Skip to main content

गोल्डन मेलडीज अर्थात Golden Memories

 

लॉकडाऊन आणि गुरुबळ

लॉकडाऊनने लोकांना काय दिलं याबद्दल आपण बरंच काही ऐकून आहोत… मला मात्र लॉकडाऊन ने गाणारा नवरा दिला असं मी कायमच म्हणेन.
लॉकडाऊनमध्ये राहुलने सहज गाणे म्हणायला सुरुवात केली, आमच्या आई-बाबांनी त्याला एक सिस्टिम भेट दिली. क्लब मधून शिरीष, सीमा अशा संगीतातील जाणकारांनी प्रोत्साहन देखील दिले.
ह्याच काळामध्ये राहुल, आलोक काटदरे , ह्या त्याच्या डोंबिवलीच्या मित्रा कडून गाण्याचे ऑनलाइन क्लासेस घेऊ लागला. आलोक काटदरे हा मुंबईतला स्टेज शो करणारा अत्यंत नावाजलेला किशोर कुमारचा आवाज.. पण केवळ मित्र म्हणून राहुल सारख्या नवशिक्याला ला देखील तो शिकवू लागला. लॉकडाऊन संपल्यावर त्यांनीच राहुलला, विवेक पांडे सरांकडे जाण्याचे सुचवले.
एखादा उत्तम गुरु मिळाल्यानंतर तुमच्यात काय कायापालट होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे आलोक आणि विवेक सरांकडून कडून राहुलला मिळत असलेले गाण्याचे शिक्षण आणि प्रोत्साहन.

ही सगळी पार्श्वभूमी देण्याच कारण असं की , आलोक हा कायमच पुण्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत आलेला आहे . राहुलच्या मनात तेव्हापासून आलोकला पुण्यात आणून आपल्या गाणाऱ्या, रसिक क्लब साठी एखादा चांगला प्रोग्राम करावा हे घोळत होतं.
आपल्या क्लब मधला संगीताची अत्यंत उत्तम जाण असणारा, सगळ्यांना- विशेष करून राहुलच्या गाण्याचा प्रवास जवळून बघणारा आणि स्वतः ” मंतरलेल्या चैत्रबनात” सारख्या नावाजलेल्या कार्य्रक्रमात violin वाजवणारा शिरीष !! राहुल ने आलोक आणि विवेक सरांच्या कार्यक्रमची कल्पना बोलून दाखवताच त्याचे विचारचक्र सुरु झाले. आलोकचे काही व्हिडिओज शिरीषने पहिले , ऐकले आणि योगायोगाने मागील वर्षात रोटरी कॉन्फरन्समधे आलोकचा स्टेज परफॉर्मन्स त्याने पहिला. क्लब मधील अशा फंड रेझिंग कार्यक्रमाचा भरपूर अनुभव असलेला , पुण्यातील संगीत क्षेत्रांत ओळख असलेला शिरीष, त्याने ह्यात पुढाकार घेतला आणि “गुरु” बळात भरच पडली !!आपल्या क्लब प्रेसिडेंट स्मिताताई, क्लब सेक्रेटरी भारती ह्याच्या बरोबरीने, गुरु पालेकर, उज्वल, शेखर यार्दी , शरद डोळे , नितीन नाईक अशा काही लोकांशी चर्चा घडली आणि मग ह्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

