Skip to main content

6th May, 2024

वेताळ टेकडी परिसरातील पक्षी जीवन

मे २०२४ रोजी अद्वैत चौधरी ह्या प्रख्यात पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफरचं आपल्या क्लब मध्ये भाषण आणि स्लाईडशो प्रेसेंटेशन झालं. खरं म्हणजे त्याचं विशेष कौतुक करायचं कारण की अगदी आयत्या वेळेस म्हणजे दोन दिवस आधी त्याचा हा कार्यक्रम ठरवावा लागला, पण त्याने मान्य केलं. पुणे परिसरातील आणि विशेषतः वेताळ टेकडी परिसरातील पक्षी जीवन या विषयाची त्याने सखोल माहिती दिली. पक्षांचे काढलेले फोटो पाहून अवाक व्हायला झाले. खरंच आपल्या आजूबाजूला पक्षी जीवतांची एवढी विविधता आहे!  अद्वैतचं शिक्षण BSc कम्प्युटर सायन्स आणि एमएससी डेटा सायन्स असून डेटा शास्त्रज्ञ म्हणून तो काम करतो. त्याने काही खास अभ्यास लेखन केलं आहे आणि ते प्रसिद्धही झालं आहे.
. India’s first Butterfly species classification algorithm
. Butterfly diversity of Vetal Tekdi
. Birds diversity of Vetal Tekdi.                   

त्याचा खास अभ्यास पक्षी स्थलांतरावर आहे. त्यानुसार त्याने अनेक स्थलांतर करून येणाऱ्या पक्षांच्या फोटो सादरीकरणाबरोबर माहिती दिली. रोटरी क्लबच्या सदस्यांच्या ज्ञानात भर तर घातलीच पण त्यामुळे अनेकांच्या मनातील जिज्ञासा जागृत केली .

रो. अनिल दामले

12th May, 2024

शुभम मांडवगडे

पुण्यात गेली दोनतीन दशक निसर्ग अभ्यास शिबिरे , पक्षी निरीक्षण , वन्यजीवन भ्रमणासाठी अनेक पर्यटक अभ्यासक जातात. शुभम नेही बारावीत असताना ह्या निसर्गाच्या क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले. शिक्षणाबरोबरच निसर्ग अभ्यास , पक्षीनिरीक्षण वन्यजीवन भ्रमंती यात तो भाग घेऊ लागला.
राजस्थान मध्ये त्याने बिबट्या वाघाचा अभ्यास केला. पुणे परिसरातील बिबट्याचा वावर आणि त्यातून उदभवणारे त्रास आपल्या सर्वांना माहीतच आहेत. मी अनेकदा गंमतीने म्हणते, बिबट्या पहायला national पार्क मध्ये जायच्या ऐवजी पुणे परिसरात उसाच्या शेतातून हिंडा.
शुभम ने सारस cranes चा ही अभ्यास केला आहे. ह्या दुर्मिळ होत चाललेल्या पक्षाच्या संवर्धनाचा आपल्या पुढे मोठा प्रश्न आहे. शुभम सारखे अभ्यासक ह्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शुभम च्या कुटुंबाला कलेचा वारसा लाभला आहे. तो बासरी वादन करतो. कार्टून च्या माध्यमातून वन्य जीवन संरक्षणाची जाण तो लोकांपर्यंत पोहोचवतो. पक्षी निरीक्षण वन्यजीवनाचा अभ्यास करताना त्याला समुद्राखालचे जीवन ही आगळीच वाट सापडली. Fine Arts ची त्याच्याकडे bachelor degree आहे. नंतर त्याने भारती विद्यापीठातून Masters in Wildlife Conservation हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
Wildlife Conservation Society च्या कामाबरोबरच भारतीय समुद्रकिनारे ह्या विषयाचा अभ्यास ही तो करतो आहे. Coral reefs हा त्याच्या आवडीचा विषय. शुभम certified scuba diver आहे..
रविवार १२ मे रोजी रोटरी क्लब मुद्दे शुभम व्याख्यान झालं.समुद्रखालील जीवन हा तसा आघात अवघड विषय. आपल्या सारख्या सामान्य लोकांचं समुद्र किनारा, वाळूवर उमटलेली नक्षी पाहूनच मन भरत. त्यापलीकडे खोलवर गर्तेमध्ये समुद्राच्या पोटात काय काय दडलं आहे ? ते अनोखे विश्व शुभम ने उलगडून दाखवले. अचंबित करणारा निसर्ग , विलक्षण रंगसंगती पाहून आपले सभासद थक्क झाले.
ह्या कार्यक्रमाच्या आधी मे महिन्यात वाढदिवस विवाह वर्धापनदिन केक कापून साजरे केले. चाळीस सभासदांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Ann रंजना दामले

अंजठा लेण्यांमधील चित्रांचा रसास्वाद

20th May, 2024

२० मे च्या कार्यक्रमात डॉ मंजिरी भालेराव ह्यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला गेला. – प्रतिमाने त्यांची ओळख करून दिली मानपत्राचे वाचन केलेनंतर त्यादिवशीचे वक्ते श्रीकांत प्रधान ह्यांची आओळख अंजली रावेतकरने करून दिली.

अजिंठा लेण्यातील भारतीय कलांचा रसास्वाद ह्या विषयावर त्यांचे विचार त्यांनी फार सुंदर रितीने विशद केले. ही चित्रं बघताना कलेचा विचार निसटतो नेहमीच निसटतो. तो त्यांनी उलगडून दाखवला. हुएन शांगने काय लिहीलंय? मिथकं कशी तयार होतात? १९ व्या शतकात जाॅन स्मिथने स्वतःचं नाव कसं ह्या लेण्यांमधे लिहीलं (कदाचित भारतीयांची ही सवय त्यांनी स्मिथकडूनच उचलली असेल का?), अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला.
हीनयान किंवा महायान काळातील महाराष्ट्रातील अभिजात कला इथे दिसते. पूर्व २०० वर्षे काळातली ही चित्रं त्या काळातील भारतीय दृष्टीकोन दर्शवतातह्यातील काही चित्रं काढून ब्रिटिश अधिकारी राॅबर्ट गीलने इंग्लंड ला पाठवली. पापुद्रे काढून ही चित्रं पाठवली गेली. क्रिस्टल पॅलेस मधे ठेवलेली ही चित्रं पॅलेसला लागलेल्या आगीत भस्मसात झाली. भारत देशाची सांपत्तिक सांस्कृतिक लूट ब्रिटिशांनी किती केली ह्याचा हिशोब त्यांच्या कडे मागितला तर त्यांच्या अनेक पिढ्यांना हा हिशोब चुकवत बसावं लागेल.
भगवानराव पंतप्रतिनिधी ह्यांनी अजंठ्यावर रंगीत पुस्तक काढलं. ह्या चित्रांचा राजवर्द, गडद निळा रंग बघितला कि हे प्रोफेशनल पेंटर चं काम आहे कि बौद्ध भिक्खूंचं हा प्रश्न पडतो. श्रीकांत प्रधानांनी अजंठा वेरूळ टुरीस्ट म्हणून नाही तर भारतीय दृष्टीकोनातून कसं बघावं हे सांगितलं. त्यांचा चित्राचा सखोल अभ्यास, त्यातील  architectural elements समजावून सांगण्याची हातोटी खिळवून ठेवणारी होती. चित्रं पण गोष्टी सांगतात असं ते म्हणाले. खूप सुरेख कार्यक्रम झाला.
वृंदाने उचीत आभार मानले क्लबतर्फे छोटीशी भेट देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

रो. वृंदा वाळिंबे

27th May, 2024

महाभारत समज गैरसमज - सुचेता परांजपे

डॉ. सुचेता परांजपे यांचा महाभारत, उपनिषद, गीता आणि संस्कृत वाङ्मय ह्यांचा गाढा आणि प्रचंड अभ्यास आहे. यांचा इंडोलॉजी ह्याचा देखील अभ्यास आहे. जर्मनीमध्येही त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास आणि प्रचार केला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधून डॉ. सुचेता यांनी सस्कृत महाभारताचा सखोल अभ्यास केला आहे.
महाभारत व्यासांनी सांगितला आणि गणेशाने लिहिला हा पहिला गैरसमज. पांडवांनी व्यासांना विनंती केली म्हणूनजयनांवांचा युध्दाबद्दलची माहिती ग्रंथात दिली. कौरव पांडव यांच्यातील संघर्षाची कथा व्यासांनी २४००० श्लोकांमधून मांडली त्यालाभारतहा ग्रंथ असेही म्हणतात. त्यानंतर वैशंपायन आणि सूत ह्यांनी देखील महाभारतांतील काही श्लोक लिहिले. ते दोघेही इतिहासकार होते.
द्रौपदी बद्दलही बरेच गैरसमज होते. द्रौपदी ही अग्निकन्या होती. ती तेजस्वी आणि धोरणी होती त्यामुळे ती हसली हा देखील गैरसमज. पितामह बाणांच्या शय्येवर १० दिवस झोपले हा देखील गैरसमज. शर म्हणजे मऊ गवत असा याचा अर्थ निघतो.
डॉ. सुचेताताईंनी असे अनेक गैरसमज गोष्टींमधून आणि संस्कृत संदर्भ देऊन आपल्या भाषणांत सांगितले. त्यांनी असे सांगितले की प्रत्येक परिस्थितीचा विचार केल्यास महाभारतांतील कथा रंजक आणि वाचनीय होण्यासाठी या गोष्टींचा गैरसमज लिहीला गेला. महाभारतामध्ये लाख श्लोक आहेत. एकंदरीत महाभारत हा प्रचंड मोठा ग्रंथ असला तरी तो इतिहास पण आहे. ते एक वास्तव आहे. वास्तव स्वीकारत असतांना कसे गैरसमज निर्माण होतात असो.
डॉ. सुचेताताईंनी आपल्या खुमासदार भाषा शैलीतून आणि रुपाने भाषणांत रंगत आणली.

रो. अंजली रावेतकर

3rd June, 2024

*लताशा*- सुलभा तेरणीकर

लता दीदी आणि आशाताई ह्या दोन दिग्गज कलाकारांच्या गाण्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम. हिंदी सिनेमातील गाणी आवडत नाहीत असा भारतीय विरळाच. अशा दिग्गज कलाकारांना भेटण्याचं , त्यांचा जीवनप्रवास जवळून पाहण्याचं , त्यांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य सुलभा ताईंना लाभलं. ओळीने ५२ आठवडे ह्या मुलाखतींवर आधारित लेखमाला त्यांनी वृत्तपत्रांमध्ये चालवली.
मंजिरी ने विचारलेले माहितीपूर्ण प्रश्न , त्यांची उत्तरे देताना सुलभा ताईंनी सांगितलेले त्यांचे अनुभव आणि ह्या दोन्ही गानदेवतांच्या वेगवेगळ्या गाण्यांच उस्मान भाईंनी केलेलं संकलन असा बहारदार कार्यक्रम सादर झाला.
आशाताईंच्या कानावर वडिलांचं गाण पडलं पण त्यांना दिनानाथांजवळ बसून गाण शिकण्याचं भाग्य लाभलं नाही. घरातील काम करणे, लहान भावाला सांभाळणे, संसार, मातृत्वाची जबाबदारी हे सगळं पेलूनही आशाताईंनी अपार मेहनत आणि जिद्दीने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं .
हिंदी चित्रपट सृष्टीतला सुरवातीचा काळ कठीण होताहिंदी मध्ये त्यांना खरी ओळख दिली O P नय्यर साहेबांनी. इथेही काही चुलबुली तर काही तरल गाणी गाऊन आशाताईची यशस्वी वाटचाल सुरु झाली.
सुरेख, नीटनेटके घर ठेवणारी गृहिणी, मुलांवर अतिशय प्रेम करणारी आई , वैविध्यपूर्ण गाणी गाणारी  गायिका आणि चैतन्याने बहरलेली व्यक्ती अशी आशाताईंची अनेक रूप सुलाभाताईंनी आठवणीतून उलगडली.
वयाच्या तेराव्या वर्षी गायलेल्यापहिली मंगळागौरह्या चित्रपटातील गाण्याने लता दिदींची चित्रपट संगीताची प्रदीर्घ वाटचाल सुरू झाली. अलौकिक स्वरांची दैवी देणगी आणि वडिलांकडून मिळालेले गाण्याचे संस्कार ह्याच्या बळावर सुरेय्या, नूरजहाँ ह्यासारख्या दिग्गज गायिकाच्या राज्यातही लता दिदींची यशस्वी कारकीर्द उभी राहिली. मराठी , हिंदी , संस्कृत आणि उर्दू ह्या भाषा आणि विशेषतः योग्य उच्चार ह्यावर कष्ट करून त्यांनी प्रभुत्व मिळवले. अपार मेहनत, जिद्द आणि महत्वाकांक्षा ह्यांच्या जोरावर लतादीदींनी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवले.
१९६८ साली सुलभा ताईंची दिदींशी  पहिली भेट झाली. त्यानंतर अनेक भेटी आणि अनेक मुलाखती ह्यायोगे ह्या ओळखीचं स्नेहात रूपांतर झालं. दिदींची स्मरणशक्ती अतिशय तल्लख. त्यामुळे त्यांची मुलाखत हा फार आनंददायी अनुभव असे. त्या आठवणी सांगताना सुलभा ताईंना खरंतर वेळ कमी पडला.
पुन्हा एकदा त्या आपल्याला नक्की अजून किस्से सांगतील अशी आम्ही सर्वांनी मिळून विनंती केली आहे.
बघू आता कधी योग येतो ते !

रो .माधुरी गोखले

10th June, 2024

वेदातील पाऊस

दहा जून रोजी आपल्या क्लब मध्येव्यावसायिक गुणवत्ता पुरस्कारप्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा पुरस्कार आपण विपुलश्री मासिकाच्या संपादिका माधुरी संजय वैद्य यांना त्यांच्या साहित्य सेवा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल दिला. 25 वर्षे विपुलश्री या मराठी मासिकाची जबाबदारी संपादिका वितरक अशा दोन पातळ्यांवर त्यांनी उत्तम पेलली. मानपत्र धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्राचे लेखन वाचन अँन प्रतिमा दुरुगकर हिने केले. सत्काराला उत्तर देताना माधुरीताईंनी रोटरीचे आभार मानले त्यांच्या 25 वर्षाच्या प्रवासातील कडू गोड आठवणी सांगितल्या. त्यानंतर डॉ. नीलिमा थत्ते केळकर इंडोलॉजिस्ट यांचेवेदातला पाऊसया विषयावर दृक्श्राव्य सादरीकरण झाले. पावसावरील ऋचा त्यातील उपमा विचार मंडूक सुक्ते इत्यादीचे विवेचन त्यांनी केले .
रो .आनंद नवाथे यांनी डॉ. नीलिमा थत्ते यांची ओळख करून दिली. तर रो. मृणाल नेरलेकर ने आभार मानले. अशा रीतीने रोटरीतील या वर्षातील हा  कार्यक्रम संस्मरणीय ठरला

अँन प्रतिमा दुरूगकर

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016