Skip to main content
Project reports

Project report

By August 5, 2022August 6th, 2022No Comments

19th July

Service ( Non medical ) : Vocational training

IPP Dr Shobha Rao

As we all know our clubs’ Anns have been contributing both time and money for the betterment of  Apte Muk Badhir school children. In RY 21-22, IPP Dr Shobha and her team took special efforts in upskilling some girls in Apte Muk Badhir in sewing skills. The items sown by these girls were sold and INR 50305/- were collected for the club. 

The club decided to sponsor the education of one needy student in Sarthak Seva Sangh. Dr Anil Kudia helped us to identify one student – Sunny Kandalkar. Sunny has taken an admission for one year course of “ Diploma in Basic Rural Technology” at  “Vidyan Ashram Pabal” which will help him earn. 

25th July

Service ( Non medical ) : Vocational training

President Dr Mrinal Nerlekar

A worthy but financially needy student  Yash Bhaskar was, recommended by the officials of VidyanAshram. Rtn. Madhuri Gokhale and spouse Vijay Gokhale have sponsored Rs 46000/- for his vocational course and upskilling. The club is thankful to both of them for this generous gesture.

25th July

Literacy Project

Rtn. Madhuri Gokhale

१९ वर्षीय राज सागर लामा इ. ३री पासून एकलव्य न्यासाच्या वसतिगृहात रहात होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो त्याच्या आईसोबत रहात होता. मात्र काही वर्षापूर्वी आईचे निधन झाल्यामुळे राजने काही हॉटेल्समध्ये नोकर्‍या केल्या. या नोकर्‍यांच्या दरम्यान हॉटेल मॅनेजमेंटची डीग्रीची निकड त्याला जाणवू लागली. कुडाळ येथील चिकित्सक समूह कॉलेज च्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टीट्युटमध्ये त्याने प्रवेश घेतला आहेत्याच्या प्रथम वर्षाचे शैक्षणिक शुल्क : ५०,०००/- आहे.    राजने प्रवेश शुल्क १०,०००/— स्वतःचे योगदान म्हणून  भरले आहे. उर्वरित ४००००/- शैक्षणिक शुल्क पीपी शिरीष क्षीरसागर ह्यांनी भरले आहे.  त्यांनी केलेले हे योगदान अत्यंत मौल्यवान आणि स्तुत्य आहे.

26th July

Synergy project: उपेंद्र लिमये मुलाखत

Rtn. Manjiri Dhamankar

दि २६ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सेवासदन हॉल येथे तीन क्लब्स ची सिनर्जी मीटिंग झाली. रोटरी क्लब ऑफ पुणे, प्रिस्टीन होस्ट क्लब होता, आणि आपला क्लब आणि कर्वेनगर क्लब हे सहभागी क्लब्स होते. सुप्रसिध्द नाट्य-चित्रपट अभिनेता उपेंद्र लिमये याची अत्यंत उत्तम मुलाखत या मीटिंग मध्ये ऐकायला मिळाली. रो. देवेंद्र सारळकर आणि रो. संदीप बेलवलकर यांनी नेमके प्रश्न विचारून उपेंद्र लिमये यांना बोलते केले. उपेंद्र यांनी अतिशय मोकळेपणाने मुलाखत दिली. कॉलेजमधले पुरुषोत्तम करंडक चे दिवस, प्रायोगिक रंगभूमीवरील नाटके, इथून सुरुवात करून मग व्यावसायिक रंगभूमी, मराठी चित्रपट, नंतर बॉलीवूड मध्ये दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबरचे हिंदी चित्रपट, तसेच तमिळ चित्रपटातील भूमिका, हा सगळा प्रवास मंत्रमुग्ध करणारा होता. त्यांनी कोणताही अभिनेवेश न आणता अगदी प्रांजळपणे त्यांच्या अभिनय प्रवासातले टप्पे उलगडत नेले.

बिग बी बरोबर प्रथम काम करण्याचा अनुभव, जोगवातील भूमिके साठी घेतलेले कष्ट, आणि राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्या कष्टांचे झालेले चीज हे ऐकताना आम्हां सर्वांच्याच कौतुकाला पारावार राहिला नाही. रंगभूमी, विविध भाषांतील चित्रपट, टीव्ही वरील मालिका आणि आता OTT platform, या सर्व माध्यमांत काम करताना त्या त्या माध्यमाची गरज ओळखून त्याप्रमाणे काम करणारा हा कलाकार प्रेक्षकांना खूपच भावला यात आश्चर्य नाही.  प्रेसिडेंट डॉ.मृणाल नेर्लेकरने  प्रास्ताविक केले. रो.मंजिरी धामणकर ने आभार मानले. हा योग जुळवून आणल्याबद्दल प्रिस्टीन क्लबचे प्रेसिडेंट श्री आमोद फडके, आपल्या क्लबचा सिनर्जी डिरेक्टर पीपी शिरीष क्षीरसागर या दोघांचेही मनःपूर्वक आभार.

27th July

Service : Medical avenue

PP Rujuta Desai

ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम

२६ जुलै २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर व भारत विकास परिषद दक्षिण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वर्धमान जैन स्थानक सुखसागर नगर पुणे, येथें  “मिशन शक्ती” या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 

डॉक्टर अविनाश म्हेत्रे, प्राचार्य- भारती विद्यापीठ होमिओपॅथी कॉलेजहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आजपर्यंत ॲनिमिया जागृतीवर १०८ भाषणे केली आहेत  व बरेच संशोधनही केले आहे. 

प्रथम सर्व माननीयांतर्फे दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला.  श्री शशिकांत पदमवार यांनी भारत विकास परिषदेच्या कार्यकक्षेची माहिती दिली व व्यासपीठावरील उपस्थितांचे  स्वागत केले.  तसेच आपल्या क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर मृणाल नेर्लेकर यांनी प्रमुख पाहुणे व भारत विकास परिषदेचे पदाधिकारी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.  प्रमुख पाहुणे डॉक्टर अविनाश म्हेत्रे यांनी सोप्या भाषेत सुरेख रित्या मुलांना व पालकांना समतोल आहाराचे व  खेळाचे महत्व आणि इतर  सवयी याविषयी छान मार्गदर्शन केले. 

अध्यक्षा डॉक्टर मृणाल यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत विद्यार्थिनींना ॲनिमिया ,रक्ताचे घटक ,त्यांची लक्षणे ,गांभीर्य ,औषधोपचार  व आहाराचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.  ॲनिमिया मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते करू असे विद्यार्थिनींकडून वदवून घेतले. 

पीपी ऋजुता देसाईने रोटरी इंटरनॅशनल , रोटरी क्लब व आपल्या क्लब मधील मेडिकल अवेन्यू च्या अंतर्गत करत असलेल्या विविध प्रकल्पांबद्दल माहिती दिली . जनकल्याण रक्तपेढीचे संतोष अनगोळकर  यांनी रक्त घेण्याऐवजी रक्तदाते होण्याच्या दृष्टीने आहारात बदल करा असे सांगितले व या रक्तपेढीतर्फी किती टक्के रक्त कोणत्या रुग्णांना जाते यावर सविस्तर माहिती सांगितली. 

हिरामण बनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी भारत विकास परिषदेची शाळेला होणारी मदत व पालकांची आर्थिक स्थिती यावर भाष्य केले.  रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर ने मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी घेतलेल्या सहभागाबद्दल आभार मानले. 

भारत विकास ग्रुपचे कार्यकर्ते शिव पाटणकर यांनी विद्यार्थिनींसाठी ऍनिमिया चे माहितीपत्रक व विद्यार्थिनींच्या प्रार्थमिक माहिती संबंधीचे फॉर्म मुलींना भरण्यासाठी दिले हे काम पूर्ण झाल्यावर ॲनिमल संबंधित तपासणी करण्यात येईल. 

या कार्यक्रमास ५८ विद्यार्थिनी,  २८ पालक व भारत विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या क्लब मधील  अध्यक्षा डॉक्टर मृणाल नेर्लेकर, पीपी डॉक्टर राव, ऍन डॉक्टर शिल्पा नाईक आणि पीपी ऋजुता देसाई डायरेक्टर मेडिकल उपस्थित होते.

28th July

Global Grant Project : Baby warmer distribution

IPP Dr Shobha Rao, PP Nitin Abhyankar

The global grant project started with a big bang. So far we have done installations at twelve primary Heath centres. People in those villages and PHC staff are very happy and overwhelmed with the equipment being given to them.

Our  Chairman-Grants PP Nitin Abhyankar, PP Dr Rao and IPP Dr Shobha Rao have been visiting these PHC for the installation and other formalities.

From 28th July till 5th August, we have installed twelve baby warmers in the following PHC:

1. Kunjirwadi
2. Warwand
3. Kedgaon
4. Nangaon
5. Khamgaon
6. Rahu
7. Ravangaon
8. Kurkumbh
9. Mann
10. Male
11. Talegaon Dhamdhere
12. Nimone

At some of these PHC, we have donated packets of baby clothes which were given by our Anns.  Out of a total of twenty-three installations, we have already completed twelve of them. Our club is getting recognised in the rural area and this project is serving as an excellent PI for us.

30th July

Youth Avenue : Interact Installation at Madhyamik Vidyalay

Rtn. Sanjeev Choudhary

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही माध्यमिक विद्यालय एरंडवणा येथील Interact Installation धूम धडाक्यात झाले.

प्रेसिडेंट डॉ.मृणाल नेर्लेकर,सेक्रेटरी प्रमोद पाठक, PP.अंजली रावेतकर, PE डॉ.स्मिता जोग, युथ डायरेक्टर संजीव चौधरी उपस्थित होते 

सर्व विद्यार्थ्यांनी  ढोल आणि लेझीम च्या तालावर आमचे जंगी स्वागत केले. सुरेल स्वागत गीताने समारंभाची सुरुवात झाली आणि त्या नंतर दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. शेलार सरांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. मुख्याध्यापिका खोंडे मॅडम ह्यांनी त्यांच्या भाषणात वर्ष २०१० पासून रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर ने वेग वेगळ्या वर्षात केलेल्या भरगच्च मदतीचा आवर्जून उल्लेख केला. आणि सर्व Past President ह्यांचे नाव घेवून आभार मानलेआणि चाणाक्ष पणे ह्या वर्षी काय काय हवे ह्यांची यादी पण दिली. त्या नंतर Interact Installation झाले.  Interact  प्रेसिडेंट आर्यन मर्गळे व सेक्रेटरी भाग्यश्री कोंढाळकर ह्यांना प्रेसिडेंट  डॉ.मृणाल आणि सेक्रेटरी प्रमोद ह्यांनी interact पिन लावून इंस्टॉल केले. मावळत्या Interact President.  नंदिनी मारणे  आणि नवीन Interact President आर्यन मर्गळे ह्या दोघांनी ओघावत्या शैलीत विचार मांडले .आर्यन म्हणाला मी आता टीम चा रोहित शर्मा असलो तरी नंदिनी ताई विराट कोहली आहे आणि तिची मला नेहमीच मदत मिळेल.

त्यानंतर शेवटी रो.संजीव चौधरीरो.अंजली रावेतकर आणि प्रेसिडेंट डॉ.मृणाल नेर्लेकर ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. 

30th July

Ann’s Mehendi program

Ann Meenal Wagh

३० जुलै सायंकाळी चार वाजता रोटरी क्लबचा आठवा श्रावण सरीं बरोबर नेहमीची येणारा मेहंदी चा कार्यक्रम होता. उत्साही ऍन मीना इनामदार च्या घरी २६ मैत्रिणींची लक्षणीय उपस्थिती होती. 

मेहंदी ग्रीन असा ड्रेस कोड ऍन नेहाने सांगितला होता. हिरव्या रंगाच्या खूपच विविध छटा -जसं पिस्ता ग्रीन, हिरवा गार ग्रीन ,रामा ग्रीन पाहायला मिळाल्या तर काहींनी गुलाबी लाल असेही रंग निवडले होते.

मेहेन्दीच्या रेखनासाठी विभा ही कलाकार तयार होती.  ज्यांना लवकर जायचे होते त्यांनी भराभर नंबर लावून मेहंदी काढून घेतली. सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था होतीच.  मीना ,नेहा ,प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल यांनी चमचमीत बटाटेवडे, चटणी,शिरा आणि  कॉफी असा भरगच्च मेनू ठेवला होता.  सर्व खाऊन मगच मेहंदी काढा असा प्रेमळ आग्रह होता. खादाडी बरोबरच प्रेसिडेंट डॉक्टर मृणालच्या नेतृत्वात गप्पाष्टकही जोरदार सुरू होते.  सर्व मैत्रिणींची नावे लिहिणे शक्य नाही पण हास्य जत्रा भरली होती जणू काही !! थोडाच वेळ होतो पण खूपच मज्जा आली. ऍन नेहा ,तसेच रोटेरियन नंदिनी ह्यांनी भरपूर फोटो काढले आणि नेहाने आभारही मानले. एकूणच मेंदी कार्यक्रम अप्रतिम झाला.

1nd August

Youth Avenue

PP Nitin Abhyankar

लोकमान्य  मल्टिपरपस सोसायटी तर्फे  लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये, माध्यमिक विद्यलयाच्या २२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पीपी  नितीन अभ्यंकर यांचा माध्यमिकच्या शेलार सरांशी चर्चा  करून ते निबंध बँकेला सुपूर्त करण्यापर्यंत सर्व कामात फार मोलाचा वाटा आहे.

2nd August

Service project (Non-Medical) : school upliftment

Ann Alka Abhyankar

The food grains were delivered to Sarthak Seva Sangh on 1st August  Thank you PP Nitin Abhyankar, and Ann Alka for these consistent efforts.

4th August

Ann Project – Apte Muk Badhir Birthday celebrations

Ann Neha Pathak

मैत्रिणींनो ,

४ ऑगस्ट रोजी  आपटे मुक बधीर मध्ये मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.आपले वाढदिवस साजरे करणार तो दिवस त्यांच्यासाठी फार मोठा होता.त्यांचा उत्साह पाहून आपण सुरू केलेली ही प्रथा किती आनंद देऊन जाते हे पहिले.आपला खाऊ enjoy करत आनंदाने संपविला.

या कार्यक्रमाला प्रेसिडेंट डॉ.मृणाल, स्पॉऊस आशिष, पीपी अंजली रावेतकर, रो अश्विनी आणि ऍन नेहा पाठक उपस्थित होते.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016