नवे मित्र

पीपी अंजली रावेतकरचे वर्ष संपता संपता करोना जगभर हातपाय पसरू लागला आणि मग आले लॉकडाऊन. जग ठप्प झाले. पण आपल्या क्लबच्या ऑनलाईन मीटिंग चालूच राहिल्या .एवढेच नव्हे तर नवीन मेंबर्स सुद्धा येत राहिले. फिजिकल मीटिंग नसल्यामुळे या नवीन मेंबर्सची फारशी ओळख झाली नाही. या सदरातून आपण ती करून घेणार आहोत.

सचिन जोगळेकर

क्लब मेंबर

Ann प्रतिमा दुरुगकार

मे २०२० मध्ये सचिन जोगळेकर आपल्या क्लब मध्ये मेंबर झाले. श्रीकांत ने (दाते) त्यांना क्लब मध्ये आणले. पुण्यात डेक्कन वर टिपिकल मध्यम वर्गात सचिन वाढले. शिक्षण, खेळ आणि जीवन विषयक मूल्य यांचे बाळकडू त्यांना आजोबा (आईचे वडील)दादा करमरकर यांचे कडून मिळाले. दादा कायमच त्यांच्यासाठी आदर्श राहिले. सचिन यांचे शिक्षण बालशिक्षण मंदिर ,विमलाबाई गरवारे प्रशाला, मॉडर्न कॉलेज आणि भारतीय विद्यापीठ या ठिकाणी झाले व तेBE (Mech)झाले.त्यानंतर MBA(Marketing) त्यांनी Symbiosis मधून केले.

शालेय जीवनापासून खेळाची खूप आवड, त्यामुळे बॅडमिंटन ग्रुपचे कायम कॅप्टन राहिले. त्यातूनच पुढे स्पोर्ट्समध्ये करिअर करावे असेही वाटू लागले .पण त्यातील रिस्कचा विचार करता नंतर त्यांनी तो विचार सोडून दिला. तरीही बॅडमिंटन खेळणे चालूच राहिले. बॅडमिंटनच्या टूर्नामेंट्स मध्ये सचिन यांचा नेहमीच सहभाग असे.तेथेच त्यांना रोटरी ची माहिती मिळाली.या बॅडमिंटननेच त्यांना रोटरीत आणले .त्याचे असे झाले की प्रमोद जेजुरीकर व ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत असत. त्यांनी सचिन यांना 'रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे साउथ 'मध्ये १९८८साली इंडक्ट केले. सचिन यांच्याच म्हणण्यानुसार :रोटारॅक्ट झाल्यावर लाजाळू व न बोलणाऱ्या सचिन यांच्या व्यक्तिमत्त्वात एकदम बदल झाला आणि ते बोलके व सोशल झाले.” १९९१-९२मध्ये ते रोटरॅक्ट प्रेसिडेंट झाले. त्यानंतर District Director International Services हे पद त्यांनी ग्रहण केले आणि त्याचवेळी त्यांना Crompton Greaves मध्ये मुंबईला नोकरी मिळाली.

नवीनच लग्न झाले होते आणि ते मुंबईकर झाले. वर्षा यांच्याबरोबर मुंबईत सुरू केलेले सहजीवन जरी आर्थिक ओढाताणीचे होते तरीही तो अतिशय सुखी सहजीवनाचा काळ होता ,असे त्यांना वाटते. पुढे Thermax Culligan, ICICI Prudential, Tata AIA Life या कंपन्यांमध्ये नोकरी करीत असताना ते पुणे, केरळ,मुंबई असे नोकरीनिमित्त फिरत राहिले. या सर्व काळात ते जवळजवळ १५ देशात फिरले. नंतर मात्र विषय २०१६ मध्ये त्यांची भेट अरविंद परांजपे (जे सकाळ अर्थ विश्व मध्ये लिहितात व ज्यांना आपण व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड दिले होते) त्यांच्याशी झाली आणि मग Sarth Wealth Advisors Pvt.Ltd. या त्यांच्या कंपनीत दोघांनी भागीदार म्हणून व्यवसाय चालू केला आणि सचिन हे पुण्यात स्थिरस्थावर झाले.

सचिन यांचे कुटुंबात आई, लग्नानंतर पुण्यातच स्थायिक झालेली बहीण कोल्हटकर, मुलगा यश हे आहेत. यशने सिम्बॉयसिस मधून लिबरल आर्ट केले असून तो Schabang Banglore येथे नोकरी करत आहे. सचिन यांच्या पत्नी वर्षा या मागच्याच वर्षी दुर्धर आजाराने अनंताच्या प्रवासास निघून गेल्या. पण जाताना त्यांच्या सहजीवनाच्या छान आठवणी मागे ठेवून गेल्या. या आठवणींच्या बळावर त्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे.

यावर्षी त्यांनी Service -non medical director ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे .त्यांच्या perfectionist स्वभावाचा फायदा या avenue ला नक्कीच होईल. त्यांच्या जीवनातील आणि रोटरीतील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.