Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin 10th February 2023

Upcoming Programs

फेब्रुवारी महिन्याचे कार्यक्रम:
 • फेब्रुवारी – श्री. विजय श्रोत्री ‘ पिझ्झा ते पायथागोरस’
 • १४ फेब्रुवारी – Paraplegic Army men ‘mouth paitings exhibition’ at Nehru center Mumbai.
 • १८ फेब्रुवारी  – Visit to PHC at Male with our Global grant German partners to witness baby warmer bags at 9. 30 am ( it should be Visit )
 • २० फेब्रुवारी – AG visit
 • २८ फेब्रुवारी – श्रीपाद रेडिओ: ‘रेडिओ संचालनातील अनुभव’

Rotary Designated Month

February is Peacebuilding and Conflict Prevention Month

Programs done in Previous Month

1. Prof. D.B. Deodhar Award
2. District Conference
3. Bawarchi Night

Projects done in Previous Month

1. Global Grant Project
2. Service project

संगीतानुभव

काही  गाणी, त्यातील शब्द, सूर किंवा लय – ह्यामुळे आपल्या मनाचा ठाव घेतात . एक वेगळीच अनुभूती देतात .  पाहू या … ह्या सदरातून …

Our Participation In District

President Dr Mrinal Nerlekar being felicitated for participation of our club in district synergy global grant project of supply of baby warmers to government hospitals

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

भाषा भगिनी

ज्या भाषेत “चायनीस” लिपी वापरली जाते, जिच्यात “अनेकवचन ” नाहीत …अश्या  अनेक आश्चर्यकारक गोषीतेने नटलेल्या  “जपानी ” भाषेची मजा घेऊया ….

होम मेकर्स आणि बरंच काही!

' गुणवंती ' वृंदा

सेवानिवृत्त व्यक्ती म्हणजे त्याच्या करिअरची समाप्ती असं सर्वसाधारण गृहीत . आजकालच्या व्ही. आर. एस. च्या जमान्यात सुद्धा या गृहितात तुरळकच फरक आढळतो . म्हणजे व्ही आर एस नंतर अनेकजण काही ना काही करत असतात, पण त्यामध्ये त्यांचं मूळ जे करिअर होतं त्याचं थोडं बहुत काम किंवा सोशल वर्क किंवा एखादी हॉबी असं त्याचं स्वरूप आढळतं. निवृत्तीनंतर मूळ करिअर पेक्षा पूर्णतः वेगळ्याच करिअरची उभारणी केलेली क्वचितच दिसते. असं वेगळ्याच करिअरमध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या ज्या तुरळक व्यक्ती आढळतात त्यात आपल्या एका मैत्रिणीचाही समावेश आहे बरं का !ती म्हणजे वृंदा…  वृंदा वाळिंबे. 

वृंदा ने व्ही आर एस घेतली ती लायब्ररीयन म्हणून. त्यानंतर ती आता पूर्ण वेळ काम करते आहे ते “कौन्सिलर” म्हणून. आजकालच्या “भयंकर” स्पर्धेच्या आणि “व्यक्तीस्वातंत्र्य” कल्पनेचा अतिरेक होण्याच्या काळात, लहानांपासून थोरापर्यंत अनेक जण भंजाळून गेलेले दिसतात. त्यांना “नॉर्मल” जीवन जगण्यासाठी खरोखरच कौन्सिलिंगची गरज असते. हेच काम आता वृंदा करत आहे.

वास्तविक वृंदाने कॉलेज जीवनात पदवी घेतली ते या कौन्सलिंगचा पाया असलेला “मानसशास्त्र” विषयातच. पण त्यावेळी पदवीनंतर पुढे काही शिक्षण, नोकरी असं न करता ती सरळ विवाहबंधनातच अडकली!

आजची वृंदा पाहता हे कसं काय घडलं किंवा त्यावेळी तिच्या काय मनात होतं ? असं विचारता वेगळंच चित्र पुढे आलं!  त्यावेळी वृंदा अबोल होती. अजिबात पुढे पुढे न करणारी ; किंबहुना मागे मागेच राहणारी आणि घरात तीन बहिणीतली थोरली होतीतेव्हा पदवी शिक्षण झाल्यावर पालकांच्या इच्छेनुसार लग्नाला तयार झाली आणि लग्नही लगेच ठरल्याने लग्न करून वृंदा पांडेची वृंदा वाळिंबे होऊन संसाराला लागली!

