Skip to main content

8th October, 2023

Activities in Modern College

Rtn. Alka Kamble

 Mr. Vishnu Bheda from Bheda Associates and University Rotary Club Rotarian taken an Oath / Promise to secure Pune City and its glory from Rotaractors, Modern College, Shivajinagr, Pune  PP Sharad Dole organised this programme for students on 8th October 2023 in the College Conference Hall. Coordinator Rotaract Club Prof. Ashok Kamble and Dr. Santosh Gopale were present for the programme. Total 80 students were present.

October, 2023

आपटे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

ॲन सरिता भावे

आपटे  मूकबधिर  विद्यालयातील   विद्यार्थ्यांना शेाभिवंत  मे़णबत्या  तयार  करण्याचे  प्रशिक्षण  देणारा  वर्ग आपल्या   क्लब तर्फे   विद्यालयात  आयोजित   करण्यात  आला  होता.  श्रीमती अमृता  केळकर यांनी  विद्यार्थ्यांना  मेणबत्त्या  कशा  करायच्या  ते प्रात्यक्षिकासह  शिकवले. विविध  फुलांच्या  आकारासह  विविध  प्रकारच्या  रंगीबेरंगी  आणि  पांढऱ्या   मेणबत्या  त्यांनी  यावेळी करून  दाखवल्या. तसेच  या  विविध  प्रकारच्या  मेणबत्त्या   करण्यासाठी  लागणारे  साचे  त्यांनी  यावेळी  शाळेला   भेट  दिले.  प्रात्यक्षिकांच्या   या  कार्यक्रमात  त्यांना  श्रीमती शांताबाई   जाधव  यांनी  सहाय्य  केले  . आजच्या  वर्गात  ४०  हून  अधिक  विद्यार्थी  विद्यार्थिनींनी    भाग   घेतला,  तसेच  अश्विनी  जोशी , स्वाती  खरात,  महेंद्र  आर्विकर  हे  शिक्षकही  सहभागी  झाले  होते. या   प्रशिक्षणाचा  उपयोग  करून  विद्यार्थी  या  महिन्यात  मेणबत्त्या  तयार  करतील  आणि  दिवाळी  साठी  त्यांची   शाळेतर्फे  विक्री  करण्यात  येईल, असे  श्रीमती  जोशी  यांनी  यावेळी  स्पष्ट  केले. या   कार्यक्रमात  क्लब तर्फे  अंजली  रावेतकर, निरूपमा  गोखले , सरिता  भावे  उपस्थित  होत्या.

अंजली गाडगीळ आणि Anns Commitee

 ३१ ऑक्टोबर रोजी महात्मा सोसायटीत आपटे मूक बधीर शाळेतील मुलांचा दिवाळी स्टॉल 4 ते 7 या वेळात लावला होता. यासाठी प्रेसिडेंट dr.स्मिता जोग ह्यांनी पुढाकार घेतला होता.

 २६  ऑक्टोबर रोजी मीनाच्या पुढाकाराने आपटे मूक बधिर शाळेचा दिवाळी स्टॉल पॅलेडियम मधे ४ ते ७  ह्या वेळात लावला होता. अंजली गाडगीळ, अंजली रावेतकर, सरिता भावे, मीना इनामदार उपस्थित होत्या. मीनाने मुलांना refreshment म्हणून वडा पाव, चहा दिला. मुलांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री चांगली झाली.

३१ ऑक्टोबरला प्रेसिडेंट डॉ. स्मिता जोग ह्यांच्या पुढाकाराने आपटे मूक बधिर शाळेतील मुलांनी बनवलेल्या वस्तू वेगवेगळ्या कॅण्डल्स, पणत्या दिवे, आकाश कंदील, उटणे table mats अश्या अनेक वस्तूंचा स्टॉल महात्मा सोसायटी मधे ४ ते ७ ह्या वेळात लावला होता. त्याला भर भरून प्रतिसाद मिळाला. सरिताभावे, डॉ. स्मिता जोग, त्यांच्या भगिनी आणि अंजली गाडगीळ उपस्थित होत्या. मुलांना स्मिताताई नी गुलाबजाम आणि सामोसा असे स्नॅक्स दिले. आतापर्यंत मृणाल नेर्लेकरच्या पुढाकाराने, संकुल, च्या पुढाकाराने पॅलेडियम, प्रेसिडेंट डॉ. स्मिता जोग ह्यांच्या पुढाकाराने 2 वेळा महात्मा सोसायटी असे स्टॉल्स वेळोवेळी लावले. ऊत्तम प्रतिसाद होता.  25000 रुपयांची विक्री झाली. मुलांची दिवाळी आनंदात पार पडली. सर्व आयोजकांचे खूप आभार. मुलांच्या चेहऱ्यावर ख़ुशी त्यांच्या मुळे आली.

