Skip to main content

किरणास्त

 

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि | 
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही l

अर्थात, माणूस ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र काढून टाकून नवीन वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणेच आत्मा जुने जीर्ण झालेले शरीराचा त्याग करून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. गीतेमध्ये हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि ह्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार आपण केला तरच आपण आपल्या प्रिय माणसाच्या वियोगाचे दुःख सहन करू शकतो व पुढची वाटचाल करू शकतो.
हे खरे असले तरीसुद्धा काही काही व्यक्ती जाताना आपल्याला चटका लावून जातात.

त्यापैकीच कै. किरण वाळींबे हे होत.16 फेब्रुवारीला किरण अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या आत्म्याचा पुढचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडो अशी आपण सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. वृंदा, यज्ञदत्त, मृण्मयी आणि इतर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो.

किरणला पहिल्यांदा मी भेटले ते आपल्या रोटरी एकांकिका स्पर्धेत लादेनची भूमिका ते करत असताना. त्यानंतर माझा त्यांच्याशी जवळचा संबंध आला तो 2008 /2009 साली जेव्हा किरणजी रोटरी क्लब पुणे शिवाजीनगरच्या म्हणजे आपल्या क्लबचे प्रेसिडेंट होते आणि योगायोगाने त्याच वर्षी मी पुणे स्त्रीरोग तज्ञ संघटनेची प्रेसिडेंट होते .त्यांच्याबरोबर आमच्या संघटनेने अनेक मेडिकल प्रोजेक्ट केले. त्यामध्ये किरणचा उत्साहाने सहभाग असायचा आणि खूप मोलाचं सहकार्य त्याच्याकडून लाभले. 2016 साली मी रोटेरियन झाले आणि त्यानंतर अधून मधून किरणची गाठ पडत गेली.

मी जेव्हा माझ्या प्रेसिडेंटशिअल इयरची तयारी करत होते तेव्हा किरणने आपण होऊन अनेक मौलिक सूचना दिल्या. त्यांना खूप ऍक्टिव्हली काम करायचे होतं पण दुर्दैवाने त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.
नंतर त्यांची बायपास सर्जरी झाली व थोड्या विश्रांतीनंतर ते क्लब मध्ये येवू लागले. असं वाटलं की आता ते बरे झाले. बरेच दिवस त्यांचा उत्साही वावर आपल्याला बघायला मिळेल. पण नियतीच्या मनामध्ये काही निराळच होतं त्यांची तब्येत खराब होत गेली आणि शेवटी 16 फेब्रुवारीला रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याची आठवण कायमच माझ्या मनात राहील.
त्यांनी वेळोवेळी दिलेले सल्ले, केलेलं मार्गदर्शन हे मौल्यवान होतं आणि त्याची आठवण नेहमीच होत राहील.

President Dr. Smita Jog

We meet to part……..

There are very few people who leave lasting impression on our mind in a very short span of time. Rtn. Kiran was one of them. Our first meeting took place when we were not members of RCPS. Then I was working as Director of Hiraben Nanavati Institute of Management (popularly known as Cummins Management Institute) and Kiran had come to meet me in connection with some work. After two years when we joined RCPS he reminded me of our meeting and also very much appreciated my work at the Institute. I was pleasantly surprised with his candid approach. Then he and Vrinda became family friends. When Sharad was to become President, both of them assured their full support.

Kiran was a very creative person. The photos he posted on our group, used to be outstanding. I still remember his enthusiasm in taking photos at Diwali party & without fail he used to send the photos to respective members. This year also he had taken the responsibility of designing personalised birthday and anniversary greetings. He used to send the greetings one month in advance. So after April, we will have to miss his beautiful greetings.

Kiran had many ideas about PI and Projects. Painstakingly he had made a presentation and we had discussed it in detail. He was looking forward to work in BOD 2024-25. Unfortunately, it was not to be. However, I am sure his best wishes will always be there with us.

Rtn Bharati Dole, Secretary

My Friend Kiran

I came in closer contact with Kiran when I took the role of Club secretary in 2008 when Kiran assumed the club Presidentship.
I found him to be a very enthusiastic club President with full dedication. I was relatively new to the Rotary world and got an opportunity to learn the Way of Working of Rotary systems. He was very supportive, and I thoroughly enjoyed working for the club with him.

With Kiran’s guidance, we strived to plan and execute each weekly meeting with minute details of announcements and proceedings. Maintaining a logbook was very useful for the meetings.

We maintained the Logbook and formats for the BOD, and Club assembly records. We also practiced timely circulation of relevant documents, monthly reports, MOMs, project reports, etc.

