Skip to main content

1st April, 2024

नाट्यवाचन

आपल्या क्लबने पर्वती क्लब आयोजित नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेतला होता. ह्या वर्षी दोन गट होते.

एक – वृंदा लिखित एकांकिका आणि

दुसरी – अलका कांबळे अनुवादित एकांकिका.

ह्या दोन्ही एकांकिका १ एप्रिलला क्लब मधे सादर झाल्या. सगळ्या कलाकारांच प्रे. स्मिताताईंनी रोपं देऊन सत्कार केला.

8th April, 2024

साडीची वाटचाल

८ एप्रिल सोमवार, आपली घरचीच अप्रतिम business woman अप्रतिम ची सर्वे सर्व ann. मीना इनामदार हिची मुलाखत घेतली जेष्ठ पत्रकार ann. सरिता भावे ह्यांनी. मीना नी तिच्या साडी व्यवसायाच्या सर्व पायऱ्या छान उलगडून सांगितल्या. मोठे होणे पैशानी, मानानी, आपले स्थान निर्माण करणे, ही अतिशय अवघड गोष्ट परिश्रमाने साध्य केली आहे. अनेक सेलेब्रेटी तीचे कायमचे client आहेत. साडी व्यवसायात ती नवनवीन कल्पना आणते, काळाबरोबर चालते, बदल करते. सध्या ती व्यवसाया बरोबर business कसा करावा ह्याचेही मार्गदर्शन करते. सरिताने तीला छान बोलते केले. मीना ऊत्तम कूक आहे. सर्वांना खिलवण्यात तीला आनंद वाटतो. अश्या ह्या आमच्या मैत्रिणीला खूप शुभेच्छा.                

Ann.Anjali gadgil

सांदण

14th April, 2024

एप्रिल महिन्याचे वाढदिवस लग्न वाढदिवस साजरे करण्यासाठी आम्ही काहीजण १४ एप्रिलला सांदण ह्या खास कोकणी रेस्टॉरंट मधे भेटलो. उपस्थिती अगदीच माफक होती पण जे होते त्यांनी खूप एंजॉय केलं. सगळा मेनू   खास कोकणी होता. शहाळ्याची भाजी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला पण आणि चाखला पण. काजूची उसळ, सोलकढी, ताक, सुरणाचे काप, आंबोळी असे विविध कोकणी पदार्थ, गप्पा, केक कापणे, फोटो असा साग्रसंगीत प्रोग्राम झाला. नूतन आजी आजोबा, मंजिरी दिलीप ह्यांना प्रे स्मिताने सुंदर आजी आजोबा फोटो फ्रेम भेट दिली.