संकल्पना , बारसे आणि आराखडा

आपल्या क्लबने यापूर्वी ब्लॅक अँड व्हाईट “, कणेकरी अशा काही कार्यक्रमाद्वारे फंड रेझिंग केले होते. त्यानंतर आपल्या क्लब तर्फे फंड रेझिंग चा कुठचाही कार्यक्रम न झाल्यामुळे आणि सर्वत्र OTT चा धुमाकूळ चाललेला असल्याने, गाण्याच्या या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल अशा शंका होत्या. पण प्रत्यक्ष कलाकारांबरोबर, लाईव्ह म्युझिक , बघणं , ऐकण आणि त्याचा आनंद घेणं हे एक वेगळीच मजा असते ह्याची खात्री आम्हाला होती .
किशोरदा ( आलोक काटदरे ) आणि महंमद रफी साहेब ( विवेक पांडे) ह्याची १९६०-७० ते १९८० अश्या दशकांमधील गाजलेली, सदाबहार गीते सादर करण्याचे ठरले . हा हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ असल्याने त्याचे “गोल्डन मेलोडज “असे बारसे केले गेले.
आता ह्यात क्लबला कुठेही काही तोशिष न होता आपण हा शंभर टक्के यशस्वी कसा करू शकू यासंबंधी विचार विनिमय चालू झाले . ह्या कार्यक्रमाचा लागणारा सर्व खर्च – थिएटर , कलाकार ,स्टेज, म्युझिशियनस, तिकीट छपाई, कलाकारांना प्रॅक्टिस साठी स्टुडिओ बुकिंग , LED वॉल इत्यादी , हा आम्ही ( राहुल आणि कल्याणी ) आणि शिरीष या दोघांनी उचलायचं ठरवलं जेणेकरून तिकीट विक्रीतून येणारा प्रत्येक रुपया हा क्लब निधीमध्येच जमा होईल. ह्या संपूर्ण विचारानिशीच मग पुढची पावले उचलली गेली.
हा सगळा आराखडा करत असताना शिरीष च्या डोक्यामध्ये तीन-चार गोष्टी अगदी स्पष्ट होत्या:
1.क्लबला काहीही खर्च न होता ,आपण जास्तीत जास्त निधी जमवायचा प्रयत्न करायचा- साधारण दहा लाखा पर्यंत निधी जमवण्याचा प्रयत्न करायचा.
2. आपल्याला क्लबमधील आणि क्लब च्या बाहेरील जेवढे डोनर मिळवता येतील तेवढे मिळवायचे. आपल्या क्लबच्या विधायक कामांची, सातत्याची त्यांना माहिती द्यायची . त्यानंतर टिळक स्मारक मध्ये किती सीट्स आहेत बाल्कनी व्यतिरिक्त त्याचा अंदाज घेऊन तिकिटाचे किंमत ठरवायची.
3. हा प्रोजेक्ट प्रत्येकाचा आहे , त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ओळखीची कमीत कमी दहा जणांना तिकिटे विकायची
4. आपल्याला नुसतं तिकीट विकायची नाहीत ,तर हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा त्यांनी तो येऊन बघावा जेणेकरून आपल्या क्लब चा P . I . देखील होईल.
सगळ्यात महत्वाचे – मागे हटायचे नाही आणि आपल्याबाजूने १००% प्रयत्न करून एक सुंदर अविस्मरणीय कार्यक्रम सादर करायचा.

"देणारे" हात

आपले कॉर्पस वाढवण्यासाठी डोनेशन्स खूप गरज होती. जेव्हा आम्ही पुण्यातील काही प्रथितयश लोकं, कंपनी ह्यांना भेटलो आणि ह्या कार्यक्रमाचे फौंडेशन सांगितले की- स्वतः क्लब सर्व खर्च उचलतो आहे आणि आपले सर्व डोनेशन हे ह्या क्लबच्या उत्तम सामाजिक कार्यासाठीच वापरले जाणार , तेव्हा मदतीचे खूप हात पुढे आले. अर्थात गेली अनेक वर्षे आपण केलेले प्रोजेक्ट्स – सार्थक सेवा संघ, आपटे मूक बधिर प्रशाला, Happy school प्रोजेक्ट , सायकल भरारी , बेबी वॉर्मर इ, – उभा केलेला निधी, हे सगळे पाहून त्यांनाही आपली मदत सत्कारणी लागेल ह्याची खात्री झाली हे सांगणे न लगे.

