Skip to main content

साहसी, सुरेल सीमा

आपल्याकडील ६४ कलांपैकी काही ना काही कलागुण प्रत्येक व्यक्तीत असतातच. कोणाचे ते गन लहानपणापासून दृष्टोत्पत्तीस येतात, तर कोणाचे वर्षानुवर्षे सुप्तच राहतात. अर्थात हे सुप्त गूण कधी प्रकटपणे दिसतील हे मात्र सांगता येत नाही. त्यांना पोषक अशी “स्थळ काळ परिस्थिती” लाभली कि ते दृगोच्चर होतात आणि त्या व्यक्तीचं जीवन समृद्ध करतात, एवढंच नाही तर कोणाच्या आयुष्यात ते चांगल्या अर्थाने ‘टर्निंग पॉईंट’ हि ठरतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली मैत्रीण सीमा, सीमा महाजन.
सीमा म्हटलं कि प्रथम आठवतं ते तिचं सुरेल गोड गाणं. सीमा म्हणजे सुरेल गोड गाणं हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के आहे. पण खुद्द सीमाला मात्र तिच्या या सुरांवरच्या प्रेमाची जाणीव तिच्या वयाची तिशी उलटली तरीही नव्हती. सीमा पुण्याचीच असली तरी तिचा जन्म कुवेत मध्ये झाला आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी ती पुण्यात आली. तिची आई शाळेत शिक्षिका होती आणि वडिलांचा टॅक्सीचा व्यवसाय होता. सीमाला एक भाऊ व एक बहीण. सीमा भावंडात थोरली. चाळवजा घरात वास्तव्य असल्याने आणि घरात दोन भावंडं असल्याने सीमाचं बालपण खूप मित्र मैत्रिणींच्या गराड्यात आणि छान खेळण्यात व्यतीत झालं. अर्थात आईची नोकरी आणि घरात धाकटी भावंडं, त्यामुळे सीमेवर थोरलेपणाची जबाबदारी आपसूकच आली. सीमाची आई नोकरीत असल्याने तिला प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असावे असे वाटत असे. त्यामुळे सीमानेही डॉक्टर वगैरे व्हावे असे तिला वाटे. त्यादृष्टीने सीमा सायन्स कडे गेली. पण तिचा मूळ कल खरं तर आर्टस् कडे होता. पण त्यावेळी त्याची प्रखरतेने जाणीव नव्हती. तसेच आत्मविश्वासही पुरेसा नव्हता. त्यामुळे तिने सायन्स साईड घेऊन बी. एस्सी. केले. पण मजा म्हणजे तिचे ग्रॅजुएशन पुराणिकांच्या घरात म्हणजे तिच्या माहेरी झालं नाही. ती एस वाय ला असतानाच सी डीं च्या घरून त्यांच्या आई वडिलांनी सीमाला सी डीं बरोबर लग्नासाठी म्हणून मागणी घातली. मग काय? लग्न ठरलंच आणि झालंही. मात्र सीमाने शिक्षण पूर्ण करून देण्याचं आधीच काबुल करून घेतलं होतं. त्यामुळे सीमाने लग्नानंतर एस वाय आणि टी वाय पूर्ण केलं आणि बी. एस्सी. ची पदवी संपादन केली.
शिक्षणानंतर सौरभ आणि सौमित्र चा जन्म झाला आणि सीमा संसारात व्यग्र झाली. योगायोगाने तिला कॉसमॉस बँकेत नोकरी मिळाली. साहजिकच ती बँकेत रुजूही झाली. पण ‘प्रथम ग्रासे मक्षिका पात:’! पहिल्याच दिवशी बँकेतून ती घरी गेली तर मुलाला प्रचंड ताप भरलेला. मग काय? तिच्या सासू सासऱ्यांनी लगेच फर्मान काढलं की तू नोकरी करू नको. तसं पाहिलं तर सीमाची आई नोकरी करत होती. त्यामुळे नोकरदार महिलांच्या मुलांना काय अडचणी येऊ शकतात त्याची सीमाला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे मुलं मोठी होईपर्यंत आईने नोकरी करू नये असं कुठेतरी तिलाही पटत होतं. पण आपण आपल्या पायावर उभं असावं हा विचारही तिला पटत होता. त्यामुळे नोकरी सोडू नये असंही वाटत होतं. पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती कि तिच्या मुलांना सांभाळणार कोण? कारण तिची आई अजून नोकरीत होती आणि सासू सासरे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते, ते त्यांच्या व्यापात बुडलेले असत. त्यामुळे सीमा एक दिवसच बँकेत गेली आणि मग नोकरी सोडून घरात थांबली. अर्थात त्यामुळे मुलांचं संगोपन नीट केल्याचं समाधान तिला निश्चित आहे.
