Skip to main content
Beyond Boundaries

Beyond Boundaries

By August 5, 2022August 6th, 2022No Comments

Beyond Boundaries

Rotary Club of Pune Shivajinagar is known and appreciated for its mega projects like Industrial Fairs and District Enkankika.  Through constant innovation, we are consistently delivering and doing good for society.

Having said this, there are many clubs within our district and beyond who are successfully running some flagship projects.

Through “Beyond Boundaries” we would like to bring glimpses of such projects which will be an inspiration and motivation for us in the coming years!!

– PP  Shirish Kshirsagar

नमस्कार,

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे गेली २५ वर्ष सामुदायिक विवाह हा समाज उपोयोगी उपक्रम राबवत आहे

मावळ भागातील विविध आदिवासी दुर्गम भागात काम करताना असे लक्षात आले कि, लग्न करायचे ठरले कि पालकांची  आर्थिक दृष्ट्या फार ओढाताण  व्हायची. बऱ्याच्यादा आपली जमीन गहाण ठेऊन सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न केली जायची

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे ने  ह्या गोष्टीचा अभ्यास करून ह्यातून मार्ग शोधला आणि  १९९६९७ साली बिगर हुंडा सामूहिक विवाह ची सुरवात केली आणि गेली २५ वर्ष ती चालू आहे

सामूहिक विवाह ची तयारी महिने आधी सुरु होते, संपूर्ण मावळ तालुक्यात प्रत्क्षय फिरून सर्व सदस्य प्रचार करतात. आता बदलत्या काळानुसार इतर माध्यमांचा पण वापर होतोलग्न सोहळ्या ला ३००० ते ४००० लोक उपसथतीत असतात. सामूहिक विवाह सोहळा असला तरी सर्व विधी, सोपस्कार घरच्या लग्ना सारखे केले जातात. कुठेही वर वधू  वराधी याना सामूहिक लग्न आहे हि जाणीव होत नाही

लग्नसोहळ्यात वर वधू  ना पोशाख, गॅस सिलेंडर आणि शेगडी, संसार उपयोगी भांडी, दागिने इतर बऱयाच वस्तू क्लब तर्फे दिल्या जातात . सदर सोहोळ्या  करता वर वधू  कडून एकही पैसा घेतला जात नाही

आज पर्यंत १५०० हुन अधिक जोडप्यांचे विवाह झाले, आणि काही जोडप्यांच्या दुसऱ्या पिढीचे विवाह सुध्दा ह्या सोहोळ्यातच पार पडले आहेत.

ह्या उपक्रमाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये पण झाली आहे. गेली २५ वर्ष हा उपक्रम यशस्वी होण्यामागे जी खरी शक्ती आहे ते सर्व क्लब सदस्याचे परिश्रम, दानशूरता आणि रोटरी वर असलेले प्रेम आणि विश्वास हेच आहे.

आपलाच,
रो. आनंद विजय आस्वले
अध्यश  (२०२१२२)
रोटरी क्लब तळेगाव दाभाडे.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016