Skip to main content

1st August, 2023

सार्थक सेवा मधे ऑगस्ट महिन्याचे धान्य पोहोचले

Ann. Alka Abhyankar

सार्थक सेवा संघामधील सर्व मुलामुलींना ( एकूण 94 ) प्रत्येकी 2 पेयर इनर वेअर देण्यात आले .या साठी चे सर्व 22,000 रु.आपली अनेट मृण्मयी अनगळ  ( विजय , माधुरीची मुलगी ) हिने दिले आहेत. खूप विचारपूर्वक मदत केली आहे  तिने. अभिनंदन आणि कौतुक मृण्मयीचे.

4th August, 2023

Health camp at Vikhe Patil School

Rtn Dr. Shobha Rao

Health camp was conducted at Vikhe Patil School .  59 subjects were examined. 
I would like to thank following members for their active participation.
Pres Dr Smita, Dr Bharati, Manasi, Dr Rao, Anjali Godbole, Ramesh Bhatiya

10th August, 2023

Muktangan School children counselling

Pres.Dr. Smita Jog

१० ऑगस्ट रोजी मुक्तांगण शाळेतील नववी दहावीतील विद्यार्थ्यांच्या साठीवृंदा   मंजिरी नी  boundries and Gender sensitization ह्यावर टॉक  दिला . खूपच अप्रतिम दोघीही  बोलल्या. मुलांनी ही छान रिस्पॉन्स दिला. दोघांचं ही मनापासून कौतुक आणि अभिनंदन. मी अंजली रावेतकर ही उपस्थित होतो.

19th August, 2023

Vocational training at Apte Muk Badhir School

A day long vocational training program of “akash kandil” and “ganpati makhar” making was carried out at Apte Muk Badhir School.

19th August, 2023

Anns project : मेंदी कार्यक्रम

Ann. Girija Yardi

१९ ऑगस्ट रोजी नागपंचमी निमित्त मेंदीचा कार्यक्रम सरिताच्या घरी संपन्न झाला. बऱ्याच जणी एकत्र आलो होतो. विशेष म्हणजे माहेरवाशिणी, अपूर्वा (अंजली गाडगीळ ची मुलगी), प्राजक्ता( अंजलीची सून) आणि वैदेही (शोभाताईंची मुलगी) आल्या होत्या. बालचमूंमध्ये इरा (वैदेहीची मुलगी), अमोघ ( प्राजक्ताचा मुलगा) आणि रुहिका (अपूर्वाची मुलगी) आले होते. मेंदी काढण्यासाठी मेंदी आर्टिस्ट आल्या होत्या. मेनू साठी सरिताने विशेष मेहनत घेतली होती. तिने अतिशय चविष्ट मटार उसळ केली होती. त्या बरोबर ब्रेड, ढोकळा, ओल्या नारळाच्या करंज्या आणि कॉफी असा झकास बेत होता. प्राजक्ताच्या गोड आवाजातलं गाणं, उखाणे, मंजिरी, रोहिणीच्या कविता, आणि अमोघच्या नाटू नाटू डान्सने कार्यक्रमाला रंगत आली.

19th August, 2023

Synergy Program of Abhangwani at PYC

Our club participated in this Synergy program by District.

29th August, 2023

आपटे मूकबधिर मुलांचे वाढदिवस साजरे

 Ann. Anjali Gadgil

दरवर्षीप्रमाणे आपटे मूक बधीर शाळेतील जून,जुलै, ऑगस्ट या महिन्यातील मुलांचे वाढदिवस आपण २९ ऑगस्ट ला आपटे मूकबधिर विद्यालयात साजरे केले. त्या मुलांना क्लब तर्फे आपण पाण्याच्या बॉटल्स दिल्या. ६० मुलं होती आणि त्यांना वाटी केक दिले. अंजली गाडगीळ हिने घरून मुलांना कापण्यासाठी दोन सुंदर आयसिंग केलेले केकआणले होते. त्यामुळे मुलं खूप खुश झाली. मुलांना केक कटिंग मध्ये खूपच इंटरेस्ट असतो आणि त्यांना खूप मजा आली. या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट डॉक्टर स्मिता जोग, अंजली गोडबोले, जयश्री नवाथे,अंजली गाडगीळ या हजर होत्या.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016