He believed that we should conduct limited but meaningful projects during the year. Some of them included Donations of medical equipment to hospitals, Medical Camps to reduce child mortality, Donations to Blind school etc. Two distinguished personalities – Col.Lalit Ray and Mr.Minochar Patel were inducted as honorary members during the year. The timely documentation was very helpful during the audit before the DG visit. Kiran was always full of Energy and Hope. He never did any work half-heartedly. His relentless efforts paid huge dividends during the district award ceremony when our club was honored with 11 Trophies. Kiran was an ardent Nature lover, Animal lover, and a Great artist. His professional photography was very well appreciated by all.
His “Photographic” gift on every member’s birthday and Anniversary is loved and cherished by all our members.
His contribution to the club will be remembered for years to come.

Sorrowfully he finished his innings too early and left for his heavenly abode untimely. We all pray for his peaceful journey to his final destination. OM SHANTI

Rtn. Milind Palkar

Kiran – A Gentleman

Kiran was an affable, considerate and courteous gentleman with a “Don-like” personality. He joined our club in 1994-95. He offered himself for the presidentship in 2007-08. But when I, who joined the club in 2000-01, expressed a desire to take up presidentship before retiring from service at ARI, he graciously gave me the chance and decided to wait for one more year. He wholeheartedly supported me during that year. An out of box thinker, he had been giving valuable suggestions to our club office bearers over the years without any reservations. He was an avid photographer with clever editing skills. In his death, we lost a true rotarian and friend. His memories will linger on for a long time to come. MAY THE DEPARTED SOUL REST IN PEACE.

Rtn. V. Suryaprakasa Rao

A True Rotarian friend and guide

I have been associated with Kiran from 30 years during days of Divgi Metals where he was GM and we have just started our company used to go to ‘Divgi Metals’ for business but always used to avoid meeting Kiran as we were afraid to meet him due to his dynamic and strict personality but later when I joined RCPS in 2013, we reconnected again and became very good friends and he reminded me that I used to come to his factory 20 years back and I was amazed by his sharp memory. Kiran was dynamic and very meticulous in profession but also very soft natured and a great person outside professional life.

He was always a true friend , mentor , guide and a dynamic hardworking Rotarian and it was always lot of fun to work with him and he always use to give me out of the box tips for each avenue and he also had a funny and witty personality and due to which we used to enjoy each other’s company always.

In 2013-14 as a new rotation myself , I have directed a silent comedy play (मूकनाट्य) for RCPS club day in which PP Kiran was acting along with PP Shekhar and PP Vinay and it was role of Inspector for Kiran and we really enjoyed his funny acts during the rehearsals , but the best part is that Kiran helped me by providing fantastic western comedy music clips for the background music for the play and which took that silent act on different level of comedy which was enjoyed by audience , Kiran was having a great collection of such western music of all types and he was very passionate about his collection.

A few years after joining Rotary, during one dinner at Kiran’s residence we came to know that we were distant relatives of each other as Kiran is cousin brother of my Atya’s husband ( Mr Kishore Kumthekar Thane ) and that brought us more close as friends.

Kiran will be missed by me as a great friend and a hardworking Rotarian and guide forever.

May his soul rest in peace and myself and Shilpa’s heartfelt condolences to Vrinda and whole family.

Rtn. Nitin Naik 

आठवणीतला किरण

किरण गेल्याची बातमी आली तेंव्हा माझं मन भूतकाळात गेलं. माझं रोटरीमध्ये assimilation व्हायला कारणीभूत व्यक्तींपैकी किरण प्रमुख होता. रोटरीत आल्यावर वर्षे-दोन वर्षे मी फारसा क्लबमध्ये रस घेत नसे. माझी उपस्थिती सुद्धा कमी असायची. क्लबचे कार्यक्रम, पिकनिक, कॉन्फरन्सला वगैरे मी क्वचितच जात असे.   क्लब सोडण्याची कल्पना डोक्यात येऊ लागली. पण तेवढ्यात किरणनेच मला पुशमध्ये प्रथम मासिक भविष्य लिहायला गळ घातली. एक दोन वेळा घरी जेवायला बोलावलं. त्यावेळी तो माझा खास मित्र बनून गेला तो कायमचाच. माझा रोटरीतल्या पहिल्या नाटकातला साथीदार तोच होता. आम्ही दोघेच आधी येऊन सराव करत असू.

नंतर परत एकदा त्याच्याकडे पुशचे संपादकपद आल्यावर त्याने मला ‘पुशसाठी व्यंगचित्रे काढशील का’ असे विचारले. मी त्यावेळी व्यंगचित्रे काढायला जमतील की नाही याच्याबद्दल साशंक होतो. मी त्यावेळी त्याला “नाही” म्हणून सांगितले. पण विचार डोक्यात राहून गेला. मग मी स्वतः  ज्यावेळेस बुलेटिनचा संपादक झालो त्यावेळी मी व्यंगचित्रे काढायची ठरवली आणि त्यानंतर अनेक वेळा काढली सुद्धा. पण मूळची कल्पना मात्र किरणचीच.

