Skip to main content

3rd March, 2024

Birthday/ anniversary

टेरासिन!! रविवार दिनांक 3 फेब्रुवारी या दिवशी आपल्या क्लबने काही सभासदांच्या लग्नाचे आणि व्यक्तिगत वाढदिवस साजरे करण्याच्या दृष्टीने एक अतिशय आगळावेगळा कार्यक्रम तितक्याच आगळ्यावेगळ्या ठिकाणी आयोजित केला होता. ही जागा होती फर्ग्युसन रस्त्यावरील टेरासिन नावाच्या एका रेस्टॉरंटची! या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे, हे जरी व्यावसायिक पद्धतीने चालवलेलं असलं तरी, येथे काम करणारी सर्व मंडळी ही तुमच्या आमच्या व्याख्येतील सर्वसाधारण माणसं नाहीत. समाजाने नाकारलेल्या आणि तिरस्कारलेल्या आपल्याच लोकांना एकत्र आणून त्यांना देखील सर्वसाधारण आयुष्य जगता येते हे दाखवून देणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर सोनम कापसे. डॉक्टर सोनम यांना पाहून मला एका जपानी फोटोची आठवण झाली. जपान मध्ये अणू हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी एक दहा-बारा वर्षाचा मुलगा आपल्या तीन-चार वर्षांच्या मृत बहिणीला पाठीवर बांधून स्मशानभूमीत आपला नंबर येईपर्यंत शांतपणे वाट बघत उभा असतो.
त्याला पाहून एक पोलीस म्हणतो, अरे ती मेली आहे, ठेव तिला खाली. तेव्हा तो मुलगा म्हणतो मला तिचं बिलकुल ओझं वाटत नाही. ती माझी बहीण आहे. बहिण मेली तरी ती आपली आहे, असं म्हणणाऱा तो लहान मुलगा आणि समाजातील तिरस्कारलेल्या लोकांना आपलं म्हणणारी डॉक्टर सोनम, मला तरी हे एकाच चित्रातले वाटतात! मृत बहिणीला देखील सांभाळणाऱा तो भाऊ आणि ही तर जिवंत माणसं !! यांच्याच जिद्दीतून सुरू झालेला उपक्रम म्हणजे हे रेस्टॉरंट टेरासिन ! इथे काम करणारे कर्मचारी हे मतिमंद आहेत, किंचित विकलांग आहेत, काही दृष्टिहीन सुद्धा आहेत काही आत्म मग्न आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि विकृती देखील! तुम्ही कल्पना करा ! अशा एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधायचा असेल, तर ती किती कठीण गोष्ट आहे. समाजातील अशा दुर्लक्षित घटकांना आपण किती सहजपणे स्वीकारतो याचे उत्तर आपण प्रामाणिकपणे देऊ शकत नाही.

मी फुटपाथ वरून रेस्टॉरंटच्या अंगणात पाय टाकला आणि माझं स्वागत करायला अतिशय प्रसन्न आणि गोड व्यक्ती पुढे आली आणि मला गुड मॉर्निंग म्हणून आय ऍम युअर होस्ट असे म्हणाली आणि माझा हात धरून आत घेऊन गेली. येताना स्वागत पर काहीतरी बोलत होती परंतु मला ते ऐकू येत नव्हते. त्या व्यक्तीला पाहून, देवाने हिच्यावर का अन्याय करावा असं वाटून मी देवाला दोन-चार शब्द बोललो देखील!! नंतर आत गेल्यानंतर कळलं की माझं स्वागत केलेली व्यक्ती म्हणजे रेस्टॉरंटची मालकीण डॉक्टर सोनम कापसे ! मी लगेच देवाला बोललेले शब्द परत घेतले!!.

आत मध्ये गेल्यावर सर्व मंडळी छान बसलेली दिसली. एक जाणवलं की टेबलाची उंची आमच्या व्यवसायात दिलेल्या व्याख्येपेक्षा थोडी जास्त आहे. याचं कारण बहुधा तिथल्या कर्मचाऱ्यांना पदार्थ आणून टेबलावर ठेवण्यासाठी सोयीस्कर व्हावं, हा असेल. माझ्या अनुभवाच्या या पहिल्या सत्रामध्ये मी संपूर्णपणे प्रभावित झालो होतो. नंतर थोड्यावेळाने विविध पदार्थ आणायला सुरुवात झाली. त्यातील फक्त सँडविच मला ओळखता आले. आमच्या प्लेटमध्ये उपमा सदृश्य पदार्थ होता परंतु तो आपल्या नेहमीच्या पदार्थापासून बनवलेला नव्हता, तळलेला वडा होता परंतु तो आपल्या सर्वसाधारण आकलनाच्या पलीकडचा होता. शिवाय एक गोड पदार्थही होता. तसा दिसणारा पदार्थ आम्ही सगळ्यांनीच खाल्लेला असेल, परंतु हा पदार्थ मात्र अतिशय वेगळ्या वस्तू पासून बनवलेला होता. आम्ही सर्वजण किंचित चकित आणि जास्त अचंबित होत पदार्थ खात होतो. सर्व पदार्थ लाजवाब होते. प्रत्येक पदार्थ सही होता म्हणजे एकदम सिग्नेचर आयटम !!