डोनर शोधणे , त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना रोटरी, आपल्या क्लबचे काम , कार्यक्रम करण्याचा हेतू ह्या आणि अश्या सर्व गोष्टीत प्रामुख्याने , प्रेसिडेंट स्मिताताई, क्लब सेक्रेटरी डॉ. भरती डोळे, P P शरद डोळे, P P शिरीष ह्यांचा सिंहाचा वाटा आहे . त्या सर्व कामात ट्रस्ट कडून जे काही कागदोपत्री व्यवहार करणे होते त्यात P P गुरु पालेकर, P P उज्वल ह्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली .
अमूल्य मदतीचे काही हात :
फ्लीटगार्ड (रो. विजय आणि माधुरी ह्याच्या सहयोगाने :३,००,०००) ,
कोहिनूर ( प्रेसिडेंट स्मिता ताई ह्याच्या सहयोगागाने १,५००००
अनामिक ( ७५०००/- ) , डॉ. धनश्री चोणकर (२५०००/-),
P P अंजली रावेतकर ( २००००/- ),
रो अनिरुद्ध इनामदार ( १००००/-) P P श्रींकांत भावे ( ११०००/),
P P गुरुनाथ पालेकर( १००००/-) , P P उदय चिपलकट्टी( १००००/-) ,
राहुल पेंढारकर ( १००००/-)

नकटीच्या लग्नाला....

त्यानंतरची तारेवरची खरी कसरत म्हणजे नाट्यगृहाची तारीख, आलोक काटदरे आणि विवेक सरांची तारीख, उत्तम वाद्यवृन्द आपल्यासाठी असणे – या सगळ्याची मोट बांधणे .
सुरुवातीला २५ जानेवारीला ठरवलेला प्रोग्राम बालगंधर्वने रद्द करत आहोत असे सांगितले. त्यातच बालगंधवाचे नूतनीकरण निघाले… मग संपूर्ण फेब्रुवारी आलोक नव्हता. तसंच निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि मग सर्वानुमतं असं ठरलं की यशवंतराव आणि बालगंधर्व ही नाट्यगृह सोडून आपण दुसरं मध्यवर्ती नाट्यगृह बघावं . टिळक स्मारक हे नक्की करण्यात आलं आणि सरते शेवटी मार्च अखेरची तारीख ठरवण्यात आली.

कमिटी , ग्रुप आणि उत्साह

एकदा तारीख ठरल्यानन्तर मात्र कामे अगदी जोमाने चालू झाली . तिकीट दर काय असावा , वाद्यवृंद काय असावा , बॅनर कसे असावे, तिकीट विक्री कशी करावी, बुक माय शो, समीर हंपी आणि अशा चर्चाना उधाण आले. पण सर्वानुमते हा प्रोजेक्ट “लीड” करायला शिरीष आणि त्याच्याबरोबर रो. नितीन नाईक हे योग्य आहेत हे ठरले.

हा प्रोजेक्ट प्रत्येकाचा !

आपल्या क्लब मधील अनेक लोकांनी ह्या कार्यक्रमाची घोषणा या होताच तिकिटे बुक केले – नितीन नाईक, संदीप तपस्वी, उज्वल , शिरीष, राहुल, अलका आणि कांबळे सर , शरद स्मिताताई असे अनेक उत्साही लोक पुढे आले. त्यांनी १०,१५, २५ अशी तिकिटे विकत घेऊन, आपल्या मित्र मंडळींना आपण घेऊन येऊ अशी खात्री दिली.
तसेच इव्हेंट कमिटी , मार्च सपोर्ट ग्रुप आणि काही उत्साही क्लब मेंबर्स च्या मदतीने वेगवेगळ्या कमिटी तयार केल्या गेल्या , WA ग्रुप तयार केला गेला.
कार्यक्रम सुसूत्रपणे होण्यासाठी काय काय लागेल ह्याची यादी करून, कामाची विभागणी केली गेली.
डिस्ट्रिक्ट कडून किंवा डोनर्स कडून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, त्यांना स्थानापन्न करणे , येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या क्लब ची कॉटन बॅग देणे , कलाकारांची खान-पान व्यवस्था, डोनर्स आणि आपल्या क्लबच्या फिल्म दाखवण्याची व्यवस्था, कार पार्किंग , vallet parking , बॅनर बनवणे, लावणे …. खूप कामे होती. पण आपल्या क्लब मधील सगळ्यांच्या पुढाकाराने आणि मदतीने त्याची छान विभागणी झाली आणि थोडे थोडे असे करून कामाचे डोंगर उपसले गेले !