किरणचं व्यक्तिमत्त्व मोठं रुबाबदार होतं. उंचापुरा आणि धडधाकट किरण भारदस्त वाटत असे. दिसायला सुद्धा तो राजबिंडा दिसे.

तो कामाला वाघ होता. रोटरीमध्ये तो मनापासून रमायचा. Community service आवडता विषय. यात त्याने अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स केले. यावर त्याने एक पुस्तिका पण संपादित केली होती. लोकांना असे प्रोजेक्ट्स करण्यासाठीसुद्धा तो प्रेरित करीत असे, मार्गदर्शन देत असे. लोकांना विविध बाबतीत मार्गदर्शन करायला त्याला प्रचंड आवडत असे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीचे आवर्जून कौतुक करायचा. कामं अंगावर घेऊन पार पाडायला त्याला आवडायचे. विचारणाऱ्याशी मनापासून सहकार्य करायला तो कायम तयार असे. त्याच्याकडे प्रोजेक्ट्सच्या कल्पना पण विविध होत्या. क्लबच्या विविध कार्यक्रमांमध्ये तो कायम सहभागी होत असे.

२०१३-१४ साली मी क्लबचा अध्यक्ष असताना तो community service डायरेक्टर होता. त्यावेळी त्याने मला दिलेली साथ मी विसरू शकणार नाही. त्या वर्षी मी त्याला सांगितले की,”यंदा आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स चे यजमानपद असल्यामुळे आपल्याला मेंबर्सकडून खूप पैसे मागायचे नाहीत. त्यांचा already खूप खर्च झाला आहे. त्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट असे करायचे आहेत की ज्याची “व्हिजिबिलिटी” खूप असेल परंतु खर्च खूप कमी असेल.” किरणने निवडलेला एक प्रोजेक्ट उदाहरणादाखल सांगतो. त्याने सॉफ्टवेअर कंपन्यांकडून तीन-चार वर्ष जुने व काढून टाकलेले कॉम्प्युटर्स जमा करून ते विविध शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांसाठी देणगी म्हणून देण्याचा प्रोजेक्ट निवडला. आम्ही त्या वर्षी १०० पेक्षा जास्त सेकंडहॅण्ड कॉम्प्युटर्स जमा करून विविध शाळा आणि शैक्षणिक संस्थांना कॉम्प्युटर सेंटर्स उभारून दिली. एका सेकंडहॅन्ड कॉम्प्युटरची किंमत जर वीस हजार धरली तर प्रोजेक्टची एकूण किंमत रु. २० लाख होते. म्हणजे ट्रस्टचा एकही रुपया न वापरता त्याने २० लाख रुपयांचा प्रोजेक्ट केला आणि त्याची दर्शनी मूल्य (visibility) सुद्धा खूप छान होते. त्या वर्षी क्लबच्या मर्यादित बजेट मध्ये त्याने असे खूप छान छान प्रोजेक्ट्स केले. तात्या रानडे यांच्या संस्थेबरोबर येरवडा जेल मधील कैद्यांना मदत करण्याचा प्रोजेक्टसुद्धा संस्मरणीय होता. Peace and conflict resolution मध्ये आपल्या क्लबला त्यात डिस्ट्रिक्टकडून पारितोषिक मिळालं होतं. वेल्ह्यातील गेळगाणी या डोंगरावरच्या गावात विहीर खोदून देणे आणि पाणी साठवण्याची व्यवस्था करणे हा ज्ञानप्रबोधिनीबरोबर केलेला अजून एक उल्लेखनीय आणि पारितोषिक विजेता प्रकल्प. कोथरूड मधील अंधशाळेत विद्यार्थिनींसाठी ” sensory garden” करून देण्याचा प्रोजेक्ट सुद्धा खूप छान होता. पण तो काही कारणांमुळे फलद्रूप होऊ शकला नाही. पण त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. अनेक शाळांमध्ये त्या वर्षी आपण टॉयलेट्स बांधून दिली होती. प्रोजेक्ट्सच्या खूप छान कल्पना येत असत त्याला आणि तो त्या तितक्याच मेहनतीने आणि चिकाटीने राबवत असे.