Click here to read more …

‘गुणवंती’ वृंदा

सेवानिवृत्त व्यक्ती म्हणजे त्याच्या करिअरची समाप्ती असं सर्वसाधारण गृहीत . आजकालच्या व्ही. आर. एस. च्या जमान्यात सुद्धा या गृहितात तुरळकच फरक आढळतो . म्हणजे व्ही आर एस नंतर अनेकजण काही ना काही करत असतात, पण त्यामध्ये त्यांचं मूळ जे करिअर होतं त्याचं थोडं बहुत काम किंवा सोशल वर्क किंवा एखादी हॉबी असं त्याचं स्वरूप आढळतं. निवृत्तीनंतर मूळ करिअर पेक्षा पूर्णतः वेगळ्याच करिअरची उभारणी केलेली क्वचितच दिसते. असं वेगळ्याच करिअरमध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या ज्या तुरळक व्यक्ती आढळतात त्यात आपल्या एका मैत्रिणीचाही समावेश आहे बरं का ! ती म्हणजे वृंदा…  वृंदा वाळिंबे. 

वृंदा ने व्ही आर एस घेतली ती लायब्ररीयन म्हणून. त्यानंतर ती आता पूर्ण वेळ काम करते आहे ते “कौन्सिलर” म्हणून. आजकालच्या “भयंकर” स्पर्धेच्या आणि “व्यक्तीस्वातंत्र्य” कल्पनेचा अतिरेक होण्याच्या काळात, लहानांपासून थोरापर्यंत अनेक जण भंजाळून गेलेले दिसतात. त्यांना “नॉर्मल” जीवन जगण्यासाठी खरोखरच कौन्सिलिंगची गरज असते. हेच काम आता वृंदा करत आहे.

Support Group

February month support group
 • PP Dr Pradeep Wagh ( Leader )
 • Ann Netra Wagh
 • Rtn Sachin Joglekar
 • Rtn. Pradeep Durugkar
 • Ann Pratima Durugkar
 • PP Gurunath Palekar
 • Ann Rohini Palekar
 • PP Nitin Abhyankar
 • Ann Alka Abhyankar

नवे मित्र

रो. अलका आणि अशोक कांबळे

रो. अलका आणि अशोक कांबळे हे दाम्पत्य खरे तर आपल्या क्लब मध्ये येण्यापूर्वीच आपल्या ओळखीचे झाले होते. याचे कारण मॉडेल कॉलेजमधील आपल्या रोटरॅक्ट क्लबचे उपक्रम.

अलका आणि अशोक दोघेही कोल्हापूरचे .त्यांचे बालपण आणि शिक्षण कोल्हापुरातच झाले. दोघांचेही वडील चळवळीत सक्रिय होते .अलकाचे वडील पत्रकार होते. कोल्हापुरातील विडी कामगार संघटना आणि सलाईन चा कारखाना यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. हे बंद झाल्यावर विस्थापितांना 250 घरे त्यांनी म्हाडा कडून बांधवून दिली. समाजकार्याचे बाळकडू अलकाला लहानपणीच मिळाले. अलका बी ए, एम ए (इंग्लिश  शिवाजी विद्यापीठ) झाली .तर अशोकसर एम एस सी झाले. अलकाच्या धाकट्या बहिणीचे अशोकसर मित्र .ते दोघे एकत्र नाटकात काम करत .त्यामुळे अशोकसर अलकाच्या घरी नेहमी येत असत. अलकाच्या घरातील वातावरण अतिशय मोकळे. त्यामुळे मग ते अलकाचेही आणि घरातील सर्वांचेच छान मित्र बनले.