रो. वृंदा वाळिंबे

22nd April, 2024

मुलाखतीत भेटलेली माणसे - निलीमा बोरवणकर

“आयुष्य म्हणजे एकमेकांसमोर मांडून ठेवलेल्या क्षणांची एक ओळ असते आणि दिल्या घेतल्या प्रतिसादांची बेरीज वजाबाकी असते”
निलीमा बोरवणकरांचं भाषण ऐकताना मला पण दोन ओळी सुचल्या. प्रकाश गायकवाडने त्यांची ओळख करून दिली. आयुष्याविषयी  कविता म्हणून त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. मुलाखती घ्यायला, लेखनाला कशी सुरवात झाली हे त्यांनी उलगडून सांगितलं. मुलाखतीं दरम्यान काही मनात राहून जातं. इतक्या सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वांना भेटल्या निलीमाताई पण एका छोट्याशा मुलीची गोष्ट मनात राहिली. वयाच्या नवव्या वर्षी सहा वेळा ट्रेक केला तिने. सामान्यातील असामान्य लोकांच्या कथा सांगितल्या . मॅक्झिन मावशींची कथा, नृत्य शिकण्यासाठी भारतात येऊन राहिलेली परदेशी स्त्री, डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची मुलाखत प्रकाशित झाल्यावर त्याला मिळत गेलेले राष्ट्रपती पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आणि त्याचं जेट एअरवेजचा ब्रॅण्ड अॅम्बासडर होणं,  सुमा फूडसची वाटचाल, आयुष्याने ज्यांच्यावर अन्याय  केला अशांच्या गोष्टी, असं कितीतरी त्यांना मुलाखती दरम्यान भिडलेलं. मुलाखती घेताना काय मि‌ळालं ते सांगितलं. त्यांची  मुलाखतीची वेगळी शैली जाणवली. त्या म्हणाल्या, “लेखन करणे एक तऱ्हेने चित्र रेखाटणेच आहे”. एक सुंदर आठवणींचा सर गुंफत गेल्या त्या.
त्यांच्या बोलण्यातून त्यांचं संवेदनशील मन दिसत राहिलं. अतिशय ओघवती शैली, मराठी वर अपार प्रेम आणि भाषेवर हुकूमत, समृद्ध विचारसरणी असा त्रिवेणी संगम होता. अजून काही वेळ ऐकायला चालेल असं वाटायला लावणारे काही कार्यक्रम होतात, त्यातला एक होता.
कार्यक्रमानंतर वृंदाने आभार मानले व एक छोटीशी भेट देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

रो. वृंदा वाळिंबे

29th April, 2024

प्रभात पर्व

प्रभातची वाटचाल —२९ एप्रिल सोमवार आपलेच मेंबर अनिल दामले ह्यांनी प्रभातच्या वाटचाली विषयी एक छोटी फिल्म दाखवली आणि स्थापना ते प्रभात बंद होपर्यंतचा काल अतिशय सुंदर उलगडून सांगितला. अनिल नेहमी त्याच्या जगभरच्या सफारीवर अनेक माहितीपर भाषणे देतो. प्रभात फिल्म हे नावच सर्व मराठी लोकांच्या अतिशय जवळचे, हृदयातले आहे. मराठी माणसाची पहिली फिल्मकंपनी, खूप अभिमानाची गोष्ट आहे. १ जून १९२९ ला प्रभातची कोल्हापूरला स्थापना झाली. १९२९ ते १९३२  कोल्हापुरात ६ मुकपट बनले. त्यानंतर सध्याच्या film institute च्या जागेवर स्थलांतर केले. दामलेमामा, व्ही. शांताराम, फत्तेलाल, धायबर, कुलकर्णी असे सगळे मिळून प्रभातचे काम बघत. त्या सर्वांनी कामे ठरवून घेतली होती. त्या काळी आर्टिस्ट हे सॅलरी वर काम करत, त्यांना कार्ड पंचिंग असे. अश्या अनेक गोष्टी अनिलने उलगडून सांगितल्या. १९४५ ला अवघ्या पन्नाशीत दामले मामा गेले. कंपनी का आणि कशी बंद पडली, त्यांनी सर्व फिल्म्स कश्या मद्रासला जाऊन श्री मुद्लीयर ह्यांच्या कडून परत विकत घेतल्या अश्या अनेक गुलदसत्यातल्या गोष्टी अनिलने सांगितल्या. अनेक अजरामर फिल्म्स, माहितीपट प्रभातच्या नावा वर जमा आहेत. दामले मामांचा नातू अनिल, पणतू अमोल हे प्रभातचा वारसा सांभाळत आहेत, जपत आहेत. त्याचा ट्रेड मार्क तुतारी वाजवणारी ती कमनीय स्त्री जगभर फिल्म जगतात प्रसिद्ध आहे. त्याच्या फिल्म मधे अनेक दुर्मिळ क्षण आहेत सावरकर न. ची केळकरांचे अंत्यदर्शन घेत आहेत, संत तुकाराम मधील आवडी, कशाला उद्याची बात. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. सर्व दामले परिवाराने अतिशय मेहनतीनी, परिश्रम पूर्वक हा ठेवा सांभाळून ठेवला आहे त्यांना खरंच सलाम.                                                                 

अंजली गाडगीळ

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016