डिस्ट्रिक्टमध्येही किरण खूप लोकप्रिय होता. अनेक प्रांतपालांचा तो भरवशाचा माणूस होता. डिस्ट्रिक्टमध्ये विविध जबाबदाऱ्या त्याने यशस्वी पार पाडल्या. दिलेले काम चोख करणे हा त्याचा स्वभाव. त्याच्यावर कामाच्या बाबतीत संपूर्णपणे अवलंबून राहता येई. कुठल्यातरी मोटारसायकलची जाहिरात होती- “Fill it forget it.” त्याच धर्तीवर “entrust the job to Kiran and Forget it” असे म्हटले तरी वावगे होणार नाही. त्याने एकदा कमिटमेंट केली तर तो ती पूर्ण करणार याची खात्री.

इंजिनिअर असणारा किरण आपल्या व्यावसायिक कामात एकदम तत्पर. Very organised and systematic. तो मॅनेजमेंट तज्ञ तसेच प्रोफेशनल कन्सल्टंट, ट्रेनर होता. आजारी उद्योग १८० अंशात फिरवून फायद्यात आणण्यात त्याचा हातखंडा होता. तसेच एकदम वक्तशीर. दिलेल्या वेळेला काम हजर. कुठे येणार असेल तर सांगितलेल्या वेळेला गडी हजर होणार. त्याच्या येण्यावर घड्याळ लावून घ्यावं. एखाद्याला मित्र मानले तर त्याच्यासाठी तो कितीही मेहनत घेत असे आणि ती सुद्धा मनापासून. काहीही अपेक्षा न करता. किरणचा मित्रपरिवार मोठा होता. आणि मित्रांच्या सहवासात राहायला – ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन – त्याला आवडायचं.

किरण खूप बोलका होता. मित्रांना जेवायला आणि फेलोशिपसाठी बोलवायला त्याला फार आवडायचं. विशेषतः क्लबमध्ये नवीन आलेल्या जोडप्यांना तो आवर्जून बोलावत असे. ड्रिंक्स घेताना तो मस्तपैकी खुलत असे. मग वेगवेगळ्या विषयावर तो बोलायला चालू करी.  रोटरीपासून राजकारण, वाइल्ड लाइफ पासून फोटोग्राफी अश्या अनेक विषयांवर तो मनापासून बोले. पार्टीज त्याला मनापासून आवडत. आणि पार्टीत तो असला की मजा येत असे. त्याला अनेक विषयांमधील माहिती होती. आणि ती इतरांना सांगण्याची इच्छा होती, हातोटी होती. संध्या ही अभिनेत्री किरणचा “क्रश” होती. त्यावरून आम्ही त्याला सगळे जाम चिडवत असू. पण तो सुद्धा ते अगदी खिलाडूपणे घेई.

किरण म्हणजे नंबर एकचा गोष्टीवेल्हाळ. गोष्टी रंगवून सांगायची त्याची सवय होती. त्याच्या आयुष्यात घडलेल्या कित्येक गोष्टी मी अनेकदा ऐकल्या असल्या तरी प्रत्येक वेळी तीच गोष्ट तितक्याच उत्साहाने आणि तपशिलाने सांगायचा. नंतर मात्र म्हणायचा की ‘तुला तर हे माहीतच आहे’. पण त्याचा गोष्ट संगण्यातला उत्साह पाहून त्याला ही गोष्ट मी पूर्वी तुझ्याकडून अनेकदा ऐकली आहे हे सांगायचा मला कधी धीर झाला नाही.

Wild life photography त्याचा आवडता विषय. वन्य जीवनाबद्दल त्याला खूप छान माहिती होती. त्यावर तो अनेक क्लब्जमध्ये कार्यक्रम करीत असे. आणि त्याच्या संग्रहात अनेक फोटो आणि व्हीडियोज सुद्धा होते. प्रत्येक वेळी ते फोटो पाहताना त्याची तीच गोष्ट परत ऐकणे बंधनकारक होते. जणू वन्य प्राणी त्याचे जवळचे नातेवाईक आहेत इतक्या प्रेमाने तो त्यांची “मटकासुर, माया, छोटा मटका, सुलतान, तारा, गब्बर” अशी नावे घेत असे. लोक ‘भुते, युद्ध’ यांच्या कथा जश्या रंगवून रंगवून सांगतात तश्या तो या वन्य प्राण्यांच्या कथा रंगवून सांगत असे. शेकरू नावाचे एक हरीण आहे त्यावरून मला प्रेमाने तो “शेखरू” म्हणे.

विविध फोटो संग्रह करण्याची किरणला मोठी आवड. रोटरीतील अनेक फोटो / फिल्म्स त्याच्या संग्रही होते. हिंदी इंग्लिश सिनेमातील प्रसिद्ध सुप्रसिद्ध घटनांच्या आणि संवादांच्या नावाजलेल्या अनेक प्रसिध्द क्लिप्सही त्याच्याकडे होत्या. Members आणि anns  चे वाढदिवसाचे दुर्मिळ फोटो पोतडीतून काढून तो फ्लायर्स करत असे.