त्या काळात तशी ती स्वस्थ बसली नाही. तिने बालभवन चालवणाऱ्या शोभा भागवतांकडे ट्रेनिंग घेतलं आणि डहाणूकर कॉलनीत मुलांसाठी ग्राऊंड सुरु केलं. खेळ, व्यायाम, संस्कार वर्ग असं सारं तिथे मुलांना उपलब्ध ठेवलं. १० मुलं घेऊन सीमाने सुरु केलेल्या ह्या ग्राऊंडचा लाभ पुढे १५० मुलांनी घेतला. चार पाच वर्षे हा उपक्रम चालवल्यानंतर सीमाची मुलं मोठी झाली, तसं तिनेही ग्राऊंडला जाणं थांबवलं. मात्र ह्या उपक्रमामुळे तिला स्वतः मधली बेधडक वृत्ती, अनोळखी लोकांना भेटून हवी ती माहिती घेऊन काही उपक्रम सुरु करण्याची धडाडी आणि आत्मविश्वास ह्यांची उत्तम प्रकारे जाणीव झाली. सीमा १९८८ पर्यंत वाहन चालवत नव्हती. त्यावर्षी ती स्कूटर शिकली. नंतर १९८९ मधे सी डी नी गाडी घेतली आणि स्वतःच सीमाला गाडी चालवायला शिकवली. एवढंच नव्हे तर तू ऊत्तम प्रकारे गाडी चालवू शकशील, असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण केला आणि गाडी चालवायला तिला उद्दयुक्त केलं. मग मात्र सीमा मधलं साहस उफाळून आलं. सीमा स्कूटर च काय पण बुलेट आणि येझदीच नाही तर चार चाकी गाडीही सराईतासारखी दणकून वेगात चालवू लागली. सीमाला आठवतं कि कर्वे रोडवरून ती दोन्ही मुलांना मागे बसवून वेगात बुलेट आणि येझदी चालवत जायची तेंव्हा लोकं खरंच तिच्याकडे अचंब्याने बघत असत. तिच्या आईलाही तिचं हे गाड्या चालवणं बघून खूप समाधान वाटलं. सीमा सांगत होती कि “तिची आई अनेक गोष्टीत पारंगत होती. शिवणकाम, विणकाम, भरतकाम वगैरे. पण या कशातच सीमाला रस नव्हता, त्यामुळे तिने त्यात लक्ष घातले नव्हते. त्यामुळे सीमाचं वाहन चालवणं, ग्राऊंड घेणं ह्या गोष्टींनी आईला खूप आनंद दिला.
दरम्यानच्या काळात सीमाने एका त्वचा रोग तज्ज्ञांच्या लॅबमध्ये लॅब असिस्टन्ट म्हणून तीन वर्षे नोकरीही केली. तसेच तिने गाणं शिकायला सुरुवात केली. सुमारे १०-१२ वर्षे ती राजाभाऊ देव ह्यांच्याकडे गाणं शिकली. तिने गाण्यातली विशारद पदवी प्राप्त केली. अर्थात हे गाणं शिकणं सहजच सुरु झालं होतं. सीमा म्हणाली, “शाळेत असताना ऑफ तासाला मुली मला गाणं म्हणायला सांगायच्या. तेव्हढ्यापुरताच माझा गाण्याशी संबंध होता. बाकी गॅदरिंगमधे नाच, गाणे, नाटकात भाग घेणं व्हायचं. पण त्याविषयी विशेष काही जाणीव मनात नव्हती”.
सीमाचं हे गाणं शिकणं चालू असतानाच तिच्या आईचं अपघाती निधन झालं. ते वर्ष होतं १९९१ चं. सीमाला आईच्या मृत्यूचा फार शॉक बसला. तिला त्या दुःखातून बाहेर येणं जमेनासं झालं. तेव्हा तिच्या गाण्याच्या क्लासमधे बाल शिक्षण शाळेच्या प्रिन्सिपल बाईही गाणं शिकायला येत होत्या. त्या सीमाचं गाण्यातलं प्राविण्य पाहत होत्या आणि तिचं आईच्या मृत्यूचं दुःखही. त्यांना वाटलं, हिला या दुःखातून बाहेर काढायचं तर तिला कष्ट तरी गुंतवलं पाहिजे. त्यांनी तिला बाल शिक्षण शाळेत म्युझिक टीचर होण्यासाठी ऑफर दिली आणि सीमा बाल शिक्षण शाळेत म्युझिक टीचर म्हणून रुजू झाली. पुढे २७ वर्षे सीमाने ही नोकरी केली आणि ती मुझिकमधे बुडून गेली. अशातऱ्हेने सीमाचा हा संगीतामधील रुचीचा सुप्त गन तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंटच ठरला.