आणि कार्यसिद्धी...

गेले दोन तीन महिने तयारी चालू असलेला हा कार्यक्रम आता प्रत्यक्ष सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली. लग्न कार्यात जशी धावपळ चालू असते , जसा एक वेगळाच उत्साह असतो ,तसा उत्साह ,आनंद क्लब च्या सर्व सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
क्लब मधली आपली तिकीट विक्री, बुक माय शो आणि थेटर वरली विक्री धरून साधारण 500 हून अधिक प्रेक्षक वर्ग त्यादिवशी उपस्थित होता. ठरवलेल्या टीम प्रमाणे, माधुरी आणि विजयगोखले , अलका आणि नितीन अभ्यंकर हे तिकीट विक्री आणि त्यांना कॉटन बॅग देणे हा बूथ सांभाळत होते. त्यांच्या तिकीटामध्ये काही अडचणी असतील तर त्या सोडवणं हे बघत होते . तसेच त्यांना मदत करायला तिथे प्रमोद पाठक देखील होता. आलेल्या गेस्ट ना व्यवस्थित स्थानापन्न करणे , पाहुण्यांचे स्वागत करणे याच्यासाठी शिरीष, वृंदा , भारती आणि शरद डोळे होते. त्याचप्रमाणे ऑडिटोरियम मध्ये इतर लोकांना बसवणे त्यांच्या काही अडचणी असतील तर ते बघणे हे काम आशिष , मृणाल ,नेहा पाठक हे करत होते. सर्व कलाकारांचे खाण्यापिण्याची व्यवस्थित व्यवस्था ही अतिशय उत्साहाने आणि आपुलकीने अंजली रावेतकर आणि दीपा साठे यांनी केले. पाण्याचे क्रेट्स श्रीकांत भावे ह्यांनी आणले आणि नितीन नाईकच्या बरोबरीने valet पार्किंग साठी अभिषेक ने मदत केली
मध्यंतरानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते , म्हणजेच दिवसे सरांच्या हस्ते आपण सर्व कलाकारांचे यथोचित स्वागत केले. त्यामध्ये निरुपमा, शोभना आणि श्रीकांत दाते यांनी खूप मदत केली. कार्यक्रमाच्या आधी आणि मध्यांतरात रोटरी आणि आपल्या क्लबच्या कार्याची फिल्म, तसेच कोहिनूर संस्थेची फिल्म प्रोजेक्टर द्वारा आपण लोकांना दाखवली. त्यात शरद डोळे , नितीन नाईक आणि संदीप तपस्वी यांचा खूप मोठा सहभाग होता.
कलाकारांचे स्वागत आणि पाहुण्यांची ओळख करण्याचा दिमाखदार आणि छोटेखानी सोहळा अत्यंत छान आणि वेळेत नेण्याचे महत्त्वाचे काम शिरीष ने केले . प्रेसिडेंट आणि क्लब secretary ह्याचा देखील ह्यात मोलाचं वाटा होता हे सांगणे नलगे.

सात वाजता पडदा वर गेला आणि स्टेज वरच्या वादक कलाकारांनी शोले ची सुप्रसिद्ध धुन वाजवून रसिकांची वाहवा मिळवली. जणू काही पुढचे तीन तास तुम्हाला काय प्रकारची संगीत मेजवानी मिळणार आहे याची ती एक झलक होती !!
आजच्या कार्यक्रमाचे तीन ही गायक कलाकार हे अत्यंत तयारीचे उत्तम गाणारे परंतु पुणेकर चोखंदळ रसिकांना त्यामानाने अपरिचित !! त्यामुळे आयोजक म्हणून आमच्याच हृदयाची धडधड वाढली होती. मात्र कोमल कृष्णा या गायिकेने “ऐसा समा ना देखा “ हे लतादीदींचं गाणे गाउन सुरुवात केली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. खरं तर आरडी चे हे गाणे गायला आणि वाजवायला अतिशय अवघड असे आहे. परंतु कोमल आणि सर्व वादकांनी अतिशय तयारीने हे गाणे सादर केले.

