Skip to main content

7th August, 2023

Induction of Mr. Amar Oak as honorary member

ॲन रोहिणी पालेकर

ऑगस्ट महिन्यातला पहिलाच कार्यक्रम सुरेल झाला. प्रसिद्ध बासरीवादक श्री. अमर ओक यांनी आपल्या क्लबचे ‘ मानद सभासदत्व’  स्विकारले. ही रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा आणि पुणे अपटाऊन या दोन क्लब बरोबर जॉईंट मीटिंग होती. प्रथम प्रे. स्मिता जोग यांनी आपल्या क्लबची माहिती आणि काही ठळक प्रोजेक्ट सांगितले. नंतर पुणे अपटाऊन आणि शनिवारवाड्याच्या प्रेसिडेंटनी त्यांच्या क्लबचे प्रोजेक्ट आणि माहिती सांगितली. पी. पी. मानस वाघ यांनी ‘ ऑनररी रोटरियन’ विषयी सांगितले. प्रे. स्मिता जोग यांनी श्री. अमर ओक यांना रोटरी किट आणि सर्टिफिकेट दिले आणि प्रे. कर्णिक यांनी रोटरी पिन लावली.
ॲन सीमा महाजन यांनी श्री. अमर ओक यांची मुलाखत घेतली. त्यातून त्यांचे बालपणापासूनचे पैलू उलगडत गेले. बासरी वादनाची आवड त्यांना वयाच्या 5 व्या वर्षांपासून होती. गुरु श्री. साने यांच्याकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. आई- वडिलांनी आधी शिक्षण आणि मग कला असा आग्रह धरल्याने त्यांनी कॉम्पुटर सायन्स मध्ये मॉडर्न कॉलेज मधून मास्टर्स केले. बासरी वादनाचे शिक्षण ही सुरूच होते. स्वामी गोविंद गिरी म्हणजेच किशोर व्यास यांच्या बरोबर ‘ भागवत कथे’ मधे बासरी वादन करण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. नंतर एकामागोमाग एक असे चांगले कार्यक्रम त्यांना मिळत गेले त्यामुळे नोकरीचा विचार बाजूला ठेवून त्यांनी पूर्णवेळ  बासरी वादक व्हायचे ठरवले. पंडित केदार बोडस यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. कुठल्याही कलेत प्राविण्य मिळवायचे असेल तर खूप तपश्चर्या केली पाहिजे, प्रचंड मेहनत करून कलेची उपासना केली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तानसेन चे उदाहरण दिले. बासरी वादनासाठी रियाज आणि प्राणायाम आवश्यक आहे.
शाळेत असताना प्रथम ” गवळणींचा कान्हा” या कार्यक्रमात बासरी वादनाची संधी त्यांना मिळाली. तेथील काही गंमतीशीर अनुभव त्यांनी सांगितले. झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय झालेल्या ” सारेगम लिटिल चॅम्प” मधील कलाकार, परीक्षक यांचेही अनुभव श्री. अमर ओक यांनी सांगितले.  सीमानी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की पुढची पिढी ही चांगले काम करते आहे. पूर्वीच्या मानाने आता टेक्निकल गोष्टी बदलल्या आहेत.

 ” सूर निरागस हो” या गणेश वंदनेने त्यांनी बासरी वादन सुरू केले. ‘कुहू कुहू बोले कोयलीया’ फारच बहारदार वाजविले. मोठ्या आकाराच्या बासरीवर क्लासिकल बेसची गाणी वाजवितात असे म्हणून त्यांनी ‘ जा तोसे नही बोलू कन्हैया ‘ तर छोट्या आकाराच्या बासरीवर ‘ हसता हुवा नु रानी चेहरा’ हे गाणे वाजविले. खास आग्रहाखातर ” हिरो” सिनेमातील गाजलेली धून वाजवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  सौ. विनिता ओक यांनाही संगीताची खूप आवड आहे. त्यांचा मोठा मुलगा अभय बारावीत आहे… तोही बासरी छान वाजवितो आणि छोटा मुलगा अजय सेवासदन शाळेत आहे… त्याने आपल्या क्लबचे  ‘संयुक्ता दाणी’ अवॉर्ड जिंकले आहे. असे संगीतात रममाण झालेले कुटुंब आपल्या रोटरी कुटुंबात सामील झाले आहे.
ॲन सीमाने खूप छान मुलाखत घेतली. रो. माधुरीने नेहमीच्या शैलीत सूत्रसंचालन केले आणि रो. स्नेहा भावेने यथोचित आभार मानले.