   ग्रॅज्युएशन नंतर अलका नोकरीसाठी पुण्यात आली आणि नाना पेठेतील डॉ. आंबेडकर कॉलेजात तिने थोडे दिवस काम केले. तेथे कायमस्वरूपी नोकरीसाठी पैशाची मागणी केल्यामुळे ती नोकरी सोडून नंतर मैत्रिणीच्या नवऱ्याच्या ऑफिसात डीटीपीचे काम केले. त्यावेळी अशोकसर एम. एस. सी. करत करत KMC या कंपनीत नोकरी करत होते. ही कंपनी मोठ्या हॉस्पिटलच्या मशिनरीच्या दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असे. मेडिकल इन्स्ट्रुमेंट ची दुरुस्ती तसेच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि कलर टीव्ही ची दुरुस्ती यात अशोकसर एक्सपर्ट होते. याच काळात दोघांच्या लक्षात आले की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत. पण घरच्यांना हे माहीत नव्हते. अलका सतत आलेली स्थळे नाकारते, म्हणून अलकाच्या आईने अशोकसरांवरच  जबाबदारी टाकली कीतू पुण्याला जा आणि कसेही करून अलकाला लग्नासाठी तयार कर.आणि मग दोघांनी त्यांचा लग्नाचा विचार घरच्यांना सांगितला. दोघांच्याही घरून या इंटरकास्ट मॅरेजला सहजपणे परवानगी मिळाली. अशोकसरांचे  शिक्षण झाले की दोघांनी एकच ठिकाणी नोकरी करूअसा दोघांचा बेत होता.

पुण्यातून अलका 95 साली बारामतीला गेली. तेथील विद्या प्रतिष्ठान मध्ये तिने नोकरी केली. ती तेथील फाउंडर मेंबर होती. तिने नोकरीसाठी अशोकसरांना बारामतीला बोलावले. परंतु संस्थेच्या नियमाप्रमाणे दोघांनाही नोकरीत घेता येत नव्हते. मग दोघांनी प्रथम लग्न बंधनात अडकण्याचे ठरवले. लग्न ठरले आणि योगायोग असा कीअगदी त्याच आठवड्यात पुण्याच्या मॉडर्न कॉलेजची जाहिरात आली आणि विशेष म्हणजे त्यात इंग्लिश डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट दोन्हीसाठी त्यांना प्रोफेसर हवे होते. मग काय लग्नाच्या दिवशी एकमेकांच्या गळ्यात हार घालून दोघांनी लगेच मांडवातच फॉर्म भरला आणि नातेवाईकांकडे पुण्यात देण्यासाठी सुपूर्त केला. दोघांचेही सिलेक्शन झाले आणि दोघेही पुण्यात आले.

Click here to read more …

रो. अलका आणि अशोक कांबळे

रो. अलका आणि अशोक कांबळे हे दाम्पत्य खरे तर आपल्या क्लब मध्ये येण्यापूर्वीच आपल्या ओळखीचे झाले होते. याचे कारण मॉडेल कॉलेजमधील आपल्या रोटरॅक्ट क्लबचे उपक्रम.

अलका आणि अशोक दोघेही कोल्हापूरचे .त्यांचे बालपण आणि शिक्षण कोल्हापुरातच झाले. दोघांचेही वडील चळवळीत सक्रिय होते .अलकाचे वडील पत्रकार होते. कोल्हापुरातील विडी कामगार संघटना आणि सलाईन चा कारखाना यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. हे बंद झाल्यावर विस्थापितांना 250 घरे त्यांनी म्हाडा कडून बांधवून दिली.

समाजकार्याचे बाळकडू अलकाला लहानपणीच मिळाले. अलका बी ए, एम ए (इंग्लिश  शिवाजी विद्यापीठ) झाली .तर अशोकसर एम एस सी झाले. अलकाच्या धाकट्या बहिणीचे अशोकसर मित्र. ते दोघे एकत्र नाटकात काम करत .त्यामुळे अशोकसर अलकाच्या घरी नेहमी येत असत. अलकाच्या घरातील वातावरण अतिशय मोकळे. त्यामुळे मग ते अलकाचेही आणि घरातील सर्वांचेच छान मित्र बनले.

भावपूर्ण श्रद्धांजली

 • ऍन  मीनल वाघच्या आई – श्रीमती पद्मजा सदाशिव नरगुंड  ( वय वर्षे ८४ ) ह्यांना १७  जानेवारी रोजी देवाज्ञा झाली. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना.