Skip to main content
Rotary Designated Month

Rotary Designated Month – September

By September 4, 2022September 5th, 2022No Comments

भारताने स्वातंत्र्योत्तर  काळातील ७५ वर्षात अनेक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. उदाहरणार्थ १९५१ मध्ये भारताचे साक्षरता प्रमाण शेकडा १८.३ हे होते. पण २०१७-१८ च्या सर्वेक्षणानुसार तो आकडा तब्बल  शेकडा ७७. ७  एवढा वाढला आहे.  ही कामगिरी अत्यंत स्तुत्य आहे.  पण अजूनही अनेक शहरी आणि ग्रामीण भागामध्ये साक्षरतेचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे . अनेक ठिकाणी शिक्षणासाठी पायाभूत सुविधाही नाहीत . सप्टेंबर महिना हा रोटरी इंटरनॅशनल ने “लिटरसी  मंथ ” म्हणून नियुक्त केला आहे. संपूर्ण   जगभरात आणि त्या अनुषंगाने भारतात , रोटरी  या महिन्यात प्रामुख्याने प्रौढ शिक्षणशिक्षण क्षेत्रातील  सुविधा  आणि त्याच्याशी संलग्न अशी प्रोजेक्ट्स करावीत असे सांगते. 

पुढील लेखातून आपल्या डिस्ट्रिक्ट ३१३१  च्या डिरेक्टर -लिटरसी   रो.  ममता कोल्हटकर यांचे त्याविषयीचे विचार पाहुयात …  

पी पी शिरीष क्षीरसागर

लिटरसी महिना

 रो. प्रा ममता कोल्हटकर, डायरेक्टर, लिटरसी रोटरी वर्ष 22-23

सप्टेंबर महिना हा आपल्या रोटरीचा लिटरसी महिना आहे.5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे आणि 8 सप्टेंबर हा वर्ल्ड लिटरसी डे आहे पण माझ्यामते प्रत्येकच महिना आणि प्रत्येकच दिवस लिटरसी डे असावा कारण आजही शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रत्येक दिवस लिटरसी दिवस समजून काम करायला पाहिजे.

रोटरी इंडिया लिटरसी मिशनने सगळ्या रोटरी डिस्ट्रिक्ट्स ना ” TEACH ” हा प्रोग्राम राबवायला सांगितला आहे.

T – म्हणजे Teachers Training

E – म्हणजे E Learning

A – म्हणजे Adult Literacy

C – म्हणजे Child Development

H – म्हणजे Happy School

तर असे हे TEACH नाव अतिशय समर्पक आहे.

वरील प्रत्येक विभागात आपल्याला काम करायचे आहे.

Teachers Training कशासाठी ? आज आपण बघतोय की  शिक्षणविषयक, बालमानसशास्त्र विषयक नवीन संशोधनं सतत होत आहेत. हे नवीन ज्ञान, अध्यापनाच्या नवीन पद्धती शिक्षकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.शिक्षक प्रशिक्षण घेऊन आपण हे करू शकतो. विविध तज्ज्ञ संस्थांच्या आणि अनेक तज्ज्ञ व्यक्तीच्या याद्या व संपर्क क्रमांक आपल्या कडे आहेत.क्लब ने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे.

E Learning कशासाठी – अध्यापनात तंत्रज्ञानाचा उपयोग आता आवश्यक झाला आहे. केवळ शब्दाने एखादी गोष्ट समजावून सांगण्यापेक्षा ती दृश्यमान झाली तर मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजते. उदाहरणार्थ दिवस रात्र कसे होतात सूर्य-चंद्र ग्रहण का होत असतात…हे शब्दाने समजावून सांगण्यापेक्षा जर पडद्यावर ते प्रत्यक्ष होताना दिसले तर मुलांना किती मजा वाटेल! असेच शिकण्यासाठी E learning चा उपयोग होतो. संगणक, टॅब हे तर आज अत्यंत अनिवार्य झाले आहे. ग्लोबल ग्रांट, CSR फंड याद्वारे आपण शाळांना या वस्तू अवश्य द्याव्यात. लक्ष्मी रोड क्लब ला E learning संच देण्यासाठी ग्लोबल ग्रांट मिळाली आहे. केवळ 18000 रुपयात 60000/- रु चा संच आपल्याला मिळू शकतो.

E Learning मधे आपण NCERT चे गणित व विज्ञान विषयांचे 8 वी ते 10 वी चे शैक्षणिक व्हिडीओ आपल्या ग्रामीण भागातील मराठी मुलासाठी मराठीत भाषणतरित केले आहे.लवकरच त्याचे उदघाट्न होऊन ते यू ट्यूब वर व इतर अनेक चॅनेल्स वर दिसणार आहेत.

Adult Literacy – काही अपरिहार्य कारणामुळे लहानपणी शिक्षण घेऊ न शकलेल्या प्रौधांना शिक्षण देऊन आपण त्यांच्या लाजिरवाण्या, दीन आयुष्याला एकप्रकारची ऊर्जा प्रदान करू शकतो. प्रौढ शिक्षणावर आपण विशेष भर देणार आहोत कारण IPRIP शेखर मेहता आणि आदरणीय पंतप्रधान मोदी यांची भेट झाली आणि मोदींनी रोटरी कडून प्रौढ शिक्षणासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच प्रौढ शिक्षणासाठी आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठासोबत करार केलेला आहे. उन्नत भारत या केंद्र शासनाच्या प्रौढ शिक्षण योजनेत या विद्यापीठातील अनेक महाविद्यालये  सहभागी आहे. या योजनेनुसार प्रत्येक महाविद्यालयाला पाच गावे दिली आहेत. त्या गावांमध्ये NSS चे विद्यार्थी प्रौध शिक्षणात मदत करतील. यात आपली भूमिका अशी असणार आहे की प्रत्येक क्लब ने कमीतकमी एक गाव घेऊन तेथे काम करणाऱ्या NSS च्या विद्यार्थांला सोबत घेऊन तेथील अंगणवाडी सेविकेला योग्य ते आर्थिक सहाय्य ( एका प्रौढाला शिक्षित करण्याचे कमीतकमी 100रु ) देऊन प्रौढाना शिक्षित करण्याचे काम तिला द्यायचे. तिच्या कामाचे परीक्षण करण्याची जबाबदारी NSS च्या विद्यार्थ्याला द्यायची. त्याला गावात जाण्या- येण्याचा खर्च म्हणून दर आठवड्याला 100/- रु द्यायचे. चार महिन्यात प्रौढ शिक्षित होऊ शकतो त्यानंतर त्याची परीक्षा घेऊन प्रौढाला व विदयार्थ्याला विद्यापीठ व रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र द्यायचे.आपणाकडे प्रौढ शिक्षणासाठीचे व्हिडीओ पण आहेत. व्हाट्सअप वर ते पाहून किंवा सेविकेने त्यांना ते दाखवून प्रौढ शिकू शकतात तसेच RILM ने प्रसारित केलेल्या शैक्षणिक साहित्याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे आहे त्याच्या प्रिंट काढून त्याचा वापर प्रौधांना शिकविण्यासाठी होतो. प्रौढ शिक्षण प्रोजेक्ट चा आणखी एक पर्याय म्हणजे क्लब स्वतः एखाद्या गावात किंवा वस्तीत स्वयंसेवकाच्या मदतीने, त्याला योग्य तो आर्थिक मोबदला देऊन प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करू करणे आणि तिसरा मार्ग असा की interact क्लब च्या विदयार्थ्यांना शिका आणि कामवा या तत्वावर हे काम करायला आपण देऊ शकतो.

रो. प्रा ममता कोल्हटकर

Child Development – यामध्ये खूप काही करण्यासारखे आहे. सम्पूर्ण शिक्षण व्यवस्था हीच मुळी विद्यार्थी केंद्रित आहे अशावेळी मुलांचा सम्पूर्ण शारीरिक, मानसिक, भावानिक विकास करणे आवश्यक आहे. बालके ही कच्या मातीच्या घड्याप्रमाणे असतात.कुंभार ज्या प्रमाणे मडके घडवताना मुलांना बाहेरून योग्य आकार देत असतानाच आतून प्रेमळ आधार देतो याच पद्धतीने आपणास विदयार्थ्यांना घडवायचे आहे. हे वय संवेदनशील असते तसेच जे शिकविले ते ग्रहण करण्याची बालकात प्रचंड क्षमता असते त्यामुळे अनेक विषय आपण त्यांना शिकऊ शकतो.(विविध विषयाच्या व तज्ज्ञ व्यक्तीच्या याद्या सर्व अध्यक्षाना पाठवल्या आहेत)

Happy school – या नावातच त्याचा अर्थ प्रतित होतो. शाळा जर मोडक्या, रंग उडालेल्या, टॉयलेट, पाणी नसलेल्या,उदासवाण्या असतील तर त्यात शिकायला मुलांना आनंद वाटणार आहे का? म्हणूनच शाळा सुंदर देखण्या करून आनंदी करायच्या आहेत.यासाठीसुद्धा ग्लोबल ग्रांट, CSR किंवा 4-5 क्लब मिळून सिनर्जी प्रोजेक्ट करू शकतो.

अशाप्रकारे विविध लिटरसी प्रोजेक्ट्स आपणास राबवायचे आहेत.

रोटरीचे जे Thrust area आहेत त्यात शिक्षण सगळ्यात महत्वाचे आहे असं मला वाटतं कारण समाजाला योग्य शिक्षण मिळालं तर इतर समस्या आपोआप दूर होतील.

हेच दर्शवणारी एक कविता मी केली आहे. ती खाली देत आहे.

गाथा शिक्षणाची

काय सांगू आता शिक्षणाची गाथा
त्यानेच होतात दूर साऱ्या व्यथा

वसुधैव कुटुंबकम शिक्षणच सांगते
संघर्ष संपून शांती प्रस्थापित होते

आरोग्याची काळजी घेणे शिक्षणच शिकविते
बाळाच्या आरोग्याचे तंत्र मंत्र शिक्षित मातेलाच समजते

अज्ञानानेच पाण्याची अवहेलना होते
पाण्यासम आयुष्य व्यर्थ जाते

शिक्षणामुळेच होते समाजाची उन्नती
सरस्वती सवे लक्ष्मी धरोनी हात हाती

म्हणूनच करावे समाजाला शिक्षित
रोटरीच्या यशाचे हेच खरे इप्सीत

शिक्षक प्रशिक्षण करून करा त्यांना तज्ज्ञ
मुलांना तंत्र शिक्षण देऊन दूर करा त्यांचे अज्ञ

प्रौढानां शिक्षित करून द्या सन्मानाचे आयुष्य
मुलांना विविध विषय शिकवून घडवा त्यांचे भविष्य

शाळा करा आधुनिक देखण्या
आनंद वाटेल मग तेथे बालकांना शिकण्या

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016