Skip to main content

1st April, 2024

शिवामूठ

1 एप्रिल सार्थक सेवा संघा मध्ये एप्रिल महिन्याचे किराणा सामान पोहोचले.

5th April, 2024

सुंदर मी होणार

5 एप्रिल शुक्रवार anns प्रोजेक्ट मधील हे वर्कशॉप लीना खांडेकर ह्यांच्या Lee’s Beauty Services मधे ऊत्तम पार पडले. 11 ऍनस नी ह्यात सहभाग घेतला. लीना ने अतिशय पेशंटली, आम्हाला सूट होईल असा मेकअप प्रत्येकीला स्वतंत्र पणे सांगितला. त्यामुळे खूप पर्सनल माहिती मिळाली. सर्व प्रॉडक्ट कुठे मिळतात, कंपन्या कोणत्या, याची सखोल माहिती दिली. आम्ही आमच्या हाताने स्वतः स्वतः ला मेकअप केला. खूप मजा आली. वर्कशॉप सहज सुंदर झाले. इतक्या थोड्या साहित्यात आपण हलका मेकअप करून छान दिसू शकतो हा कॉन्फिडन्स आमच्यात आला. प्रत्येकीच्या सर्व शं कांचे निरसन लीना ताई शांतपणे करीन होत्या. आम्हाला सुंदर बनवणारे हे वर्कशॉप खूप छान झाले  ह्यामध्ये प्रेसिडेंट स्मिताताई, सीमा, रंजना, जयश्री, अंजली गाडगीळ , अंजली रावेतकर , गिरीजा, मधुमिता, माधुरी, स्नेहा, रंजना ह्यांनी भाग घेतला आणि सुंदर होऊन घरी गेल्या.

अंजली गाडगीळ

28th April, 2024

Green Expo

रोटरी ग्रीन सोसायटी तर्फे रोटरी डिस्ट्रिक्ट  3131 च्या अंडर 27 एप्रिल आणि 28 एप्रिल या दोन दिवशी संभाजी पार्क येथे Green Expo हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ह्याचे होस्ट, रोटरी क्लब युवा, रोटरी क्लब सहवास, रोटरी क्लब टिळक रोड आणि  रोटरी  क्लब  विजडम असे होते. आपला क्लब या  Event चा सिनर्जी पार्टनर होता.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय काय करता येईल, पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून काय करता येईल, या गोष्टी ची जाणीव लोकांच्या निर्माण करणे व या समस्येवर विचार विनिमय करणे हा या एक्सपोचा मुख्य उद्देश होता. या एक्सपो साठी जावडेकर कन्स्ट्रक्शन ग्रुप, टाटा पॉवर, सोवा सोलर व इतर लोकांनी स्पॉन्सरशिप दिलेली होती. विषयाला अनुसरून येथे 44 स्टॉल धारकांनी भाग घेतलेला होता. त्यामध्ये सोलर एनर्जीचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे, मोठ्या स्केल वरती आणि घरच्या घरी असे स्टॉल तर होतेच पण त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्या, स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या, cold press technology वापरून तयार केलेली वेगवेगळी तेले,  millets  बेक करून तयार केलेले  पदार्थ अशासारखे  स्टाल्स होते .
एखादा कार्यक्रम ठरला की डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लासेस वापरले जातात त्याचा वापर टाळण्यासाठी भाड्याने क्रोकरी देण्यासाठीचे स्टोअर्स अशाही गोष्टी होत्या. त्याचबरोबर ह्या एक्सपो मध्ये वेगवेगळ्या विषयावरची व्याख्याने आयोजित केलेली होती. ज्या सोसायटीने पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न केले अशा सोसायटीना बक्षिसे देण्यात आली.   त्यामध्ये टेरेस गार्डन केलेली लोक होती. ओला आणि सुका कचरा नियोजन काटेकोरपणे केलेल्या सोसायटी इ.
या संधीचा फायदा घेऊन एक मे ला प्रदर्शित होणाऱ्या सुधीर फडके या चित्रपटाचे प्रमोशनही करण्यात आलं. त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक तसेच त्याच्यामध्ये काम केलेली काही कलाकार मंडळी उपस्थित होती.
या चित्रपटांमध्ये सुधीर फडके यांचा स्ट्रगल दाखवलेला आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे सुधीर फडकें नी म्हटलेली आणि संगीत दिग्दर्शन केलेली गाणी,  त्यातले काही भाग जसेच्या तसे त्याच्यामध्ये आंतरभूत  केल्याच दिग्दर्शकांनी सांगितलं. एकूणच आपण सर्वांनी सुधीर फडके हा चित्रपट बघायला हवा .
सिनर्जी क्लबचे प्रेसिडेंट आणि  होस्ट क्लबच्या प्रेसिडेंट ह्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या क्लबचे सिनर्जी चे  chairperson  संदीप तपस्वी यांचा रविवारी सकाळी सत्कार करण्यात आला. ह्या एक्झिबिशन मध्ये विषयाला अनुसरून गोष्टी अंतर्भूत केलेल्या होत्या त्यामुळे चांगला आणि फायदेशीर असा हा उपक्रम वाटला.
ह्या मध्ये पीपी डॉक्टर राव, डॉक्टर शोभाराव, गुरु पालेकर ,आर. टी. कुलकर्णी, मी व सिनर्जी चेअरमन संदीप तपस्वी ह्यांनी सहभाग  घेतला.

प्रे. डॉ. स्मिता जोग

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016