Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin December 2023

अध्यक्षीय

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो.

 डिसेंबर महिन्याचा पुश तुमच्यासमोर सादर करताना नक्कीच आनंद होतोय कारण नोव्हेंबर महिना हा खरोखरच आनंददायी गेला.  आपल्या सर्वांच्यासाठी. सुरुवात आपण केली चार नोव्हेंबरच्या दिवाळी पार्टीने आणि तिथे एकाच event मध्ये आपण अनेक गोष्टी केल्या. नॉमिनेशन कमिटीची इलेक्शन झाली. बऱ्याच दिवसांनी आपण नृत्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.  आपल्या दोन मेंबर्सच प्रमोशन झालं, शिरीष क्षीरसागर आणि नितीन अभ्यंकर आजोबा झाले.  त्यांनी दिलेली मिष्टांन्न आपण एन्जॉय केली. जर्मनीच्या एका रोटरी क्लबच्या past president शी आपली मुलाखत झालीदिवाळी पार्टीच्या वेळेस सालाबाद प्रमाणे आपला पुशचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.  संपादिका पास्ट प्रेसिडेंट वृंदा वाळिंबे आणि संपादक मंडळांनी श्रमपूर्वक आणि इंटरेस्ट घेऊन या सर्वांग सुंदर दिवाळी अंकाची निर्मिती केलेली आहे. आपल्या मेंबर्सनी आणि Anns नी भरभरून प्रतिसाद दिला आणि प्रसिद्धीसाठी साहित्य पाठवले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंक आवडला असल्याचे अनेकांनी आवर्जून कळवले. आठवणीत राहण्यासारखं असा तो कार्यक्रम झाला असंच म्हणायला हवं . ह्या वेळेला आपण व्हेन्यू ही बदलला होता.  आशा आहे की  माझ्याबरोबर तुम्हा सर्वांनी सुद्धा ही दिवाळी पार्टी एन्जॉय केली असेल. छोटे छोटे बदल अधून मधून चांगले वाटतात नाही का?

या एन्जॉयमेंट बरोबरच ह्या महिन्यात आपण आपलं सामाजिक काम सुद्धा पार पाडलं. आपले मेंबर सचिन जोगळेकर, श्रीकांत दाते, मानस यांच्या मदतीने नांदगाव येथील मुलींना 66 सायकली आपण दिल्या. त्यावेळी त्या मुलींचा उत्साह आणि चेहऱ्यावरचा आनंद खूप समाधान देऊन जाणारा होता. नितीन अभ्यंकरांच त्या भागातल नेटवर्क खरोखरच दाद देण्यासारख आहे.

 सार्थक संस्था, तिच्याशी तर आपण अनेक वर्ष जोडले गेलेलो आहोत. यावर्षी नवीन कपडे आणि दिवाळीचा फराळ आपण त्या़च्याबरोबर शेअर केला आणि नऊ तारखेची एक सकाळ त्यांच्याबरोबर छान गेली.

 दिवाळीच्या सुट्टीनंतर एक सर्वांग सुंदर कार्यक्रम आपण बघितला आणि तो होता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जीवनपट. संगीतकार .पी.नय्यर, नौशाद, रोशन यांची नावे आपल्या पिढीला पाठ आहेत पण त्यांचेही गुरु असलेल्या कृष्णरावांच्या विषय खूपशी माहिती आपल्या पिढीला नाहीये.

ती त्यांचेच नातू आणि आपले मेंबर मनोज ने व्हिडिओ द्वारे छान करून दिली आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरच्या आठवणी त्यांनी अतिशय खुसखुशीत भाषेमध्ये शेअर केल्या.

26 नोव्हेंबरला अमेय आणि पार्थ मेंहेंदळे यांच्या यावसुरा ह्या brewery ला आपली इंडस्ट्रियल व्हिजिट झाली .खूप नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या. मजा आली.

 ह्यानंतर मात्र आपल्या काही जबाबदारीच्या गोष्टी सुरू होणार आहेत. त्यात आपले अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. अंधशाळेच्या मुलींचं लसीकरण.आहे अंगणवाडी चं अपडेशन आहे आणि त्याचबरोबर AG, DG visit पण रांगेत आहे. नवीन जोमाने आणि नवीन उत्साहाने चला आता कामाला लागू या.

यावर्षीची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स पुण्यातच होतीये. पंडित फार्म्सला. मध्यवर्ती जागा आहे. मला वाटतं जास्तीत जास्त संख्येने आपण या कॉन्फरन्ससाठी रजिस्टर करायला हव आणि त्याची मजा घ्यायला हवी.

 त्याबरोबरच माझं लक्ष लागलेलं आहे दरवर्षीच्या एका मजेशीर event कडे आणि तो म्हणजे बावरची नाईट. तुम्हा सर्वांना हे दोन्ही इव्हेंट्स खूप चांगले एन्जॉय करता येतील याची मला खात्री आहे.

 So,आता फक्त एवढेच. बायबाय.

प्रेसिडेंट स्मिता जोग

Rotary Masters - October 2023

        • Rtn Nitin Abhyankar
        • Rtn Bharti Dole

Rotary Vishesh

Know more about what is happening in Rotary World …

Programs done in Previous Month

1. कौतुक सोहळा
2. तंबोला
3. कोजागिरी
4. दिवाळी पार्टी
5. लख लख चंदेरी

Projects done in Previous Month

1. Activities in Modern College
2. आपटे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
3. सार्थक सेवा संघ
4. Vocational visit to Yavasura
5. सायकल भरारी

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

मनाचिये गुंती

मानवी मनोव्यापारांचा लेखाजोखा एका मानसोपचार तज्ञाच्या नजरेतून …

Nominating committee elections 23-24

This is to inform all the members that the Nominating Committee Elections were held on 4 th Nov 2023 from 6.45PM to 7.30 PM in Punyai hall before Diwali party.


Following members were elected on the committee:


1)PP Ashok Gadgil
2)PP Shirish Kshirsagar
3)PP Gurunath Palekar
4)PP Dr Shobha Rao
5)PP Chandrashekhar Yardi
6)PP Anil Damle-Convener
7)Dr Bharati Dole-Ex Officio