9th November, 2023

सार्थक सेवा संघ

अंजली गाडगीळ आणि Anns committee

दर महिन्याप्रमाणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही त्या त्या महिन्याचे धान्य सार्थक मध्ये पोचते झाले.
९ नोव्हेंबर सार्थक मधे जाऊन आपण जमवलेल्या साड्या, सलवार कमीज, कटपिसेस   देऊन आलो. सर्वांनी दिलेल्या साड्या खूप छान होत्या. अनिल कुडिया म्हणाले दुकानातून आणलेल्या वाटत आहेत. मुली खूप सुंदर, नवीननवीन फॅशन चे कपडे शिवतात. फोटोत त्यांनी शिवलेल्या कपड्यांचे नमुने आहेत. मैत्रिणींनो माझ्या आव्हानाला दिलेल्या प्रतिसादा बद्दल आभार. मुलींना खूप उपयोगी पडतील साड्या.

ॲन निरुपमा गोखले

वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. आपण सार्थक सेवा संघात दिवाळी साजरी करून आपल्या दिवाळीची सुरुवात केली. 92 मुलामुलींना नवीन कपडे आणि दिवाळीचा सर्व फराळ दिला. या प्रोजेक्ट ची आर्थिक  बाजू कविका , निखिल ( कल्पना विकास काकडे ची मुलगी जावई ) दिपश्री आणि चांदुकाका, हेमाताई यांनी उचलली. क्लब च्या मित्रमैत्रिणीनी उपस्थित राहून , गप्पा मारून मुलांच्या आनंदात भर टाकली.  अगदी छोट्या मुलांना माधुरीने छोटे टूथब्रश दिले

सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार. प्रेसिडन्ट स्मिता ताईंनी गुलाबजाम आणून फराळाची गोडी आणखी वाढवली तसेच आप्पांनी मुलांना फटाके आणायला पैसे देऊन आनंदात भर पाडली. अलकाने दिवाळीच्या दिवसांचे महत्त्व सांगितले आणि रोहिणीने स्वरचित कविता म्हणली. नंतर प्राजक्तालयाला भेट देउन तेथील मुलींनी शिवलेले सुंदर कपडे पाहून खूप समाधान वाटले

26th November, 2023

Vocational visit to Yavasura

Rtn. Sachin Joglekar

Under vocational service avenue, we visited Yavasura,  brewery run by Mr. Amey and Mr. Parth Mehendale on Sunday, 26th Nov. Amey ,who is a mechanical engineer explained  the procedure of  making the  beer. He also told us about  various types of beer. It was interesting to know that alcohol free beer also exists. Parth took a tour around the manufacturing section and showed the machinery used. He said cleanliness and aseptic precautions are essential to make a good quality beer. This was followed by interactive session where in our members asked many questions. Over all it was an interesting activity.
22 Rotarians/Anns joined for the visit. President Smitatai proposed vote of thanks. Special thanks to PP Anil Damale for helping in organising this visit.

November, 2023

सायकल भरारी

प्रेसिडेंट. डॉ. स्मिता जोग

सायकल भरारी हा प्रोजेक्ट नंदगाव येथे पार पडला. रो. नितीनने ह्या ऍक्टिव्हिटी चे अतिशय पद्धतशीरपणे नियोजन केले. डायरेक्टर ऋजूताने  व्यवस्थित फॉलोअप  करून वेळच्यावेळी प्रोजेक्ट कार्यान्वित केला. श्रीयुत परांजपे व रोटेरियन सचिनने या प्रोजेक्टसाठी फंडिंग तर केलेच पण त्याचबरोबर कुटुंबीया समवेत आवर्जून उपस्थित राहिले. खास नमूद करण्याची गोष्ट म्हणजे रोटेरियन सचिन यांच्या मातोश्री श्रीमती वंदनाताई जोगळेकर या सुद्धा उपस्थित होत्या. श्री परांजपे ,रोटेरियन सचिन, रोटेरियन  श्रीकांत दाते आणि रोटेरियन मानस वाघ यांचे मनापासून आभार. डॉक्टर राव ,डॉक्टर शोभाताई व शरद डोळेही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

26th November, 2023

Celebration of Nov Birthdays & Anniversaries

Rtn Manoj Phulambrikar

The November Birthday and Anniversary Group, along with some spouses and President Smitatai, met at Hotel Atithi on (Sun, 26 Nov). The attendees included Madhuri, Ranjana and Anil, Manjiri and Dilip, and Manoj and Vasundhara.
Some of our friends like Shobha and Dr. Rao, CD and Seema, Achyut, Shekhar, Alka and Ashok had also joined for lunch. This made the celebration fun. President Smitatai had got an amazing carrot cake which everyone enjoyed. Sachin had finalised the venue and Madhuri had taken extra efforts to ensure we all had a good time.
Earlier, in the morning, the Nov B’day and Anniversary Group had joined our fellow club members for visiting Yavasura Craft Brewery.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016