Skip to main content
President Elects Training Seminar

On 6th April 2024, during PELS (President Elects Training Seminar) in Mahabaleshwar, PP Vrinda did presentations in 3 breakout sessions as District Secretary Publications, 24-25. PP Sharad gave a presentation as part of the PI team for 24-25. Team RCPS Rocks. PE Bharati Dole attended PELS.

ॲन प्रतिमा दुरूगकर

५ एप्रिल रोजी भारती विद्यापीठ येथे स्नेह ज्येष्ठ नागरिक संघ, पौड रोड येथे ॲन प्रतिमा दुरूगकर हीचा ‘चला भटकायला पक्षांच्या जगात’ हा २४ वा दृक श्राव्य  कार्यक्रम सादर झाला. Keep it up Pratima.

Rtn Ashok Gadgil

Rtn Ashok Gadgil was invited to give a talk and presentation on Palmistry at RC Koregaon Park at Hotel Orchid Royal Central at Kalyani Nagar. Mamata Sakpal daughter of Late Sindhutai Sakpal who is now  Hon.Rotarian of that club had specifically come to attend his talk. Had a very good response from club members. Well done Ashok.

Rtn Pradeep Godbole

Rtn Pradeep Godbole participated in ‘Over 60s Cricket Tournament’ at Jamshedpur. Playing 4 back to back matches in 40 degree centigrade was exhausting. He received the “Most Valuable Player of the Tournament” Trophy. Congratulations Pradeep.

मंजिरी धामणकर

सुप्रसिद्ध निवेदक सतीश दिवाण यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराने २०१२ पासून निवेदन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ‘ शब्द मैफल ‘ हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. यंदाचा पुरस्कार विदुषी आशा खाडिलकर यांच्या हस्ते मंजिरी धामणकर हिला प्रदान करण्यात आला. खूप खूप अभिनंदन मंजिरी

Rtn Ashwini Ambike

Special report on activity done by Rtn Ashwini Ambike. Heartiest Congratulations and Appreciation for her. 

*स्वमग्नता आणि पथ नाट्यातून जन जागृती*

‘नाटकाची शाळा’ ची संचालक म्हणून काम करताना, मुळात लहान मुलांमध्ये काम करताना हल्ली दिवस कुठे सुरु होतो आणि मावळतो हेही कळत नाही.पण माझ्या प्रमाणेच लहान मुलांसाठी, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक शाळा, संस्था आहेत, ज्या कित्येक पटीने जास्त आणि समजपयोगी कामे करत आहेत.

‘Innocent Times School, Aundh’ ही स्वमग्न मुलांसाठी काम करणारी शाळा आहे. या शाळेच्या संस्थापक आणि संचालिका डॉ अंकिता संघवी दर वर्षी एप्रिल महिन्यात म्हणजेच ‘Autisn Awareness Month’ मध्ये स्वमग्नता या मेंदूतील गुंतागुंतीच्या आजाराविषयी जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य करतात. या वर्षी त्यांनी पथनाट्य स्वरूपात पुणे शहरातील गर्दी च्या ठिकाणी स्वमग्नता या विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्याचं ठरवलं., ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना या विषयी माहिती मिळेल. डॉ अंकिता यांना कोणीतरी आमच्या *नाटकाची शाळा* या संस्थेविषयी सुचवलं आणि त्यांनी लगेच मला भेटून 21 एप्रिल ही दोघींच्या सोयीची तारीख ठरवून टाकली. आम्ही लगेच त्यांच्या या संकल्पनेला होकार देऊन पथनाटये बसवण्यास सुरुवात केली.

दिलेल्या संकल्पनेवर आधारितच नाटके बसवायची असल्यामुळे या आजाराविषयीं आधी बराच अभ्यास करावा लागला. त्या दरम्यान डॉ अंकिता आणि मी 2/3 वेळा भेटून चर्चा केली आणि मगच 2 स्किट्स लिहून पूर्ण केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्किट्स लिहिलेली पाहून त्या खूपच खुश झाल्या.

पथनाट्य सादरीकरण हा काहीसा कालबाह्य झालेला नाटकाचा form मला या निमित्ताने मुलांना शिकवता आला. डॉ अंकिता आणि त्यांच्या टीम ने महानगर पालिकेची परवानगी घेऊन 4 गर्दीची ठिकाणे फायनल केली. करिष्मा चौक, कमला नेहरू पार्क, वर्तक बाग शनिवार पेठ आणि कलाकार कट्टा गुडलक चौक अश्या 4 ठिकाणी आम्हांला जायचे होते. त्यानुसार त्यांनी आमच्यासाठी ट्रान्सपोर्ट, रिफ्रेशमेंट्स, भरपूर पाणी, सरबत अशी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

सगळीकडे लोकांची खूप गर्दी होत होती. इतकेच काय, जाणारे येणारे लोक पण थांबून, उत्सुकतेने पथनाट्य बघून, प्रतिक्रिया देऊन, मुलांना भेटून, त्यांचे कौतुक करून जात होते. अनेकांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न, शंका विचारल्या आणि डॉ अंकिता आणि त्यांच्या staff ने त्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरेही दिली. प्रत्येक ठिकाणी पथनाट्याचा कार्यक्रम रंगत असे. त्यातून डॉ अंकिता यांचा जनजागृती चा उद्देश नक्कीच सफल झाला.
योगायोग असा की 3 महिन्यांपूर्वीच माझ्याकडे एक स्वमग्न मुलगा येऊ लागला आहे. Spectrum level बऱ्यापैकी कमी असल्यामुळे त्याच्याशी जुळऊन घेणे मला आणि इतर मुलांना सुसह्य आहे. नाहीतर शक्यच झालं नसतं कारण प्रत्येक autistic मूल वेगळं असतं,त्याच्या तऱ्हा पण समजून घ्याव्या लागतात.
माझ्या या पथनाट्य उभारणी साठी माझ्या मैत्रिणी आणि सहकलाकार सुषमा साने पटवर्धन आणि मेघना जोग यांची मला नेहमीच मोलाची मदत होते. आपल्या क्लब ची आपली मैत्रीण पी पी अंजली रावेतकर हिनेही खूप मोलाचा वाटा उचलला आणि कमला नेहरू पार्क च्या प्रयोगाची 2 दिवस आधीच जय्यत तयारी करून ठेवली होती. ती आणि डॉ सतीश प्रयोग बघायला देखील उपस्थित होते. या सगळ्यांचे खूप आभार. समाजसेवेसाठी एक खारीचा वाटा उचलल्याचे पण समाधान आणि नाटकाच्या शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांना खूप लहान वयात अश्या प्रकारे सामाजिक कार्याची जाणीव करून दिल्याची कृतार्थ भावना मनात आहे.

Ann Meena Inamdar

Ann Meena Inamdar received “Vipulashri” award for her contribution to the magazine over last 25 years on 27th April 2024

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016