Skip to main content

5th February, 2024

Experience of INS Vikrant by Ashok Kamble

सोमवारी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अशोक कांबळे यांचे त्याचे विक्रमादित्य या लढाऊ जहाजावरील अनुभव याबद्दल आपल्या क्लबमध्ये सादरीकरण झाले. अशोकचे काही यशस्वी एन सी सी कॅडेट्स सुद्धा कार्यक्रमास आले होते. त्यांचे कौतुक स्मिताताईंनी केले.

विषय जरी ” विक्रमादित्यवरील अनुभव” हा होता तरी अशोकने त्यानिमित्ताने संपूर्ण नेव्ही बद्दलच माहिती दिली. अशोक हा नेव्ही एन सी सी मध्ये ले. कमांडर आहे.

प्रथम अशोकने नेव्ही एन् सी सी ची व त्याच्या उद्दिष्टांची थोडक्यात माहिती दिली. नेव्हीच्या तीन कमांड्स आहेत १.पूर्व विभाग (विशाखापट्टणम), पश्चिम विभाग (मुंबई) आणि दक्षिण विभाग(कोची). स्वातंत्र्यानंतर रॉयल नेव्हीचा २/३ भाग भारताला मिळाला आणि १/३ पाकिस्तानला. नंतर आपण रशियाकडून अनेक जहाजांची खरेदी केली. आता गेली काही वर्षे मात्र आपण आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नात आहोत.

भारतातील लढाऊ जलसेनांमध्ये इंधन वाहक जहाजे, विमानवाहू जहाजे, डिस्ट्रॉयर्स, नियंत्रक जहाज, फ्रिगेट्स, आणि सबमरीन्स समाहित आहेत. युद्धासाठी सज्ज केलेली जहाजे सहायक असतात. ती देशाच्या समुद्री हितांचं रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महत्वाचं काम करतात. यात पुढील ताफा समाविष्ट आहे.

१. लढाऊ विमानवाहक जहाजे – विमाने वाहून नेणारी मोठी जहाजे. भारताकडे आयएनएस विक्रमादित्य, विक्रांत ही जहाजे आहेत. आयएनएस विराटला २०१७ साली जलसेनेतून निवृत्त केले गेले.
२. डिस्ट्रॉयर्स-  जलद आणि अनेक शस्त्रे व अस्त्रे यांनी समृद्ध अंतरसागरीय युद्धासाठी निर्माण केलेलं जलयान. कोलकाता-वर्ग आणि दिल्ली-वर्ग डिस्ट्रॉयर्स त्यांचं उदाहरण आहे.
३. फ्रिगेट्स- विविधोपयोगी वाहने आणि विविध भूमिकांसाठी योग्य जलयाने. शिवालिक-वर्गीय आणि तलवार-वर्गीय फ्रिगेट्स ही उदाहरणे.
४. पाणबुड्या – अंतर्वाहनासाठी वापरलेलं, समुद्राच्या खालच्या स्तरात विहरणारं जलयान. स्कॉरपीयन-वर्गीय हे एक उदाहरण. कल्वेरी, सिंधुघोष आणि चक्र.
५. इंधन वाहक जहाजे – इंधनाची वाहतूक करण्यासाठी. आय एन एस दीपक. यावरील वास्तव्याची माहिती अशोकने दिली.

ही जलयाने सुधारित शस्त्रसामग्री, रडार प्रणाली, आणि संवाद साधनांसह सुसज्जित केलेली असतात.

आयएनएस विक्रांत तेरा मजली तर विक्रमादित्य दहा मजली आहे. यांचे वर्णन “सिटी ऑन द सी” असे केले जाते. आयएनएस विक्रांत मध्ये हॉस्पिटल आहे. अद्ययावत किचन आहे.यावर विमाने हँगरमध्ये ठेवलेली असतात. इतर दारूगोळा देखील असतो.  विक्रमादित्यचा रनवे तब्बल ८०० मीटर चा आहे. एक जहाज बांधायला १० ते १५ वर्षे लागतात.