किरणची दुसरी एक बाजू होती. तो काही वेळा एखाद्या लहान मुलासारखा वागायचा. हट्टीपणा करायचा. एखादी गोष्ट नाही करायची तर नाहीच करणार. कुणावर पटकन रागवायचा, भांडायचा आणि रुसायचासुद्धा. त्याने एखाद्या मनापासून केलेल्या गोष्टीचे एखाद्याने त्याला मनासारखे क्रेडिट दिले नाही किंवा नामोल्लेख केला नाही तर अस्वस्थ व्हायचा. “जाऊ दे रे किरण. विसरला असेल!” असे सांगितले तरी समजूतीने घ्यायचा नाही. “जाऊ दे काय जाऊ दे?” असे रागाने म्हणायचा. मग त्या विसरणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने किरणच्या खास शैलीतील “किरणोत्सर्ग” व्हायचा. ऐकणाऱ्याची मात्र जाम करमणूक व्हायची.

किरण क्वचित वृंदावर सुद्धा रागवायचा. पण माझ्यावर किंवा गिरिजावर मात्र कधी तो रागावला नाही. उलट आम्हीच त्याला काही वेळा रागवायचो. म्हणजे रागावल्यासारखे करायचो. कारण डॉक्टरने सांगितलेले सुद्धा तो ऐकायचा नाही. हट्टीपणा करायचा. पण आमचे म्हणणे मात्र निमूटपणे ऐकून घ्यायचा.  मग म्हणायचा की, “गिरिजाला मी काही बोलणार नाही रे बाबा! कारण मग ती मला फिश करून बोलावणार नाही.”  मासळीचे जेवण त्याला मनापासून आवडायचे. नंतर हळूच मिशीतल्या मिशीत हसत गिरिजाला म्हणायचा की “सारस्वत लोक मला फार आवडतात. बाय द वे, बरेच दिवस झाले मला फिश करून बोलावले नाहीस.”

किरणची तब्येत खालावत चालली आहे हे गेल्या दोन वर्षांपासून माहीत होतं. पण तो इतक्या लवकर आपला निरोप घेईल याची कल्पना नव्हती. २८ जानेवारीला बावरची नाईटला त्याला शेवटचं पाहिलं होतं. त्यावेळी अजून वीस दिवसांनी तो आपल्यात नसणार याची काहीच कल्पना नव्हती. दुर्दैवाने तो गेल्याची बातमी कळली तेंव्हा मी पुण्यात नव्हतो. वृंदा, यज्ञदत्त, नेहा व इतर कुटुंबीयांनीसुद्धा किरणची शेवटपर्यंत साथ केली, सेवा केली.

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मृत्युलोकात जन्म घेतल्यावर एक ना एक दिवस प्रत्येकालाच जायचे आहे हे जरी खरे असले तरी आपल्या जवळच्या व्यक्तीचा वियोग चटका लावून जातो, पोकळी निर्माण करून जातो. किरणची आठवण सतत येत राहील. त्याची उणीव कायम भासत राहील. किरण गेल्याबद्दल RCPS चे नुकसान तर आहेच पण माझे आणि गिरिजाचे वैयक्तिक नुकसान खूप आहे. मला वाटतं की अशीच भावना अनेकांची असेल.

असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीबरोबर जो ऋणानुबंध स्थापित होतो, मग तो प्रेमाचा, रागाचा, द्वेषाचा, कर्जाचा कुठलाही असू दे, तो परत पुढील जन्मात फलद्रूप होतो, manifest होतो. किरणशी या जन्मात जुळलेला प्रेमाचा अनुबंध पुढच्या जन्मात सुद्धा carry forward होईल आणि तो परत पुढच्या जन्मात मित्र किंवा इतर कुठल्या नात्याने जवळ येईल अशी मला खात्री आहे.

तो गेल्यानंतरच्या रविवारी त्याच्या घरी गेलो होतो. दार उघडताना क्षणभर वाटलं की जणू किरणच दार उघडतो आहे. असं वाटलं की नेहमीप्रमाणे झब्बा आणि पायजमा घातलेला किरण दार उघडेल आणि म्हणेल “ये रे शेखरू”. पण……….मनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाल्याची भावना आली.

We will miss you Kiran..always.

