Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin October 2023

अध्यक्षीय

नमस्कार.

सप्टेंबर चा महिना तसा धामधुमीचा गेला नाही का? ‘कम सप्टेंबर’ चा महिमाच तसा.

लिटरसी मंथ म्हणून सप्टेंबर महिना साजरा होतो आणि त्याला अनुसरून आपण काम ही केलं.

अगदी ऐनवेळी ठरवून आपण डिस्ट्रिक्टच्या होकेशनल अवॉर्ड सेमिनार मध्ये सहभागी झालो. त्यानिमित्ताने मुळशी खोऱ्यातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या श्रीयुत अनिल व्यास यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याशी आपली ओळख झाली आणि आपण त्यांना सन्मानित करू शकलो.

सध्या फोकस असलेल्या अंगणवाडीसाठी काम करणाऱ्या सौ विद्याताई घुगरे ना आपण टीचर्स अवॉर्ड दिलं तर दुसऱ्या शिक्षिका अगदी निराळ्या क्षेत्रात , डान्स थेरपीमध्ये काम करणाऱ्या सुचित्रा दाते ना. त्यांनी आपल्या सगळ्या मेंबर्सना भरत नाट्यमय करून टाकलं. धमाल आली.

आजपर्यंत पावसाळ्यात हिंडायला जायचं म्हणजे भिजायचं आणि निसर्गातील हिरवाई डोळ्यांनी पिऊन घ्यायची एवढेच करायचे मी. पण यावेळी 11 सप्टेंबरच्या पर्जन्य सहलीसाठी श्री  भानुदास आपल्याबरोबर आले आणि त्यांनी वेगवेगळ्या वृक्षांची, वनस्पतींची, पावसाळी भाज्यांची ओळख करून दिली .आपलं अनुभव विश्व समृद्ध झालं .

डिस्ट्रिक्ट एकांकिकाच्या स्पर्धेच्या कामाने वेग घेतला. त्याचे वेध वर्ष सुरू होण्यापूर्वीच लागले होते. PETS साठी सगळे COPS Mates जमले तेव्हा समारोपाच्या कार्यक्रमात म्युझिकल व्हिडिओ प्रोजेक्ट करून आपण लोकांना या स्पर्धेसाठी निमंत्रण दिलं. रो. नितीन नाईकने हे इन्व्हाईट खूप छान करून दिलं होतं. अश्विनीनेही आवर्जून एक व्हिडिओ शूट करून घेतला आणि सगळ्या क्लबसना तो व्हिडिओ पाठवून सहभागी व्हायला अपील केलं . प्रेक्षकांना निमंत्रण देण्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ तयार झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष स्पर्धांची.
या साऱ्या गडबडीत डिस्ट्रिक्ट लिटरसी सेमिनार ही 30 तारखेला होऊन गेला. डॉक्टर स्वाती मुजुमदार सन्माननीय पाहुण्या होत्या. खूप छान बोलल्या. ओघवती भाषेत त्यांनी आपले अनुभव सांगितले. आपण हा होस्ट केला .

सायकल भरारी ,धागा, डिजिटल ॲप सारखे प्रोजेक्ट्स मार्गी लागत आहेत . अंधशाळेतील इंटरऍक्ट क्लबचं इन्स्टॉलेशन झालं, आपटे मूकबधिर शाळेतील मुलांच्यासाठी काम झालं. बरं चाललंय .जमेल तसं करत राहू.
भेटू लवकरच दिवाळी अंकाच्या माध्यमातून.

प्रेसिडेंट स्मिता जोग

Rotary Masters - September 2023

    • Rtn Nitin Abhyankar
    • Rtn Chandrashekhar Yardi
    • Ann Anjali Godbole

Rotary Vishesh

Know more about what is happening in Rotary World …

Programs done in Previous Month

1. Teachers Award
2. Birthday fellowship at Tamhini
3. एकांकिका स्पर्धेची धामधूम

Projects done in Previous Month

1. Rotary Ideal study conducted at Muktainagar school
2. District Vocational Awards
3. RYLA at Modern College

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

मनाचिये गुंती

मानवी मनोव्यापारांचा लेखाजोखा एका मानसोपचार तज्ञाच्या नजरेतून …

Support Group

October month support group
 • Rtn Shrikant Bhave (Leader)
 • Ann Sarita Bhave
 • Rtn Ravi Joshi
 • Ann Swati Joshi
 • Rtn Dr Suryaprakasa Rao
 • Rtn Dr Shobha Rao
 • Ann Kalyani Pendharkar
 • Rtn Parag Kapre
 • Ann Pallavi Kapre
 • Rtn Abhishek Jadhav
 • Ann Suvarna Jadhav