शाळेत रुजू झाल्यावर मुलांना गाणं शिकवणं, गॅदरिंगला त्यांची गाणी बसवणं, गाण्यांना चाली देणं, त्यांची नाटकं बसवणं असं सारंच सुरु झालं. त्यातच आपल्या क्लबच्या माध्यमातून तर तिला याबाबतीतली अनेक दालनच खुली करून दिली. सीमा सीडी १९८९ मध्ये आपल्या क्लबचे सभासद झाले, आणि सीमाने रोटरीच्या होणाऱ्या गायन, एकांकिका, नाट्यवाचन अशा साऱ्या स्पर्धांमध्ये सातत्याने भाग घेऊन सर्व प्रकारात अनेक बक्षिसं मिळवली. आपल्याला तिचे हे अभिनयासह सर्व गुण चांगलेच परिचित आहेत. सीमा म्हणतेच की संगीतामुळे आणि आपल्या क्लबमुळे तिला स्वतंत्र ओळख मिळाली.
संगीताच्या गुणांबरोबरच तिच्या गाडी चालवण्याचा मोठाच फायदा तिच्या शाळेलाही झाला. तिच्या शाळेत इंटर ऍक्ट क्लब चालू होता. त्यांची एक कॉन्फरेन्स पनवेलला होती. सीमा क्लबच्या १५ मुलांना घेऊन पनवेलला जाणार होती. पण ऐनवेळी ड्रायव्हर आलाच नाही. तेंव्हा सीडींनी त्यांची स्कॉर्पिओ तिला देऊ केली. गाडीतल्या सीट्स काढून टाकून गाडीत सतरंज्या पसरण्यात आल्या आणि त्यावर १५ मुलांना बसवून सीमा स्कॉर्पिओ घेऊन पनवेलला वेळेत दाखलही झाली. सीमा सांगते की, ” शाळेतल्या त्या मुलांना अजूनही माझं ते गाडी चालवत पनवेलला जाणं चांगलंच लक्षात राहिलं आहे.
अशीच गोष्ट शाळेतल्या शिक्षकांच्या सहलीची. त्यांची ट्रीप कोकणात गेली होती. येताना टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरला भयंकर झोप येऊ लागली. ते पाहून सीमा पुढे झाली. ती त्या ड्रायव्हरला म्हणाली, “तुम्हाला भयंकर झोप येतेय. तुम्ही गाडी चालवू नका.” त्याने विचारले मग कोण गाडी चालवणार? सीमा म्हणाली मी चालवते. आणि सीमा ती टेम्पो ट्रॅव्हलर चालवत सगळ्या शिक्षकांना पुण्यात सुखरूप आणि योग्य वेळेत परत घेऊन आली. तर अशी हि सीमाची साहसी वृत्ती.
याच वृत्तीला अनुसरून तिला ट्रेकिंगची खूप आवड आहे. तिने सह्याद्रीतले गड किल्लेच नव्हे तर हिमालयातही अनेक ट्रेक केले आहेत. सिंहगडावर जाणं तर तिला नित्याचंच झालं होतं. ह्या तिच्या साहसी वृत्तीचं प्रत्यंतर नर्मदा परिक्रमेतल्या तिच्या सहकाऱ्यांना वेळोवेळी आलं होतं. १९ दिवसांच्या त्या परिक्रमेत तिने नर्मदेत बुड्या मारून स्नान करण्याची संधी एक दिवसही चुकवली नाही.
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सीमाचा देवावर प्रचंड विश्वास आहे. अध्यात्माची, ध्यान धारणेची तिला आवड आहे. या साऱ्या गोष्टींत सीडींची तिला शंभर टक्के साथ असते. एवढंच नव्हे तर तिला आत्मविश्वास देणं आणि तिच्याकडून ह्या विविध गोष्टी करून घेण्यास सीडीच कारणीभूत असल्याचं सीमाने प्रांजळपणे सांगितलं. आता दोन मुलगे, दोन सुना, तीन नातवंडे आणि सीडी या साऱ्यांच्या सहवासात ती पूर्ण सुखी आणि समाधानी आहे. आता सीडींबरोबर भटकंती करणं आणि सर्वांना कोकणी तसेच इतर सुंदर पदार्थ करून खाऊ घालण्याची तिची ईच्छा आहे. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच आपल्या सर्वांतर्फे तिला शुभेच्छा

सरिता भावे

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016