhale
5) Ann Nirupama Gokhale
6) Rtn Sham Arjunwadkar
7) Ann Radhika Arjunwadkar
8) Rtn Chandrashekhar Yardi
9) Ann Girija Yardi
10) Rtn Ajay Godbole
11) Ann Anjali Godbole