13th August, 2023

गुरुद्वारा भेट - एक अविस्मरणीय अनुभव

ॲन मीनल वाघ

रोटरी क्लबच्या नियमीत मीटींग पेक्षा अगदी आगळा वेगळा कार्यक्रम रविवारी १३ ऑगस्ट रोजी
करण्यात आला. रोटेरियन विषय गोखले यांच्या परिचयाचे, गुरु नानक गुरुदास दरबार गुरुद्वारा कॅम्प चे विश्वस्त रोटरी क्लब ऑफ पूनाचे अध्यक्ष रो नरेंद्र पाल सिंग बक्षींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पणे संपन्न झाला.

सकाळी ९ वाजता प्रेसिडेंट स्मिताताई, सेक्रेटरी भारती, शरद , माधुरी ,विजय, उज्वल व अनेक रोटेरियन्स व ॲन्स जमले होते. डोक्यावर दुपट्टे तर सर्वच ॲन्स कड़े होते. पण ज्या रोटेरियन कडे मोठे रुमाल नव्हते त्यांना तेथेच विकत घेता येत होते . ते  डोक्यावर बांधून सर्व जण तयार झाले .  प्रेसिडेंट बक्षी सर आल्या बरोबर त्यांनी एकूण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. गुरुद्वारात  प्रवेश केल्यावर चप्पल बूट काढून ठेवले व सर्वांनी हात पाय धुवुन स्वच्छता पालन केले
प्रथम म्युझिअम बघायला गेलो. शीख लोकांच्या सर्व गुरुची विविध तैल चित्रे येथे जतन करून ठेवली आहेत.  गुरु गोविंद सिंगजी महाराज व त्यांची ही विविध रूपातील ही पेंटींग आहे. अतिशय सुंदर असे हे म्युझिअम, पण सध्या  जागा कमी आहे म्हणून लौकरच मोठ्या जागेत नूतनीकरणाचा विचार आहे. श्री बक्षी सरांनी उत्तम माहिती सांगितली.
म्युझिअम नंतर मुख्य सभागृहात प्रवेश केला. तेथे गुरूंचे कीर्तन प्रार्थना सुरु होते. आम्ही सर्व जणही नमस्कार करून तेथील भक्तांबरोबर सहभागी झालो. शब्द थोडेच कळत होते ,पण  पेटी तबल्याच्या साथीत श्रवणीय असे हे कीर्तन सुरू होते. नंतर बाहेर आल्यावर स्वादिष्ट प्रसाद ग्रहण केला.
श्री बक्षी सरांनी, गुरुद्वारा च्या विविध समाजोपयोगी उपक्रमाबदल माहिती दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अतिशय आधुनिक सुसज्ज असे हॉस्पिटल येथे आहे, OPD, डेंटल , जनरल, डायग्नॉस्टिक व   CT Scan पर्यंत मशीनरी उपलब्ध आहे . चोख व्यवस्था व नॉमिनल चार्ज आकारला जातो. खरोखरच मोलाचे कार्य करत आहेत गुरुद्वारा मधे ! प्रेसिडेंट स्मिताताई व विजय गोखले यांनी श्री बक्षी सर व त्यांचे सहकारी यांच्या सन्मान केला व भेटवस्तू देऊन आभार मानले तसेच त्यांनीही आपल्या मान्यवरांचा सत्कार केला. स्मिताताई, भारती, प्रतिमा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नंतर लंगरची वेळ झाली व आम्ही  तेथील हॉलमधे सर्व जण गेलो. राजमा, भात, पोळी, रस्सा भाजी व तांदूळ खीर असा स्वादिष्ट प्रसाद होता . आस्वाद घेऊन सर्व तृप्त झाले. किचन मधील सर्व व्यवस्था, ज्यामुळे हजारो लोकांना सातत्याने लंगर तयार करून  प्रसाद वाटप होते तेही दाखवले. येथेच गुरुद्वाराचे पब्लीक स्कूल ही
आहे . ४०० मुले शिक्षण घेत आहेत . अशा विविध उपक्रमांनी करत असलेले अनमोल कार्य पाहून सर्वजण अगदी भारावून गेलो. हा अविस्मरणीय अनुभव मनात कायमच राहील.

