Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin April 2024

नमस्कार मंडळी,

हा PUSH जेव्हा तुमच्या हातात पडेल तेव्हा आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याची तयारी सुरू असेल .नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा .
असं म्हणतात की Coming events cast shadow . आपल्या पुढील वर्षाची वाटचाल छान होणार आहे याचे संकेत आपल्याला मार्चमध्ये झालेल्या ऍक्टिव्हिटीज मधून मिळालेलेच आहेत .मार्च हा महिना आपला महत्त्वाचे संकल्प सिद्धीस नेणारा ठरला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या दृष्टीने कायमच एक महत्त्वाचा दिवस असतो आणि बऱ्याच ठिकाणी एखाद्या सणा सारखा साजरा केला जातो. आपण काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी केल्या. तीन मार्चला , फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचे वाढदिवस आणि विवाह वर्धापन दिन साजरे करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंट मध्ये आपण भेटलो. त्यांचे नाव Terrasine. याच्या संचालिका आहेत डॉक्टर सोनम कापसे. त्या स्वतः एक निष्णात कॅन्सर सर्जन आहेत.
दिव्यांग मुला-मुलींना त्यांना झेपेल त्यांना आवडेल असे काम चांगल्या वातावरणात आत्म सन्मान जपत करता यावे म्हणून त्यांनी अशा मुला मुलींना आपल्या या रेस्टॉरंटमध्ये कामासाठी नियुक्त केलेले आहेत प्रत्येक मुलाशी व्यक्तीशः त्या संवाद साधतात . ज्या कामाची त्याला आवड आहे त्याच्यात त्याला ट्रेनिंग देतात आणि त्यांना सामावून घेतात .समाजाच्या दृष्टीने हे खूपच चांगले काम आहे .

म्हणून त्यांना आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने तीन मार्च रोजी felicitate केले . त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये मिलेट्स पासून केलेले वेगळ्या चवीचे पदार्थ होते. त्यात कुठलाही आर्टिफिशियल रंग अथवा घटक वापरला नव्हता. तसेच हे सर्व धान्य शेतकऱ्यांच्या कडून शेतातून डायरेक्ट या रेस्टॉरंटमध्ये येते असे त्यांनी सांगितले . अशा आगळ्या वेगळ्या स्त्रीला सन्मानित करताना मला खूप आनंद झाला.