त्याला सद्गती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रो. चंद्रशेखर यार्दी

संवेदनशील किरण

दिनांक 17 फेब्रुवारी ‘ 24 सहकार नगर मधल्या विद्या विकास स्कूल मध्ये सकाळी 10 वाजता माझ्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग शाळेने आयोजित केला होता. सकाळी घाईघाईत whatsapp नकोच उघडायला नाहीतर उशीर होतो निघायला म्हणून कार मध्ये बसलं की whatsapp सुरु करू असं ठरवलं. मला 7 वाजताच निघावं लागणार होतं कारण प्रॉपर्टी सदाशिव पेठेतून घेऊन 8 पर्यन्त सगळी व्यवस्था बघण्यासाठी शाळेत पोहोचायचं होतं.7 च्या सुमारास कार मध्ये बसले आणि लागोलग पहिलाच msg शेखर चा बघितला. खूप वाईट बातमी होती. आपल्या किरणने या जगाचा निरोप घेतला होता.
वाचल्या बरोबर डोळ्यातून खळकन अश्रू ओघळले. डोळे मिटले आणि मनातल्या मनात किरणला आठवलं. लगेच whatsapp ग्रुपवर पण श्रद्धांजली वाहिली.वृंदाकडे धाव घ्यावीशी वाटत होती. पण एकीकडे प्रयोग, माझी मुलं, commitments !!! तशीच पुढे गेले.. वृंदा एकदम डोळ्यासमोर आली.. कशी असेल ती? तिला कदाचित माहित असावं म्हणा, यज्ञ, नेहा असतील का जवळ? तो आदल्या दिवशी परत जायला निघणार होता. तिची बहीण असेल, मग कळलं गिरीजापण तिच्याजवळ होती. मनातले काहूर सावरत शाळेत पोहोचले.

वास्ताविक किरण अगदी अलीकडे म्हणजे जायच्या 10च दिवस आधी भेटला होता मी वृंदाबरोबर नाट्य वाचन प्रॅक्टिस करायची म्हणून गेले तेव्हा. तब्येत बरी नव्हतीच त्याची. चेहऱ्यावरून क्षीण दिसत होता. दुसऱ्याच दिवशी त्याला ऍडमिट केल्याचं पण वृंदा कडून कळलं. छान.. आता सगळं व्यवस्थित पार पडेल आणि तो बरा होऊन मस्तपैकी घरी पण येईल. आपण नेहमीच positive विचार करतो तसाच मी केला.दुसऱ्याच दिवशी त्याची तब्येत थोडी आणखी serious असल्याचं कळलं. मन मानायला तयार नव्हतं. अखेर ती बातमी आलीच. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच अंतिम सत्य आहे.

किरण बद्दल काय बोलावं?? गमत्या स्वभावाचा, जंगल, प्राणी, पशु पक्षी, निसर्ग, फोटोग्राफी या सगळ्यांची मनापासून आवड असलेला मित्र, आवडत्या गोष्टींमध्ये रमणारा, रोटरीत मित्र मैत्रिणींचा सहवास मनापासून आवडणारा, भक्कम व्यक्तिमत्वाचा.. पाहता क्षणी दरारा वाटावा असा आपला मित्र. दर वर्षी अनंत चतुर्दशी ला रोटरी पिकनिक जाते तशीच एक वर्षं महाबळेश्वर ची ट्रिप मला आठवते. किती किती फ़ोटो काढून त्याची portraits बनऊन ती सगळ्यांना पाठवून आपलंसं करून टाकलं होतं त्याने. माणसाच्या छोटया छोटया कृतीतून प्रेम, आपुलकीची भावना व्यक्त होते ना? ती अशी. नकळत ती व्यक्ती जवळची वाटू लागते. किरणचा हा स्वभाव आणि ही कृती अशीच होती.रोटरी मधल्या प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या फोटोचे portraits पाठवणारा किरण हा *एकमेव मित्र*..

बाहेरून भक्कम वाटणारा किरण मनाने मात्र मृदू, संवेदनशील होता हे अनेक गोष्टीतून, त्याच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचे.. आज तो आपल्यात नाही.. विश्वास बसत नाही. पण काही वेळा सत्य स्वीकारावं लागतं.

नियतीपुढे इलाज नसतो.. मन मात्र मानत नाही…तो इथेच आहे, आपल्यात.. नक्की असं अजून वाटतंय..
किरण, जिथे आहेस तिथे सुखात रहा.. तू सदैव आमच्या मनात नक्कीच आहेस

