Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin May 2024

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो.

एप्रिल महिना हा तसा आपला सेलिब्रेशनचा महिना  म्हणायला पाहिजे. कारण मार्च महिन्यामध्ये आपल्या क्लबच्या टीमने एकांकिका वाचनात भाग घेतला आणि रोट्रॅक्ट क्लब ने सुद्धा. आणि ह्या दोन्ही टीमला काही ना काही बक्षीस मिळाली. वृंदा आणि टीमने सांघिक तिसऱ्या नंबरचं आणि वृंदाने व्यक्तीशः तिसऱ्या नंबरचं अशी दोन बक्षीस मिळवली आणि वाचनाचं अशोक कांबळे यांना तिसर बक्षीस मिळालं. एक तारखेच्या पहिल्या मीटिंगमध्ये आपण ह्या दोन्ही  संघांचं नाट्य वाचन आपल्या क्लब मध्ये ठेवलं आणि त्यांना फॅलिसिटेट केलं.
त्यानंतर आपण कौतुक केलं ते  fund raising साठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं. ही एक फार मोठी आपल्या क्लबची  achievement आहे, आणि ह्याचाच कित्ता गिरवत ती पुढेही चालू राहील अशी आपण अशा व्यक्त करूया.
नऊ तारखेला आपण घरोघरी गुढीपाडवा साजरा केला आणि नवीन वर्षाचे स्वागत केलं. तुम्हा सर्वांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात  खूप भरभराट, सुख, समाधान येऊ दे  अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना .

दोन चार वेळा काही काही ना काही कारणांनी पुढे ढकलला गेलेला कार्यक्रम 22 तारखेला झाला. सौ निलिमा बोरवणकर यांना आपण  वक्ता  म्हणून बोलवलं आणि त्या खूप सुंदर बोलल्या. त्या पाठोपाठच २९ तारखेला प्रभात पर्व हा सर्वांग सुंदर कार्यक्रम रोटेरियन अनिल दामले ह्यांनी दामले हॉल येथे केला. हा अख्खा कार्यक्रमच त्यांनी स्पॉन्सर केला आणि कार्यक्रमाच्या नंतर मस्तपैकी आमरस पुरीचं जेवण ठेवलं. यानिमित्ताने पीपी श्रीकांत यांनी एक अशी इच्छा व्यक्त केली की दरवर्षी आंब्याच्या दिवसात असा एक आमरस पुरीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. वा वा. अशा सूचनेचा कोण अनादर करेल. नक्कीच अमलात आणण्यासारखी ही सूचना आहे नाही का?
Rotary Youth Exchange  अंतर्गत आपले मेंबर रोटेरियन प्रकाश गायकवाड यांचे चिरंजीव अनेट अभिमन्यू ह्याला आपल्या क्लबने स्पॉन्सर केले  आहे. तो  फ्रान्स येथील  Haze bruck   ह्या   डिस्ट्रिक्ट 1520 मधील क्लबला  जाईल. त्याचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
मार्च महिना तसा हाय हाय ऊन करत गेला .एप्रिल मध्ये ही उन्हाची लाट  अशीच सुरू राहिली. कदाचित मे महिना पण असाच असेल. त्यामुळे मित्रांनो काही काही प्रोजेक्ट्स मात्र होल्ड वर ठेवायला लागले. जसं, काही अशा वर्कर्स ना काही वस्तू द्यायच्या, अंगणवाडीच्या  visits, health check up  वगैरे. बघूया थोड्या उन्हाचा ताप कमी झाल्यानंतर ह्यापैकी आपल्याला काय काय करता येईल ते. प्रयत्न तरी करायलाच हवा.
ह्याच  उन्हाच्या तडाक्यात संभाजी पार्क येथे ग्रीन एक्सपो नावाचा एक इव्हेंट पार पडला. आपण त्यात सिनर्जी पार्टनर होतो. त्याचा डिटेल वृत्तांत मी पुश मध्ये दिलेलाच आहे. पण  एक असं वाटलं की असे  इव्हेंट्स हे डिसेंबर, जानेवारी महिन्यात जेव्हा हवा  सुखकारक असते तेव्हा व्हायला हवेत .
असो. आता आपल्याला वेध लागलेले आहेत मे महिन्यात ठरवलेले कार्यक्रम एन्जॉय करायचे आणि जून महिन्यात तयारीला लागायचं सिंहावलोकन करायला,  नवीन टीमला शुभेच्छा देण्याला. पुढच्या महिन्याचा पुश ब्लॉग व  pdf  अशा दोन्ही  रूपात  तुमच्या हातात पडेल. मजा आली वर्षभर तुमच्याशी अशा गप्पा मारायला. आता इथेच थांबते.
ब्लॉग स्वरूपात पुश काढण्यासाठी लागणारी सर्व मेहनत  केल्याबद्दल आणि चिकाटी दाखवल्याबद्दल एडिटर वृंदा आणि समग्र पुश टीमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार.


प्रे स्मिता जोग

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

Programs done in Previous Month

1. नाट्यवाचन
2. साडीची वाटचाल
3. प्रभात पर्व

Projects done in Previous Month

1. शिवामूठ
2. सुंदर मी होणार
3. Green Expo

May 2024 Support Group

  1. Rtn Sanjeev Chaudhary (Leader)
  2. Rtn Alka Kamble
  3. Spouse Ashok Kamble
  4. Rtn Ashok Gadgil
  5. Ann Anjali Gadgil
  6. Rtn Vrinda Walimbe
  7. Rtn Praksh Gaikwad
  8. Ann Poonam Gaikwad
  9. Rtn Harshad Khonde
  10. Ann Aboli Khonde