8 मार्च ला आपली visit ICAR floriculture national institute ला झाली..50 एकारवर ही institute पसरलेली आहे वेगवेगळ्या pollinators वर research चालतो crop कुठलेही असो जर pollination झाले नाही तर काहीच फुला फळात रूपांतरित होणार नाही. अनेक प्रकारचे perennials, annuals फुल झाडे लावून त्यावर येणाऱ्या 155 जातीच्या च्या मधमाश्या त्यांचा उपयोग crop चे production नैसर्गिक रीतीने वाढवणे ह्यावर संशोधनात भर दिला जातो.. फुलांनी भरलेली शेते, असंख्य वारियटीस ची फुले आणि अनेक प्रकारच्या मधमाश्या सगळे खूपच सुंदर होते.. इथे काम करणारे सीनियर सायंटिस्ट डॉक्टर फिरके यांची व्हिजिट आपल्या क्लबला झाली होती. त्यांच्याच निमंत्रणावरून आपला ग्रुप तिथे गेला आणि कीटकांचे एक निराळे जग तिथे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा धागा धरून आपण 11 तारखेला सुरेखा माने यांना आपल्या क्लब मध्ये बोलावलं होतं. निम्नस्तरातून आलेल्या ह्या बाईने जिद्दीने आपल शिक्षण पूर्ण केलं. एम कॉम झाल्या. आणि त्यानंतर स्वतःच्या बरोबरच इतर स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी कंबर कसली . युनिक एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून बचत गट तयार केले .आज मितिला 1500 स्त्रिया बचत गटाशी जुळलेल्या आहेत आणि स्वावलंबी बनलेल्या आहेत. त्याचा केवढा मोठा फायदा समाजात दिसतो याच एक उदाहरण एका कलेक्टरने शेअर केलेल आहे.
त्यांच निरीक्षण अस आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये महिला स्वावलंबी झाल्या, त्यांच्या घरामध्ये दोन वेळच्या जेवणाची भ्रांत संपली आणि त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप कमी झाले. ह्याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे की किती महत्त्वाचं आणि दूरगामी करणे परिणाम करणार हे काम आहे. आपण त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे हा प्रवासातले अनुभव ऐकले.
17 तारखेला आपण आपला क्लब डे साजरा केला. नेहमीप्रमाणेच क्लब मधल्या आपल्या मेंबर्सनी कर्मणुकीच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला. गायन वादन व नर्तन की त्यांनी अंगे अंतर्भूत असलेला एक सुंदर संगीताचा कार्यक्रम सादर केला आणि यासाठी आपण त्यांना सुवासिक अत्तराची कुपी देऊन त्यांचा गौरव केला. रिलॅक्स करणारे ड्रिंक्स आणि त्यानंतरचे रुचकर जेवण ह्यांनी ती संध्याकाळ प्रत्येकाच्या लक्षात राहील अशी गेली. मित्रांनो आणि मैत्रीण वर्षाच्या सुरुवातीपासूनच fund raising कार्यक्रम यावर्षी करायचा असं ठरवलं होतं .एक जुलैला आपलं नवीन वर्ष सुरू झालं आणि एक ऑगस्टला कुठला कार्यक्रम करायचा आणि साधारण कधी करायचं ते ठरवलं गेलं. त्यानंतर मग फंड रेझिंग कमिटीच्या अनेक meetings झाल्या. चर्चा , brain storming सेशन झाले. क्लब मधल्या अनेक लोकांचं सहकार्य मिळालं, मदत मिळाली आणि 29 मार्चला टिळक स्मारक मंदिर मध्ये गोल्डन मे लेडीज हा बॉलीवूड मधील संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्ताने आपण जवळजवळ दहा लाख एवढी रक्कम ट्रस्ट साठी उभी करू शकलो.यामध्ये सिंहाचा वाटा हा शिरीष क्षीरसागर, राहुल आणि कल्याणी पेंढारकर यांचा आहे.
त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम तर घेतलेच पण या कार्यक्रमाचा आर्थिक भाग ही उचलला .त्यामुळे जी काही रक्कम आपण उभा करू शकलो ती रक्कम आता ट्रस्टमध्ये कॅपिटल म्हणून राहील आणि त्याच्या व्याजावर अनेक सामाजिक उपक्रम राबवता येतील .यानिमित्ताने assimilation पण छान झालं. लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि तरुण पिढीसाठी एक स्ट्रॉंग मेसेज नक्की गेला की तुम्ही सुचवा, पुढे या. क्लब साठी नवीन नवीन गोष्टी करा. सगळेजण तुमच्या मदतीसाठी तत्पर असतिल.

बघता बघता या वर्षाचे नऊ महिने निघून गेले आणि आता आपण वर्षाच्या शेवटाकडे येवू लागलो. पण एवढ्यात relax होऊ नका कारण आपल्याला ग्लोबल ग्रँड साठी अमाऊंट जमा करायची आहे. APF च आपलं गोल आपल्याला गाठायचा आहे आणि पोलिओ फंड साठी ही contribution द्यायचे आहे. त्यामुळे नवीन फायनान्शिअल वर्षाच्या सुरुवातीलाच क्लब साठीच प्लॅनिंग तुम्ही कराल अशी आशा आहे आणि तशी कळकळीची विनंती आहे. भेटूया पुन्हा लवकरच. तोपर्यंत मस्तपैकी आंबे खा आणि हा उन्हाळा एन्जॉय करा.

रो. स्मिता जोग

Know Your Member

Welcome new rotary member and know more about them…

Programs done in Previous Month

1. Birthday/ Anniversary
2. Sangharsh Yogini
3. Club Day

Projects done in Previous Month

1. National Immunisation Day
2. Donation of purification equipment
3. ICAR floriculture national institute

Golden Melodies

गोल्डन मेलडीज अर्थात Golden Memories …..

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

April 2024 Support Group

  1. Rtn Sanjeev Chaudhary (Leader)
  2. Rtn Alka Kamble
  3. Spouse Ashok Kamble
  4. Rtn Ashok Gadgil
  5. Ann Anjali Gadgil
  6. Rtn Vrinda Walimbe
  7. Rtn Praksh Gaikwad
  8. Ann Poonam Gaikwad
  9. Rtn Harshad Khonde
  10. Ann Aboli Khonde

Obituary

Pradeep Wagh lost his son Omkar in Jersey City, USA on Saturday 2nd March.
May the almighty give enough strength and courage to Pradeep ji, Netra and the family of Omkar to bear this loss.