या कार्यक्रमाचा star performer आलोक काटदरे …….. तो स्टेजवर आला…. गायला… आणि जिंकला , असे याचे वर्णन करता येईल !! आपल्या आवडीची किशोर कुमारची असंख्य गाणी आलोक ने गायली, नुसती गायली नाहीत तर perform केली आणि रसिकांना खूष केले. ये जवानी है दिवानी …..म्हणताना आलोक प्रेक्षकांच्या शेवटच्या रांगेपर्यंत जाऊन आला तर नमकहलाल मधले पग घुंगरू बांधके म्हणताना चक्क अमिताभ सारखा नाचला!!
आरडी किशोर आणि राजेश या तीन एक्क्यांनी एकत्र येऊन अनेक अप्रतिम गाणी दिली आहेत.
आलोक ने राजेश चे डायलॉग म्हणत एक अप्रतिम medley सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
दुसरे star गायक विवेक पांडे यांनी सुरवातच रफी साहेबांच्या दोस्ती मधल्या एका मधाळ गाण्याने केली. विवेक ना voice of rafi का म्हणतात ते पहिल्याच गाण्यात त्यांनी सिद्ध केले !!विवेक आणि कोमल यांनी गायलेले “ ये दिल तुम बिन कही लगता नहीं “ या गाण्याने तर कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
खरं तर अशी ,गायला अवघड आणि ऑर्केस्ट्रेशन ला क्लिष्ट गाणी सहसा स्टेजवर सादर करायचे धैर्य कोणी करत नाही. परंतु रफी साहेब आणि दीदींच्या गायकीतल्या सर्व जागा तंतोतंत घेऊन या जोडीने वाहवा मिळवली !!

कोमल कृष्णा यांनी कुहू कुहू गाऊन आपला गळा शास्त्रीय संगीताच्या तालमीत तयार झाला आहे हे दाखवून रसिकांची दाद मिळवली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात सर्वांना आवडणारी अनेक हिंदी गाणी या कलाकारांनी म्हटली आणि पुणेकर रसिकांना जिंकले !!

हा रंगतदार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायक कलाकाराच्या बरोबरीने वादक कलाकारांचा ही मोठा वाटा आहे. jewel thief मधल्या होटो पे ऐसी बात या गाण्याच्या सुरवातीचा प्रदीर्घ music piece आणि गाणे संपताना विविध तालवाद्यांच्या मदतीने केलेला नाट्यपूर्ण शेवट अतिशय तयारीने वाजवून वादकांनी “हम किसीसे कम नहीं “ हे दाखवून दिले.
चिंतन मोढा(synth), हर्षद गणबोटे (तबला ),असिफ इनामदार ( rhythm machine ),बाबा खान (trumpet) हार्दिक ( guitar ) आणि लीजेश ( base गिटार ) या कलाकारांचं कौतुक कराव तेव्हढे थोडेच आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी त्यांच्या भारदस्त लोकप्रिय आवाजात केले.
हिंदी सिनेमे आणि हिंदी गाणी याचे असलेले सखोल ज्ञान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
या कार्यक्रमाला पुण्याचे District collector डॉ सुहास दिवसे आणि त्यांच्या पत्नी स्मिता दिवसे आवर्जून उपस्थित होते. दोघांनाही हिंदी गाण्यांची आवड असल्याने प्रत्येक गाण्याला दाद देत त्यांनी कार्यक्रम शेवटपर्यंत पाहिला.
त्याचबरोबर आपल्या Rotary District ३१३१ चे पुढचे District Governor शीतल शहा आणि त्यांच्या पत्नी रागिणी शहा हेही उपस्थित होते.
अशा रीतीने हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

 

कल्याणी पेंढारकर
शिरीष क्षीरसागर

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016