नंतर थोड्यावेळाने डॉक्टर सोनम कापसे यांनी सगळ्या रेस्टॉरंट ची संकल्पना सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की सध्या तरी हे रेस्टॉरंट ब्रेकफास्ट साठी नाही परंतु अकरा ते रात्री बारा पर्यंत ते उघडं असतं आणि येथे सर्वसाधारण रेस्टॉरंट सारखंच व्हेज नॉनव्हेज असे पदार्थ मिळतात. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे बार देखील आहे. आमच्या मनात विचार आला की अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांकडून बार सारखी व्यवस्था कशी काय सांभाळली जाते.
तेव्हा त्यांनी आम्हाला अजून एक धक्का दिला. त्या म्हणाल्या आमच्याकडे समाजाने नाकारलेल्या वंचित वर्गातील स्त्री पुरुष, ही व्यवस्था बघतात ! यामध्ये एलजीबीटीक्यू आणि दहा वर्ष जेलची शिक्षा भोगलेले असे देखील काही कर्मचारी म्हणून आहेत. क्षणाक्षणाला डॉक्टर कापसे यांच्या बद्दल अभिमान वाटत होता आणि त्याचबरोबर त्यांच्या धैर्याचे कौतुकही करत होतो.आपण डॉक्टर सोनम कापसे यांच्या अफाट कार्याचा आपल्या रोटरीतर्फे एक ट्रॉफी देऊन यथोचित सन्मान केला . नंतर त्यांनी सांगितलं की अजून त्यांच्याकडे ब्रेकफास्ट ची सोय सुरू झालेली नाही परंतु तुमच्या क्लब साठी ही विशेष व्यवस्था केली आहे, शिवाय काल रात्री बारापर्यंत रेस्टॉरंट उघडे असल्यामुळे त्यांचा नियमित कर्मचारी वर्ग सकाळी उपस्थित नव्हता. तरीदेखील काही कर्मचारी मुद्दाम एवढ्या सकाळी आमच्यासाठी आले होते. त्यांच्याशी आमची ओळख करून दिली. त्यांना बरंच काही येतं आणि कळतं हे देखील कळलं!

आपल्या क्लबच्या प्रथेप्रमाणे आपले अध्यक्ष डॉक्टर स्मिता जोग यांनी त्या कर्मचाऱ्यांचा, एक छोटीशी भेट देऊन, गौरव केला. शिवाय वाढदिवसाच्या निमित्ताने केक पण आणले होते त्याच्यामुळे देखील कार्यक्रमातील गोडवा वाढला. आपल्या अध्यक्ष स्मिताताई यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे संपूर्ण बिल भरले त्यामुळे गोडवा दुप्पट झाला!
स्मिता ताई यांच्याकडून काही शिकावे असेही काही, वाढदिवस झालेल्या, सभासदांनी बोलून दाखवले ! सरतेशेवटी ऍन मोहिनी दामले यांनी आभार प्रदर्शन केले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. आजचा अनुभव हा अतिशय वेगळा होता आणि प्रत्येकाने या ठिकाणी जाऊन तो घेऊन एका उत्तम उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी आग्रहाने म्हणेन.

उदय चिपलकट्टी

11th March, 2024

Sangharsh Yogini

On 11th March our chief guest was Ms Surekha Mane . She was introduced by PP Shrikant Bhave.
She has completed her MSc in genetics from Pune University. But then selected totally different field as career. Right from childhood she was staying in Bopodi in lower middle class society and observed the problems faced by the women. Therefore she decided to work for them. She decided to make women financially independent. For that she made a strong team to work with. They formed about 2000 Bachat gats and made about 50000 ladies financially independent with their small businesses.
Cosmos bank supported them by giving loans. With the help of their small savings she claims that she has contributed to India’s GDP.
For her great efforts she was given “Shangharsh Yogini ” award. Apart from that she has trained Adiwasi women who got jobs in small factories. She is relentlessly working for last 22 years. Her friends and colleagues were present for the felicitation. All rotations were impressed by her work and appreciated the program. Vote of thanks was given by Dr. Deepa Sathe.

Ann Shobhana Date

17th March, 2024

Club Day

सालाबाद प्रमाणे, यावर्षी १७ मार्चला, पीवायसी येथे आपला क्लब डे अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न झाला.

नेहमीप्रमाणेच दंगामस्ती, धमाल आणि याच्या जोडीला काही निवडक, वेगवेगळ्या रागांवर आधारित गाणी, नवरसपूर्ण , लोकगीत, नृत्य, व्होयोलिन आणि कविता असा सर्वसमावेशक कार्यक्रम, आपल्याच सगळ्या, उत्साही सभासदांनी अतिशय छान पद्धतीने सादर केला. ह्या कार्यक्रमाला सिंथेसायझर व rhythm machine ची मस्त साथ लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात *रामवंदना* या नृत्याने झाली व शेवट *जयोस्तुते* ह्या वीर सावरकरांनी लिहिलेल्या समूह गीताने झाला. संपूर्ण कार्यक्रमाला, उत्स्फूर्त दाद आपल्या मेम्बर्सनी दिली.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाने अतिशय छान पद्धतीने केले.

यानंतर आपल्या रितीनुसार केक कटिंग झालं आणि त्यानंतर सगळ्या मंडळींनी फेलोशिप व सुरेख जेवणाचा आस्वाद घेतला. क्लबच्या वाढदिवसानिमित्त, आवर्जून जास्तीत जास्त सभासद आल्यामुळे खूप धमाल करता आली.

अलका अभ्यंकर

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016