20th August, 2023

Birthday fellowship at Green Signal

Rtn. PP Guru Palekar

This year our President Rtn. Smitatai has come out with a novel idea of celebrating Birthdays and Anniversaries of the members, outside our regular weekly meeting venue on the third Sunday of every month as Breakfast meeting, to be attended by all the Members / Anns of RCPS.
This month’s Birthday fellowship was celebrated on Sunday 20th August at Green Signal Restaurant on Apte Road. The responsibility of organizing this event was with Rahul and Kalyani Pendharkar. Rotarians and Anns started gathering at the venue from 9 AM. The organizing couple was there to welcome all with smiling faces. A section of the restaurant was reserved for us. Around 9.30 most of us had assembled and started feeling hungry after looking at the spread of the breakfast menu. It was sumptuous and mouthwatering dishes with live counter of Dosas and uttapam.
All the Birthday boys and girls and Anniversary couples were called for the cake cutting ceremony. Rahul and Kalyani had surprise for all. They had brought colorful and attractive Props for all and everybody enjoyed taking photos with the Props. After the photo session  everybody proceeded to have Buffet Breakfast. Rtn. Madhuri and Rtn. Ashwini were personally looking after all to ensure that everybody was comfortable and enjoying the event. They had also planned few games and everybody participated with enthusiasm. That was really fun.
At the end, a small token of gift was given to all who had contributed for the Rotary Foundation in the month of July. Looking at the participation of Rotarians and Anns, it appears that such outdoor meetings are becoming popular and enjoyable and helping assimilation in RCPS.

28th August, 2023

*व्यासायिक गुणवत्ता पुरस्कार* - श्री. प्रदीप चंपानेरकर , रोहन प्रकाशन

रो माधुरी गोखले

तीन पिढ्यांचे अमूल्य योगदान असणारे प्रकाशन व्यवसायातील ‘रोहन प्रकाशन’. हे एक प्रथितयश नाव.प्रयोगशीलता आणि कल्पकता ह्यांची सांगड घालून आपला व्यवसाय हा ‘ ग्रंथ आमुचे साथी ‘ हे ब्रीदवाक्य मनात ठेवून समृद्ध केला.
कार्यक्रमाची सुरुवात ही मानपत्र वाचनाने झाली. ह्या मानपत्राचे सुंदर शब्द रो. वृन्दा वाळिंबे ने लिहिले होते आणि त्याच सुरेख वाचन केल Ann कल्याणी पेंढारकर ने.
प्रदीपजींचे वडील शिक्षक, अनेक साहित्यिकांशी ओळख , त्यांचं नेहमी घरी येणं , घरात असणारी समृद्ध ग्रंथसंपदा, ह्या सगळ्यामुळे प्रदीपजींच्या मनात प्रकाशन व्यवसायाची संकल्पना रुजली. Printing Technology मध्ये  घेतलेलं प्रशिक्षण आणि मनातली कलेची ऊर्मी ह्याने हा कामात रस वाटू लागला. प्रकाशन व्यवसाया ची मुहूर्तमेढ १९८२ साली मुंबई येथे रोवली गेली. आजोबांनी आपल्या लाडक्या नातवाचं नाव देऊन रोहन प्रकाशनचा श्रीगणेशा केला. १९९४ साली पुण्यातील कार्यालय सुरू झाल. प्रदीपजींच्या म्हणण्याप्रमाणे ह्या चाळीस वर्षाच्या प्रवासात प्रत्येक पुस्तकाने काहीतरी शिकवलं ज्यामुळे अडचणी कडे व्यवसाय वाढवण्याची संधी म्हणून बघितलं गेलं. कामाचं स्वरूप हे ” लिखाणाची छपाई , वितरण , विक्री ” हे न रहाता ” लेखनाला आकार देणे , त्या अनुषंगाने मुखपृष्ठ करणे , त्याकरता कलाकाराशी चर्चा करणे , मुखपृष्ठ करता पुस्तकातील नक्की कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे समजावून सांगणे आणि मग वितरण आणि विक्री करता प्रकाशकाची भूमिका निभावणं ” अस बनलं. 

