Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin March 2024

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,मार्च महिन्याच्या पुश मधून तुमच्याशी संवाद साधताना माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. आनंद या गोष्टीचा आहे की ठरवलेल्या बहुतांश गोष्टी पार पडल्या आणि चांगल्या रीतीने पार पडल्या.

चार फेब्रुवारीला आपण अशोक कांबळे यांचा कार्यक्रम ठेवला होता. युद्धनौके वरील जीवन आणि युद्धनौकेची माहिती त्यांनी अतिशय रंजकपणे आपल्याला सांगितली.

नऊ तारखेला रोटरी क्लब पुणे Wisdom बरोबर आपण एक सिनर्जी मीटिंग घेतली आणि त्यात आपण पीस अवॉर्ड दिले. आपल्या क्लबचे awardee होते श्री प्रशांत कोठाडिया. सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप मोलाचे योगदान त्यांनी दिलेलं आहे .स्वप्नपूर्ती या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला .जवळ जवळ 80 लोकांची उपस्थिती होती.

रोटरी क्लब ऑफ विस्डम चे अवॉर्डी होते डॉक्टर अमित देवकुळे . दोघांची भाषणेही चांगली झाली.

नंतरचा event म्हणजे मल्टी डिस्ट्रिक्ट रायला इनोव्हिजन.

आपला क्लब त्यात सहभागी झाला .10 आणि 11 तारखेला इंदिरा इन्स्टिट्यूट येथे हा RYLA पार पडला .साडेतीनशे हूनही अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते .

दोन दिवस अनेक प्रथित यश वक्त्यांची भाषणे झाली. एकंदरीत संयोजकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा समाधान देण्यासारखा हा कार्यक्रम झाला .

याचाच पुढचा भाग आता 28 आणि 29 तारखेला जी. एम. आर. टी. नारायणगाव येथे आहे आणि मला खात्री आहे तो अनुभव सुद्धा एक चांगला अनुभव असेल. पुढच्या पुश मध्ये मी त्याची माहिती देईनच .

29 मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आपण, आपल्या ट्रस्टसाठी एक फंड रेझिंग कार्यक्रम आयोजित करत आहोत. अलोक काटदरे आणि विवेक पांडे हे दोघं गोल्डन मेलेडी हा हिंदी गाण्याचा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत .

ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिरीष क्षीरसागर आणि राहुल पेंढारकर यांनी खूप श्रम घेतलेले आहेत .डोनेशनच्या माध्यमातूनच आपण पाच लाखाहूनही अधिक रक्कम मिळवलेली आहे .तिकीट विक्रीतून पाच ,सहा लाख रुपये मिळवायचे अशी आपली योजना आहे. आपण सर्वजण मनःपूर्वक या कार्यक्रमाच्या यशासाठी हातभार लावाल याची खात्री मला आहे.

एका दुःखद बातमीचा सामना आपल्याला ह्या महिन्यात करावा लागला. आपल्या सर्वांचे मित्र आणि माजी प्रेसिडेंट रो.किरण वाळींबे यांचे 16 तारखेला रात्री देहावसान झाले.त्यांचा मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावून गेला . अनेकांना ह्या पार्श्वभूमीवर क्लब डे सेलिब्रेट करणे प्रशस्त वाटलं नाही म्हणून आपण क्लब डे आणि त्या महिन्याचे वाढदिवस आणि ॲनिवरसरी सेलिब्रेशन हे दोन कार्यक्रम पुढे ढकलले.

आता 17 मार्चला पीवायसी येथे आपला क्लब डे साजरा होईल.

सर्वांना शुभेच्छा देऊन मी येथे थांबते. भेटू पुन्हा पुढच्या महिन्याच्या पुशच्या माध्यमातून.

रो. स्मिता जोग

Rotary Vishesh

Know more about what is happening in Rotary World …

Programs done in Previous Month

1. Experience of INS Vikrant by Ashok Kamble
2. Peace Award
3. Scientist Award

Projects done in Previous Month

1. Printer Donation
2. Food grain support to Sarthak
3. Support to Anganwadi children

आदरांजली

16 फेब्रुवारीला किरण अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या आत्म्याचा पुढचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडो अशी आपण सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करूया.

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

March 2024 Support Group

  1. Nitin Abhyankar (Leader)
  2. Alka Abhyankar
  3. Uday Chipalkatty
  4. Dr Mrinal Nerlekar
  5. Ashish Nerlekar
  6. Dr Deepa Sathe
  7. Shrikant Date
  8. Shobhana Date