नेव्हीच्या भूतकाळापासून त्याच्या वर्तमानापर्यंत त्याच्यावर प्रशिक्षण कसे मिळते ते अशोकने सांगितले. जहाजाचे Bow, Port, Starboard आणि stern हे विभाग होतात याबद्दल त्याने माहिती दिली.

POSH (port onwards and starboard to home) या शब्दाची उत्पत्ती सांगितली. नेव्ही आणि वायुसेना, स्थलसेना यामध्ये सल्यूट करण्याच्या पद्धती, जेवणाच्या आणि नृत्य करण्याच्या पद्धती इ विषयांबद्दल त्याने मनोरंजक माहिती दिली.

अशोकने अनेक चित्रफिती आणि छायाचित्रांच्या द्वारे छान सादरीकरण केले. नंतर त्याच्या कॅडेट्सनी दोरीच्या गाठी मारण्याच्या विविध पद्धती दाखवल्या आणि त्याचे महत्त्व सांगितले.

अशोकची औपचारिक ओळख रो. चंद्रशेखर यार्दी याने करून दिली. आभार रो. संजीव चौधरी याने मानले.

रो. चंद्रशेखर यार्दी

9th February, 2024

कोठडिया आणि डॉ. अमित देवकुळे यांना रोटरी शांतता पुरस्कार’ प्रदान

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर ह्यांनी शांतता पुरस्कार देण्याची प्रथा २०१६ – २०१७ मध्ये सुरु केली. हे पुरस्कार दर वर्षी देता यावे म्हणून “डेव्हलोपमेंट एजुकेशन (इंटरनॅशनल) सोसायटी, पुणे”, ह्यांनी शिवाजीनगर क्लब ला एक देणगी दिली आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर आणि रोटरी क्लब ऑफ विझडम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत कोठडिया आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. अमित देवकुळे यांना एका विशेष समारंभात, अनुक्रमे रोटरी क्लब, शिवाजीनगरच्या अध्यक्षा डॉ. स्मिता जोग आणि रोटरी क्लब, विसडमचे अध्यक्ष श्री. सारंग बालंखे यांच्या हस्ते “रोटरी शांतता पुरस्कार” देण्यात आला. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असलेला हा समारंभ शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी, पौडरस्त्यावरील ‘स्वप्नपूर्ती’ सभागृहात पार पडला.

या प्रसंगी, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (ईलेक्ट) श्री. शीतल शाह, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप वाघ, सचिव डॉ. भारती डोळे, श्री. प्रशांत खानखोजे, ‘बाएफ’ संस्थेचे माजी पशुरोगतज्ञ डॉ. वासुदेव सिधये, श्रीमती मंजिरी धामणकर, श्री. अनिल दामले, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सृष्टी’ संस्थेचे संस्थापक असलेल्या श्री. प्रशांत कोठडिया यांनी ‘वनराई’ संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून वनीकरण व ग्रामीण विकासाच्या, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुमारे दीडशे अमेरिकी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘भारतीय समाज आणि विकास’ या आंतरराष्ट्रीय शिक्षणक्रमाचे संचालक म्हणून भरीव कार्य केल्याबद्दल, अमेरिकेतील प्रसिद्ध ‘युनिवर्सिटी ऑफ पेन्सिलवानिया ने त्यांचा विशेष गौरवही केला होता. राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि सल्लागार म्हणून श्री. कोठडिया मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

आंतरराष्ट्रीय शांतता व मानवी हक्क संघटनेचे सदस्य म्हणून कार्यरत असणारे डॉ. अमित देवकुळे हे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्य व्यवस्थापन, आत्मिक विकास आणि योगाभ्यासाच्या माध्यमातून ‘नेतृत्वगुणवर्धन’ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रकारचे कार्य करण्यासाठी श्री. देवकुळे यांनी ‘सोल ओंमकार’ (Soul Omkar) ही संस्था स्थापन केली आहे.