मुखपृष्ठ तयार करताना आलेल्या अनुभवांचे  किस्से ऐकणं मनोरंजक होत , विशेषतः कस्तुरबा गांधी ह्यांच्यावरील पुस्तक आणि एक पाककृती वरच पुस्तक. पण ह्या प्रत्येक आव्हानाकडे त्यांनी एक संधी म्हणून बघितलं. प्रत्येक प्रकाशकाला त्याची सगळीच पुस्तक महत्वाची असली तरी काही पुस्तक त्यांच्या जिव्हाळ्याची असतात. पूर्वपंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्याच्या बद्दल प्रदीपजींना आदर. त्यांच्यावरील पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित करतानाचा प्रवास ” त्यांच्या PMO कार्यालयातील मुख्याना भेटून परवानगी मिळवणे , अनुवादाचे हक्क Oxford , London येथून मिळवणे , प्रत्यक्ष पुस्तक तयार करणे  आणि राजभवनात, दरबार हॉल मध्ये प्रकाशन ” त्यांनी सुरेख विशद केला. असच त्यांच्या जिव्हाळ्याच दुसरं पुस्तक म्हणजे ‘ असा घडला स्वतंत्र भारत’.
भारताच्या संग्रामावर अनेक पुस्तके लिहिली गेली. पण स्वतंत्र भारताचा इतिहास सांगणारं हे पुस्तक तयार करायला ७ वर्षांचा कालावधी लागला. ह्या पुस्तकाचं अनेक मान्यवरांनी खूप कौतुक केलं. 


आता ह्या कामामध्ये रोहन आणि कुटुंबियांची भरभक्कम साथ आहे. रोहनच्या येण्यामुळे व्यवसायात नवनवीन कल्पना आल्या. रोहन ची कार्यपद्धती वेगळी आहे तरी त्याच्या नवीन आणि स्वतंत्र विचारांचा वडिलांनी नेहमीच मान ठेवला हे रोहन ने आवर्जून सांगितले.
पुढील प्रवासाची आव्हान , जसे वाचनाची आणि विशेषतः मराठी वाचनाची कमी होणारी आवड , social media चा वाढता प्रादुर्भाव ही पेलण हे रोहन पुढे मोठं कठीण काम आहे. पण त्यातून मार्ग काढू असा त्याला विश्वास ही आहे. त्या दोघांनी ही आवर्जून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा उल्लेख केला. ते दोघेही कामाकरता बाहेर असतात तेव्हा ही सर्व मंडळी सर्व काम अतिशय जबाबदारीने सांभाळतात ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

रो. वृंदा ने आपल्या सहज सोप्या प्रश्नातून हा प्रकाशन क्षेत्रातील आगळ्या वेगळया गोष्टींचा प्रवास श्रोत्यांच्या समोर उलगडला. कार्यक्रमाच्या शेवटी vocational director रो. सचिन जोगळेकर ने आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016