Skip to main content

16th October, 2023

कौतुक सोहळा

१६ ऑक्टोबर रोजी एकांकिकेत काम केलेल्या कलाकारांचा कौतुक सोहळा पार पडला.

23rd October, 2023

तंबोला

२३ ऑक्टोबर रोजी DRT चे रो. डॉ. अभय सोनटक्के यांनी आपल्याशी संवाद साधला. DG Manjoo आणि त्या़च्या team ने रोटरी ची माहिती सगळ्या मेंबर्स पर्यंत पोहोचविण्यासाठी interesting games तयार केले. सगळ्यांनी तंबोला या खेळाची मजा घेतली.

27th October, 2023

कोजागिरी

ॲन सरिता भावे

२७ तारखेला आपल्या क्लब मध्ये दांडिया व कोजागिरी कार्यक्रम साजरा झाला. सर्व महिलांनी नटून थटून त्यात भाग घेतला. सर्वजण दांडीया उत्साहाने खेळले .अलकाने व स्नेहाने सगळ्यांना स्टेप्स शिकवल्या. अंजली रावेतकर व सीमाच्या नातींनी पण हौसेने भाग घेतला. प्रेसिडेंट स्मिता ताईंनी त्यांचे कौतुक केले. क्लब तर्फे वेल ड्रेस लेडीजची चार बक्षीस दिली. स्नेहा, कल्याणी, अश्विनी, अलका कांबळे यांनी ती पटकवली. सचिन रश्मी व अभिषेक सुवर्णा यांनी बेस्ट कपलची बक्षिसे मिळवली. डॉक्टर दीपाचा नुकताच साठावा वाढदिवस झाला त्याबद्दल व तिला नात झाल्याबद्दल सर्वांना डोसा,आप्पे, सांबार, भाजी, चटणी, पुलाव, केक असे चविष्ट जेवण दिले. चारोळी, केशरयुक्त मसाला दूध याने जेवणाची रंगत वाढवली आणि अॅन्स कमिटीने खूप मेहनत घेऊन हा उत्तम कार्यक्रम योजला.

4th November, 2023

दिवाळी पार्टी

ॲन प्रतिभा गोखले

दरवर्षीप्रमाणे क्लबची दिवाळी पार्टी ४ नोव्हेंबर  रोजी पुण्याई सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. प्रवेश द्वारापाशी सुंदर रांगोळी काढली होती. तसेच हळदीकुंकू अत्तर आणि गजरे यांनी उत्सवाच्या वातावरणामध्ये भर घातली. प्रारंभाचे चहापान झाल्यावर मीटिंगची सुरुवात झाल्यावर रो. उज्वल मराठे यांनी नॉमिनेटिंग कमिटी इलेक्शन विषयी अत्यंत मुद्देसूद आणि नवीन सभासदांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले. त्यानंतर आपल्या पुशच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात पल्लवी गोखले हिने आपल्या क्लब मधील तीन कपल्स घेऊन एक छोटा खेळ घेतला. तिच्या खुसखुशीत प्रश्नांमुळे कार्यक्रम खूपच रंगला. नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. राजेश्री जावडेकर आणि त्यांच्या सहकारी यांनी ‘आभास’ हा कथक नृत्याचा आविष्कार सादर केला. त्यांचे एकल नृत्य तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे समूह नृत्य दोन्हीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. नृत्याच्या कार्यक्रमानंतर बेस्ट ड्रेस साठी रोटेरियन, अॅन आणि कपल्स अशी बक्षीस देण्यात आली. जर्मनीमधील रोटरी क्लब येथील एक सभासद डॉक्टर ब्राऊन आणि मोनिका ब्राऊन हे या कार्यक्रमास आवर्जून आले होते. डॉक्टर ब्राऊन यांनी त्यांचे विचार मांडले. नंतर नॉमिनेटिंग कमिटीचा निकाल जाहीर झाला. रो. अनिल दामले हे ह्या कमिटीवर सर्वाधिक मते मिळवून कन्विनर झाले. नंतर सर्वांनी सुग्रास भोजनाचा आनंद घेतला. हे भोजन नितीन व अलका अभ्यंकर आणि शिरीष क्षीरसागर यांनी आजी आजोबा झाल्याबद्दल आयोजित केले होते.

20th November, 2023

लख लख चंदेरी

ॲन मीना इनामदार

मास्टर “कृष्णराव फुलंब्रीकर” यांची मनोज फुलंब्रीकरने करून दिलेली ओळख ही आजोबा म्हणून  फारच खुमासदार होती. ऊत्कृष्ट गायकी इतकाच विनोद हा त्यांचा स्थायीभाव होता. मा. कृष्णराव यांचा जन्म आळंदीचा, तर कुटुंब पुण्याचे. नवनिर्मिती चा सतत ध्यास कृष्णरावांना होता. संगीतकार नौशाद यांचे कृष्णराव हे प्रेरणा स्थान होते. याच कृष्णरावांनी चायनात चायनीज गाणं गाऊन आनंदाची ऊधळण केली होती. कृष्णराव यांचा संगित कालावधी पंच्याहत्तर वर्षांचा होता. त्यांनी भारतभर संगीत मैफली गाजवल्या.
लहान वयातच त्यांचे वडील गेले. नाट्य प्रवर्तक सवाई गंधर्व हे त्यांचे पहीले गुरू. गायनाचार्य भास्कर यांचा सहवास त्यांना १० वर्षे मिळाला. शास्त्रीय गायकी ही ऐकायला सोपी पण गायला अवघड. कृष्णराव यांची गायकी भिमसेनजी, आणि भास्कर राव यांची आठवण येईल अशीच होती. ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असे. एक चीज़ ते दोन दिवस वेगवेगळ्या पध्दतीने गायचे. त्यांना “मैफलींचा बादशहा ” असे संबोधिले जायचे.
यांच्या गायकीतले सौंदर्य वेगळे आहे असं लोकमत होते. एकावेळी दोन चिजा़ ते मैफली चालू असताना बांधायचे. अठरा वर्ष गंधर्व कंपनीत होते. सिनेमात नवनिर्मिती, कल्पनेतील चाल गाणं बनून आली, “लख लख चंदेरी”, “धुंद मधुर ही” गाणी.  नौशाद, वसंतदेसाई, यांना त्यांनी “ऊंगली पकड के चलना सिखाया” या भावना.
काळ बदलला .संगीतावर मरगळ आली. गाण्याची चाल तयार नसताना अजरामर झालेलं पहीलं युगलं गीत, कृष्णाराव यांचे कुलवधू मधील, एखाद्या बंदीशीचा आधारही न घेता तयार झालेलं. कृष्णाराव यांनी वंदे मातरम ला राष्ट्रगीत म्हणून स्थान मिळण्यासाठी प्रयत्न केला. सोपी आणि मधूर चाल दिली. कृष्णारव यांचे दीडशे राग आणि 400 चिजा़, सत्तावीस भैरवी, आहेत. त्यांना अनेक पुरस्कार,  मान सन्मान प्राप्त झाले आहेत.रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे .
कृष्णारावांना कोणी काय गायले विचारले तर ते म्हणत आज मास्तर आनंद गायले. अशा “मैफली च्या बादशहाचा एकोणीसशे चौ ऱ्याहत्तरला अस्त झाला .
हा कार्यक्रम सुरेखच झाला. सीमाने करून दिलेली ओळख, मास्तर यांच्या गायकी बद्दल जाणून घेताना कृष्ण धवल चित्रपटात ली गाणी ऐकताना बहार आली .

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016