या प्रसंगी पुरस्कारार्थी श्री. प्रशांत कोठडिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘समाजिक संवेदना’ वाढविल्या शिवाय तसेच कुटुंब, जात, धर्म, भाषा, प्रांत, आदी संकुचित मनोवृत्ती सोडून समाजातील दुबळ्या लोकांसाठी कार्य केल्याशिवाय ख-या अर्थाने समाजामध्ये शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन केले.

डॉ. अमित देवकुळे यांनी समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्व विशद करताना, युवकांना शांतता आणि सहकार्याचे संस्कार रुजविण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या व्यासपीठावरून जगभरात जे विधायक प्रयत्न सुरू आहेत, त्याची माहिती दिली.

प्रारंभी डॉ. प्रदीप वाघ यांनी, भारतात आणि जगभर शांतता व सौहार्द वृद्धिंगत व्हावा म्हणून ‘रोटरी क्लब’च्या वतीने जे अनेकविध उपक्रम राबविण्यात येतात त्याची माहिती दिली. रोटरी शांतता पुरस्कार ह्याच्या मागचे उद्दिष्ट डॉ . प्रदीप वाघ ह्यांनी विशद केले.

श्री. शीतल शाह यांनी, रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम करण्यावर आपला भर राहील, असे शेवटी प्रतिपादन केले.

डॉ. स्मिता जोग यांनी उपस्थितांचे स्वागत करून, श्री. कोठडिया यांचा; तर, श्री. सारंग बालंगे यांनी श्री. देवकुळे यांचा परिचय करून दिला.

रेशमा कुलकर्णी हिने सूत्रसंचालन केले. श्री. सारंग बालंगे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

ह्या कार्यक्रमाचे YouTube वृत्तांत खालील link वर आहे.

19th February, 2024

किरण वाळिंबे शोक सभा

पी पी रो. किरण वाळिंबे यांचे दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यासंदर्भात क्लबमध्ये दि.१९ फेब्रुवारी रोजी शोकसभा घेतली गेली. प्रथम अध्यक्ष स्मिताताईंनी मनोगत व्यक्त केले . नंतर सचिव भारती हिने किरणच्या आठवणी सांगितल्या. नंतर रो. शेखर यार्दी, मिलिंद पालकर आणि शरद डोळे यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. किरणची सून नेहा आणि वृंदाची बहीण वर्षा हे सुद्धा या सभेस उपस्थित होते. वर्षाने देखील आपले मनोगत व्यक्त केले.

26th February, 2024

Scientist Award

Monday the 26th of February was a celebration of science and its contribution to agriculture and human existence.

Pollination and its immense importance for sustaining life on earth was explained in an amazing way.

Scientist Award of our rotary club for this year was presented to Dr Dnyaneshwar Firake by our president Dr Smita Jog and Rot Avinash Kulkarni .

Dr Suryaprakash Rao was instrumental in identifying this scientist and helped us give the award to a truly deserving person.

Rot Kalyani Pendharkar introduced the speaker and briefed the audience on his academic achievements . She spoke about how entomology was not a very popular topic and so we were all eager to listen to him.

Dr Firake had put together a very informative and interesting presentation with many visual treats. He spoke passionately about pollination and its need and benefits for urban and rural areas.

He is a very knowledgeable person who has been given a huge responsibility by the govt to set up a floriculture institute at mundhwa. He is doing pioneering work in research and in helping farmers.

He shared slides of various varieties of flowers and how they attract bees who are very important pollinators.The types of bees, many who don’t sting, their capacity to produce honey, the hierarchy in their habitats, social behaviour and communication skills. Very interesting patterns were explained.

His childlike enthusiasm for his subject was refreshing.A question answer session was very spontaneous and well received.

He welcomed a visit to his institute and got a very enthusiastic response from our Anns.

Vote of thanks was given by Ann Vasundhara Phulambrikar.

Ann. Vasundhara Phulambrikar 

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016