रोटे अश्विनी अंबिके

मला भावलेला किरण

क्लब मध्ये जॉईन व्हायच्या आधी जेव्हा जेव्हा इंडक्शन आधीच्या मिटींगला यायचं तेव्हा किरण स्वागताकरता असायचा. स्वाभाविकपणे त्याच्याबरोबर गप्पा आणि एक आपुलकी निर्माण झाली. नंतर डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सच्या वेळेला किरणच्या सपोर्ट टीम मध्ये मी काम केलं. आणि यावेळी जाणवलं की हा माणूस बाहेरून नारळ किंवा फणसासारखा आहे पण तेवढाच मृदू आणि मधुर असा याचा स्वभाव आहे. आणि त्या तीन दिवसात आमची खूप छान मैत्री जमली. मदतीला नविन बकरा मिळालाय कापून काढू असा जो इतरत्र अनुभव येतो तो किरण बद्दल मला नक्की नाही आला क्लब मधल्या सगळ्या लोकांची वैयक्तिक ओळख त्यांनी करून दिली. मी क्लब मध्ये पटकन रुळलो त्याचं श्रेय इतरांच्या बरोबरीने किरणला नक्कीच होतं. जंगली प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या फोटोग्राफीमध्ये रमणारा आणि आवर्जून हे फोटो मला पर्सनल whatsapp ने पाठवणारा किरण. तरुणपणी वास्तुशास्त्र आणि त्याचबरोबर ज्योतिष्य याचा सखोल अभ्यास केलेला किरण गप्पांमध्ये या आठवणी नेहमी शेअर करायचा. तरुणपणी मोटर सायकल वरून भरपूर प्रवास करणारा किरण दुःखाने लग्नाच्या आधी एकाही मुलीला मोटरसायकलवर डबलसीट घेतलं नाही हे सुद्धा गमतीत सांगायचा. वेगळ्या वेगळ्या अवेन्यूची जशी जबाबदारी येत गेली तसतसा माझ्या सपोर्ट टीम मध्ये किरणचा हक्काने समावेश असायचा. हळूहळू किरणवरून त्याचं नाव मी दाढी आणि त्यांनी माझं नाव टाकल्या असेच करून ठेवले होते. किरण मध्यंतरी जरी क्लब मध्ये नव्हता तरी सतत मी त्याच्यामागे परत ये असा हट्ट हक्काने करायचो. लोणावळा ट्रिप असू दे की ब्रह्मगिरी ट्रीप, क्लब पिकनिक अश्या सहली आणि त्याचबरोबर चंद्राच्या कलेप्रमाणे घट्ट होत जाणारी आमची मैत्री नियतीने निष्ठुरपणे तोडली. एकाच नावाचे दोन चांगले मित्र गमावणे यासारखे अजून वाईट दुर्दैव काय असू शकते? किरण आणि मी व्यवसाय निमित्ताने कधीच एकमेकांना भेटलो नव्हतो मात्र मने जुळली की मैत्रीचा धागा किती घट्ट होऊ शकतो याचा एक बोलकं उदाहरण म्हणजे किरण. किरणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्याचबरोबर हे दुःख सहन करायची ताकद वृंदा आणि सर्व कुटुंबीयांना देवो.

रो. अजय गोडबोले

किरण - एक सहृदयी दिलदार मित्र

किरण एक सच्चा दिलदार माणूस होता. त्याचे वाइल्ड लाइफ प्रेम तर आपल्या सर्वांना माहिती आहेच. तशीच त्याची फोटोग्राफी ही फारच छान होती. ते फोटो पाहताना आणि त्याबरोबरच त्यांचे वर्णन करताना किरण रंगून जायचा…आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करायचा. त्यामुळे प्रत्यक्ष त्यावेळी काय काय घडले असेल त्याची कल्पना यायची. एकदा जंगलातल्या हत्तीने उलटा फिरून कशी यांच्यावरच चाल केली त्याचे वर्णन ऐकताना
मनाचा थरकाप उडाला होता. किरणला प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्ये माहीत होती, त्याचा अभ्यास होता. त्या- त्या प्राण्याचा फोटो कधी, कुठे काढला याचे वर्णन तो इतकं छान करायचा की परत ऐकतानाही तोच थरार वाटायचा.’ मोठा मटकासूर‘

आणि ‘ माया’ वाघिणीची संपूर्ण माहिती किरणला होती. त्यांना किती बछडे आहेत त्यांची नांवे सर्व तो सांगायचा. छान वाटायचं ऐकताना.
किरण खरा खवैया होता. चिकन बिर्याणी, फिशचे सर्व प्रकार त्याला आवडायचे. मला माहित नसलेल्या फिशची रेसिपी तो सांगायचा आणि आता next time ती रेसिपी करूया म्हणायचा. Air fryer च्या रेसिपी तो मला करून दाखवणार होता.

वृंदा आणि किरण पूर्ण रोटरी फॅमिलीशी जोडलेले आहेत. वृंदा मला माझ्या मोठ्या बहिणी सारखी आहे… तिच्या समुपदेशनाचा मला खूप फायदा झाला आहे. किरण आणि वृंदाशी खूप मनमोकळ्या गप्पा व्हायच्या… आता उरल्या फक्त आठवणी… एक सहृदयी माणूस गमावल्याचे खूपच दुःख होते, वाईट वाटते… ओम शांती

ॲन रोहिणी पालेकर

Loss of An Amazing Rotarian

It was a sad morning on 17th February when we came to know about Kiran’s sad demise the earlier night. Kiran was very popular in our club because of his active participation in service projects, wild life presentations and his photography skills and creativity.

Kiran joined our Rotary club, a few months before I became a member. I remember during my apprenticeship days (waiting to be inducted as a member of our Club), when PP Anil was the president, our club had organized a photography exhibition at Balgandharva. Kiran was actively involved in that, and that was my first interaction with him. During the exhibition, he was explaining the positive and negative aspects of the photos which were exhibited. In the subsequent wildlife photography exhibitions organized by our club, Kiran’s active participation was there and he also got several exhibits of wildlife especially Tiger photos of a renowned wildlife photographer.

Professionally, Kiran was a quality Trainer and auditor and has helped many companies to get their quality systems and vision in place and also helped them with the ISO and quality certifications.

When I was the President in Rotary’s centennial year 2004-05, Kiran was the Chairman of the Programme Committee. In that year Kiran and Vrinda did a very good job, and arranged excellent speakers, as always. He has throughout been actively involved in all our club activities especially the service projects, ekankika, picnics and the likes. He was our Club President in 2008-09. Subsequently he successfully completed many District assignments.

Kiran has been an active member of our ‘Katta’ whatsapp group. Wildlife photography was his passion, and he shared many wildlife videos with us. We all will miss the amazing photos of Tigers which very often Kiran sent us. We also cannot forget his creativity in sending personalized photos of each one of us on our birthdays.

My last meeting with Kiran was just a few hours before he passed away. I visited the hospital to enquire about his health. Kiran saw me at the door and asked me to come inside his hospital room. He was very alert and possibly had sensed his time is up. I touched his hand and prayed for Kiran. This last interaction with Kiran will be etched in my memory. In Kiran’s sad demise, we have lost a very good friend and an active and sincere Rotarian.

Our heartfelt condolences to Vrinda and her family. Vrinda, as we all know is a strong lady and I am sure she will continue to do the unfinished job of Kiran in our club. We are all with you Vrinda.

Om Shanti.

Rtn Ujwal Marathe

टर्न अराउंड स्पेशालिस्ट

हा फोटो माझ्या संग्रहात सापडला. किरण आपल्या क्लबमध्ये आला त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याची हुशारी आणि त्याच्या विषयात असणारा गाढा अभ्यास. त्यावेळी त्याचं एक स्पेशलाईजेशन होतं ते म्हणजे टर्न अराउंड स्पेशालिस्ट.त्यावेळी हे क्षेत्र तसं नवीनच होतं विविध कारणांनी आर्थिक दृष्ट्या आजारी असणारे औद्योगिक व्यवसाय जे बंद पडण्याच्या मार्गावर असायचे त्याला प्रॉफिट मेकिंग एंटरप्राईज मध्ये रूपांतर करणे हे त्याचे खास वैशिष्ट्य होतं .आमच्या दोघांचा एक कॉमन मित्र त्याच्या व्यवसाय अडचणींमध्ये सापडला होता. त्यामध्ये आवश्यक असे सर्व बदल त्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचे अवघड काम किरण ने लिलया करून दाखवलं होतं. विषयाची नेमकी जाण आणि आवश्यक असणारे धडाकेबाज नेतृत्व गुण त्याच्याकडे होते. असा हा हरहुन्नरी किरण आपल्यात नाही याचा खेद वाटतो. 

रो. यशवंत गोखले 

Kiran - a Versatile Person

When I got the sad news about Kiran, first I could not believe that. I knew that he was hospitalized but recovering and was to be discharged from the hospital soon.

Kiran, as I knew was very straight forward person and out spoken. He never compromised on the values. From outside he seemed to be a very aggressive person but from inside he was very soft and kind hearted person. Those who came in close contact with him will endorse this. He always took keen interest in what he believed to be his forte, may be any technical matter or wildlife or nature. He was also a good photographer particularly, his wild life photography was superb. He was also a good story teller. While listening to his experiences one could feel that he had the knack of presenting the picture in front of you.

In Rotary activities, he took keen interest including his participation in club Ekankika. I still remember his lead role in “ब्लादेन चक्क लेलेंच्या घरी” which was a super hit. Kiran was very versatile person and whatever he did he did it with full devotion.

In Kiran, we have lost a good friend and well wisher of our club.

Rtn Gurunath Palekar 

Memories
Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016