Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin September 2023

अध्यक्षीय

नमस्कार.

पुश चे दुसरे पुष्प तुमच्यासमोर सादर होते आहे. मागच्या पुश मधील क्विझ ज्यांनी सोडवले व बक्षीस मिळवले त्यांचं अभिनंदन . Keep it up.

प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांचे विदेश दौऱ्याचे प्लॅन सुरू होते. वाटलं हा कार्यक्रम हुकतो की काय. पण नाही. तो झाला. आरसीपी अपटाऊन आणि शनिवार वाडा जॉईन झाले नी खचाखच भरलेला दामले हॉल बासरीच्या सुरांनी भारून गेला .

13 तारखेला गुरुद्वारा भेट झाली. आरसी पुना चे अध्यक्ष नरेंद्र पाल नी आपल्याला गुरुद्वाराची टूर घडवली.
पहिल्यांदाच गुरु ग्रंथ साहेब उघडलेले बघितले. नरेंद्र पालनी काही भाग वाचला. ते म्हणाले तुमच्या मनात काही प्रश्न असेल आणि तुम्ही गुरु ग्रंथ साहेब वाचलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते. श्रद्धा हे माणसाचे बलस्थान आहे हे खरंच .

20 तारखेला बर्थडे सेलिब्रेशन झाले ग्रीन सिग्नलला. चविष्ट ब्रेकफास्ट, मित्र-मैत्रिणींच्या बरोबर मनसोक्त गप्पा, मुखवटे घालून फोटो, धमाल आली. हा बदल चांगला वाटतोय असं बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं. असे मजेचे क्षण हीच तर आनंदी जेवणासाठीची शिदोरी असते ना !

जरा हटके फिल्डमध्ये स्वतःचा विचार घेऊन काम करणाऱ्या श्री चंपानेरकरांना आपण व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड दिले. उपस्थिती चांगली होती आणि तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. एकंदर कार्यक्रमाविषयी आपल्याला काय वाटलं हे त्यांनी मला पत्र लिहून कळवलं आहे. ते पुश मध्ये छापण्याची मी वृंदाला विनंती करते. तुम्हीही अवश्य वाचा .

ह्या महिन्याच एक हायलाईट म्हणजे उज्वल नी एपीएफला पंधराशे डॉलर्सची दणदणीत देणगी दिली. थँक्यू उज्वल. शरद ने Installation लाच एपीएफला $ १००० दिले होतेच, माझं तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे कि Foundation ला लवकरात लवकर contribute करा.
बाकी लहान लहान प्रोजेक्टची तयारी सुरू आहे. पुढच्या महिन्या च प्लॅनिंग झालेल आहे. अख्या पुण्याबरोबर आपणही गणपती बाप्पाचे स्वागत करूया आणि पुन्हा भेटू गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर .
श्री गणेश तुमचे जीवन सुखी व मंगलमय करो ही प्रार्थना करून आता थांबते.

प्रे डॉ स्मिता जोग

Rotary Masters - August 2023

    • Nitin Naik
    • Achyut Gokhale
    • Shirish Kshirsagar

Rotary Vishesh

Know more about what is happening in Rotary World …

Programs done in Previous Month

1. Induction of Mr. Amar Oak as honorary member
2. गुरुद्वारा भेट – एक अविस्मरणीय अनुभव
3. Birthday fellowship at Green Signal
4. *व्यासायिक गुणवत्ता पुरस्कार* – श्री. प्रदीप चंपानेरकर , रोहन प्रकाशन

Projects done in Previous Month

1. Health camp at Vikhe Patil School
2. Muktangan School children counselling
3. Vocational training at Apte Muk Badhir Schoo

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

मनाचिये गुंती

मानवी मनोव्यापारांचा लेखाजोखा एका मानसोपचार तज्ञाच्या नजरेतून …

Our Rotary Family

Know more about our Rotarian and family members of Rotarian …