Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin 8th August 2022

Distribution of baby warmers to the Primary Health Centres “ – RCPS global grant project commenced with a big bang! We completed installation of baby warmers in twelves PHC in a record time!!

Weekly Programs

1. निसर्ग तुमच्या दारात!
2. Vijay Divas
3. स्वर अनुराधा – एक सुरेल सांगितिक प्रवास

Project Reports

1. ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम
2. उपेंद्र लिमये मुलाखत
3. Interact Installation at Madhyamik Vidyalaya

Beyond Boundaries

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांचा – “बिगर हुंडा सामूहिक विवाह ” – सामाजिक उपक्रम

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

साज और आवाज

भारतीय संगीत वाद्ये ही खरे तर मैफिलीची वाद्ये, परंतु आपल्या हिंदी सिनेमा सृष्टीतील संगीतकारांनी हिंदी गाण्यांमधे त्याचा अतिशय सुंदर वापर केलेला आहे.

या सदरात आपण अशा गाण्यांची माहिती घेऊन, ती गाणी ऐकणार पण आहोत.

भाषा भगिनी

ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity, Equity, and Inclusion” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे. त्यावर आधारित “Diversity and Inclusion- अर्थात भाषा भगिनी ” हे दृकश्राव्य सदर …

Our Participation In District

  1. The Inaugural Session of Lakshya, a training program for DGs and DGEs
  2. जश्न ए जोश

नवे मित्र: रो. सचिन जोगळेकर

नवे मित्र: रो. सचिन जोगळेकर

Ann प्रतिमा दुरुगकार :

मे २०२० मध्ये सचिन जोगळेकर आपल्या क्लब मध्ये मेंबर झाले. श्रीकांत ने (दाते) त्यांना क्लब मध्ये आणले. पुण्यात डेक्कन वर टिपिकल मध्यम वर्गात सचिन वाढले. शिक्षण, खेळ आणि जीवन विषयक मूल्य यांचे बाळकडू त्यांना आजोबा (आईचे वडील)दादा करमरकर यांचे कडून मिळाले. दादा कायमच त्यांच्यासाठी आदर्श राहिले. सचिन यांचे शिक्षण बालशिक्षण मंदिर ,विमलाबाई गरवारे प्रशाला, मॉडर्न कॉलेज आणि भारतीय विद्यापीठ या ठिकाणी झाले व तेBE (Mech)झाले.त्यानंतर MBA(Marketing) त्यांनी Symbiosis मधून केले.

शालेय जीवनापासून खेळाची खूप आवड, त्यामुळे बॅडमिंटन ग्रुपचे कायम कॅप्टन राहिले. त्यातूनच पुढे स्पोर्ट्समध्ये करिअर करावे असेही वाटू लागले .पण त्यातील रिस्कचा विचार करता नंतर त्यांनी तो विचार सोडून दिला. तरीही बॅडमिंटन खेळणे चालूच राहिले. बॅडमिंटनच्या टूर्नामेंट्स मध्ये सचिन यांचा नेहमीच सहभाग असे.तेथेच त्यांना रोटरी ची माहिती मिळाली.या बॅडमिंटननेच त्यांना रोटरीत आणले .त्याचे असे झाले की प्रमोद जेजुरीकर व ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत असत. त्यांनी सचिन यांना ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे साउथ ‘मध्ये १९८८साली इंडक्ट केले. सचिन यांच्याच म्हणण्यानुसार :रोटारॅक्ट झाल्यावर लाजाळू व न बोलणाऱ्या सचिन यांच्या व्यक्तिमत्त्वात एकदम बदल झाला आणि ते बोलके व सोशल झाले.” १९९१-९२मध्ये ते रोटरॅक्ट प्रेसिडेंट झाले. त्यानंतर District Director International Services हे पद त्यांनी ग्रहण केले आणि त्याचवेळी त्यांना Crompton Greaves मध्ये मुंबईला नोकरी मिळाली.

नवीनच लग्न झाले होते आणि ते मुंबईकर झाले. वर्षा यांच्याबरोबर मुंबईत सुरू केलेले सहजीवन जरी आर्थिक ओढाताणीचे होते तरीही तो अतिशय सुखी सहजीवनाचा काळ होता ,असे त्यांना वाटते. पुढे Thermax Culligan, ICICI Prudential, Tata AIA Life या कंपन्यांमध्ये नोकरी करीत असताना ते पुणे, केरळ,मुंबई असे नोकरीनिमित्त फिरत राहिले. या सर्व काळात ते जवळजवळ १५ देशात फिरले. नंतर मात्र विषय २०१६ मध्ये त्यांची भेट अरविंद परांजपे (जे सकाळ अर्थ विश्व मध्ये लिहितात व ज्यांना आपण व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड दिले होते) त्यांच्याशी झाली आणि मग Sarth Wealth Advisors Pvt.Ltd. या त्यांच्या कंपनीत दोघांनी भागीदार म्हणून व्यवसाय चालू केला आणि सचिन हे पुण्यात स्थिरस्थावर झाले.  सचिन यांचे कुटुंबात आई, लग्नानंतर पुण्यातच स्थायिक झालेली बहीण कोल्हटकर, मुलगा यश हे आहेत. यशने सिम्बॉयसिस मधून लिबरल आर्ट केले असून तो Schabang Banglore येथे नोकरी करत आहे. सचिन यांच्या पत्नी वर्षा या मागच्याच वर्षी दुर्धर आजाराने अनंताच्या प्रवासास निघून गेल्या. पण जाताना त्यांच्या सहजीवनाच्या छान आठवणी मागे ठेवून गेल्या. या आठवणींच्या बळावर त्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे.

यावर्षी त्यांनी Service -non medical director ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे .त्यांच्या perfectionist स्वभावाचा फायदा या avenue ला नक्कीच होईल. त्यांच्या जीवनातील आणि रोटरीतील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

पीपी अंजली रावेतकरचे वर्ष संपता संपता करोना जगभर हातपाय पसरू लागला आणि मग आले लॉकडाऊन. जग ठप्प झाले.

पण आपल्या क्लबच्या ऑनलाईन मीटिंग चालूच राहिल्या. एवढेच नव्हे तर नवीन मेंबर्स सुद्धा येत राहिले.

फिजिकल मीटिंग नसल्यामुळे या नवीन मेंबर्सची फारशी ओळख झाली नाही. या सदरातून आपण ती करून घेणार आहोत.

Upcoming Programs

८ ऑगस्ट २०२२
श्री. सुशान्त कुलकर्णी
‘पत्रकारितेतील रोचक अनुभव’
२२ ऑगस्ट २०२२
Honorary Member Induction
२९ ऑगस्ट २०२२
भटकंती पक्षी जगताची …. Let’s see the world of birds through Annette Ojas Gadgils’s lenses

Support Group

August month support group
  • Rtn. Dr Bharati Dole
  • Rtn. Ravikiran Desai
  • Ann Jayashri Nawathe
  • PP Sharad Dole
  • PP Rujuta Desai
  • PP Anand Nawathe

भावपूर्ण श्रद्धांजली

पीपी उज्वल मराठे ह्यांच्या मातोश्री  सौ. पुष्पाताई ( मृदुला) मराठे ह्यांना ३० जुलै रोजी वार्धक्यामुळे देवाज्ञा झाली . मृतात्म्यास सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !