Skip to main content
रोटरी विशेष

Our Participation in District

By August 1, 2022August 5th, 2022No Comments
PP Vrinda and Rtn. Manjiri were MoC for Inaugural Session of Lakshya, training program for DGs and DGEs and also District Chairs of RI zones 4,5,6 and 7
जश्न ए जोश

पी पी वृंदा वाळिंबे

२०, २१ आणि २२ जुलै हे तीन दिवस रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ साठी जोशपूर्ण होते. आधी “लक्ष” हा रोटरी इंटर नॅशनल चे ४ झोन ज्यात संपूर्ण भारत, नेपाळ, श्रीलंका येथील रोटरी डिस्ट्रिक्ट चे रोटरी वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट फाऊंडेशन व मेंबरशीप चेअर्स ह्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम ३ दिवस होता. ह्यासाठी शेवटच्या दिवशी साठी रोटरी इंटरनॅशनल च्या ह्या वर्षीच्या प्रेसिडेंट जेनीफर जोन्स व त्यांचे पती निक पुण्यात आले होते. 

२२ जुलैची संध्याकाळ डिस्ट्रिक्ट ३१३१ साठी विशेष होती. भूगाव रोडवर मेरीगोल्ड येथे एक शाही कार्यक्रम आयोजित केला होता, “जश्न ए जोश विथ जेनीफर जोन्स”. तुम्हाला म्हणून सांगते, हे नांव मी सुचवलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेनीफर व निकचे आगमन शाही राजस्थानी मिरवणुकीने झाले. त्यांनी राजस्थानी पेहराव पण केला होता. ह्या वर्षात जे AKS Chair Circle, AKS Trusty Circle सदस्य झाले आहेत असे सदस्य, काही विशेष प्रोजेक्ट, काही पब्लिकेशन्स चे प्रकाशन, घुमर, कठपुतळी, भवई अशी नृत्यं, प्रेसिडेंट चा रॅंपवाॅक, रोटरी स्पिरीट नृत्य, अशी मेजवानी होती. जेनीफरने हे सगळं मनापासून एन्जॉय केलं आणि नंतर सगळ्यांशी संवाद साधला. ह्या रंगलेल्या कार्यक्रमानंतर तेवढंच स्वादिष्ट जेवण होतं. आपल्या क्लबचे आम्ही ६/७ जणं ह्या कार्यक्रमाला होतो. 

आधी लक्ष कार्यक्रमात दोन दिवस व हा जश्न ए जोश कार्यक्रम ह्या तीनही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली. खूप दमणूक झाली पण मजा आली. वर आणि कल्याणीने मलाच लिहायला बसवलं त्यामुळे एका प्रकारे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला. असो. 

Group photo of volunteers with RI President Jennifer after valedictory session today- Vrunda and Manjiri were MOCs- 22nd July
PDG Dr Deepak and PP Gauri were invited for a special event held on the occasion of RI president Jeniffer Jones’s visit to Pune on 21st July 2022
Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016