नवे मित्र

अलका आणि अशोक कांबळे हे दाम्पत्य खरे तर आपल्या क्लब मध्ये येण्यापूर्वीच आपल्या ओळखीचे झाले होते. याचे कारण मॉडेल कॉलेजमधील आपल्या रोटरॅक्ट क्लबचे उपक्रम.

अलका आणि अशोक दोघेही कोल्हापूरचे .त्यांचे बालपण आणि शिक्षण कोल्हापुरातच झाले. दोघांचेही वडील चळवळीत सक्रिय होते .अलकाचे वडील पत्रकार होते. कोल्हापुरातील विडी कामगार संघटना आणि सलाईन चा कारखाना यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. हे बंद झाल्यावर विस्थापितांना 250 घरे त्यांनी म्हाडा कडून बांधवून दिली. समाजकार्याचे बाळकडू अलकाला लहानपणीच मिळाले. अलका बी ए, एम ए (इंग्लिश  शिवाजी विद्यापीठ) झाली .तर अशोकसर एम एस सी झाले. अलकाच्या धाकट्या बहिणीचे अशोकसर मित्र .ते दोघे एकत्र नाटकात काम करत .त्यामुळे अशोकसर अलकाच्या घरी नेहमी येत असत. अलकाच्या घरातील वातावरण अतिशय मोकळे. त्यामुळे मग ते अलकाचेही आणि घरातील सर्वांचेच छान मित्र बनले.

   ग्रॅज्युएशन नंतर अलका नोकरीसाठी पुण्यात आली आणि नाना पेठेतील डॉ. आंबेडकर कॉलेजात तिने थोडे दिवस काम केले. तेथे कायमस्वरूपी नोकरीसाठी पैशाची मागणी केल्यामुळे ती नोकरी सोडून नंतर मैत्रिणीच्या नवऱ्याच्या ऑफिसात डीटीपीचे काम केले. त्यावेळी अशोकसर एम. एस. सी. करत करत KMC या कंपनीत नोकरी करत होते. ही कंपनी मोठ्या हॉस्पिटलच्या मशिनरीच्या दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असे. मेडिकल इन्स्ट्रुमेंट ची दुरुस्ती तसेच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि कलर टीव्ही ची दुरुस्ती यात अशोकसर एक्सपर्ट होते. याच काळात दोघांच्या लक्षात आले की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत. पण घरच्यांना हे माहीत नव्हते. अलका सतत आलेली स्थळे नाकारते, म्हणून अलकाच्या आईने अशोकसरांवरच  जबाबदारी टाकली कीतू पुण्याला जा आणि कसेही करून अलकाला लग्नासाठी तयार कर.आणि मग दोघांनी त्यांचा लग्नाचा विचार घरच्यांना सांगितला. दोघांच्याही घरून या इंटरकास्ट मॅरेजला सहजपणे परवानगी मिळाली. अशोकसरांचे  शिक्षण झाले की दोघांनी एकच ठिकाणी नोकरी करूअसा दोघांचा बेत होता. पुण्यातून अलका 95 साली बारामतीला गेली. तेथील विद्या प्रतिष्ठान मध्ये तिने नोकरी केली. ती तेथील फाउंडर मेंबर होती. तिने नोकरीसाठी अशोकसरांना बारामतीला बोलावले. परंतु संस्थेच्या नियमाप्रमाणे दोघांनाही नोकरीत घेता येत नव्हते. मग दोघांनी प्रथम लग्न बंधनात अडकण्याचे ठरवले. लग्न ठरले आणि योगायोग असा कीअगदी त्याच आठवड्यात पुण्याच्या मॉडर्न कॉलेजची जाहिरात आली आणि विशेष म्हणजे त्यात इंग्लिश डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट दोन्हीसाठी त्यांना प्रोफेसर हवे होते. मग काय लग्नाच्या दिवशी एकमेकांच्या गळ्यात हार घालून दोघांनी लगेच मांडवातच फॉर्म भरला आणि नातेवाईकांकडे पुण्यात देण्यासाठी सुपूर्त केला. दोघांचेही सिलेक्शन झाले आणि दोघेही पुण्यात आले.

पुण्यात आल्यावर दोघांच्याही लक्षात आले की येथे आपल्याला एक्सपोजर चांगले मिळत आहे आणि आपली व्हिजन एक्सपांड होत आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये दोघेही उत्साहाने भाग घेत होते आणि मग अलका कडे NSS तर अशोकसरांकडे    NCC ची जबाबदारी आली. अलकाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन महिन्याचे ट्रेनिंग नगर कॉलेजला झाले तर अशोकसर नेव्हीच्या ट्रेनिंगसाठी तीन महिने कोचीला गेले. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अलकाने मुलांना घेऊन गावातील रस्ते ,विहिरी करून दिले आहेत. तर अशोकसर INS विक्रमादित्य,INS दीपक ,INS जलाश्व व INS सुभद्रा इत्यादी नौकांवर NCC च्या मुलांना घेऊन गेलेले आहेत. 

याच उपक्रमांमधून दोघांचा रोटरीशी संबंध आला. दोघांचाही स्वभाव सोशल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा सतत विचार दोघे करीत असतात .गौरी युथ ची डायरेक्टर असताना ती आणि अजय प्राचार्यांकडे गेले .अजयची मॉडर्नच्या प्राचार्यांशी चांगली ओळख होती. त्यांनी रोटरेक्ट बद्दल सांगितले .प्राचार्यांनी लगेच अलका आणि अशोकसर यांच्याकडे त्यांना पाठविले आणि मग त्यांनी Ryla केला. जवळजवळ सात वर्षे या कॉलेजमध्ये आपण रोटारॅक्टच्या ऍक्टिव्हिटीज केल्या .खरे तर 1978  मध्ये मॉडर्न मध्ये rotaract होता हे अशोकसरांना फाईल मधून सापडले. त्यामुळे नवीन रोटरॅक्ट स्थापन करणे सोपे गेले. नंतर करोना आला. अजय सतत दोघांना मेंबर व्हा म्हणून सांगत होता आणि मग त्या दोघांनी क्लबच्या मिटींगला येण्यास सुरूवात केली. त्यांना आपल्या क्लबच्या ऍक्टिव्हिटी आवडल्या. मॉडर्न कॉलेजला सामान्य घरातील आणि ग्रामीण भागातून मुले येतात .त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्व करणे हे ध्येय ठेवून त्यासाठी रोटरीचा प्लॅटफॉर्म त्यांना योग्य व महत्त्वाचा वाटला.

बी ए ,एम ए झाल्यावर मुले सरधोपटपणे साहित्याच्या क्षेत्रातच करिअर करतात. पण अलकाने त्यांना ट्रान्सलेशन मधील जॉब साठी उद्युक्त केले. ICSSR (indian council for social services research) चे 3 लाखाचे funding मिळवून अलकाने इंटरनॅशनल सेमिनार घेतला. लिया गोरायन (इस्रायल)यांना बोलाविले. त्या पहिल्या टेक्निकल रायटर आहेत. खरे तर त्यांनीच ही इंडस्ट्री सुरू केली. अलका ने मुलांना इंडस्ट्रीत जाऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अलका  2013 पासून हे काम करते. ‘Opportunities in language industries हा workshop’ तिने म. टा .बरोबर केला. त्याला साडेतीनशे ते चारशे मुले आली होती. 

रोटरी मध्ये अलका रोटेरियन म्हणून 20 21-2 2ला जॉईन झाली.त्यानंतर अलकाने युथ अवेन्यू मध्ये मेंबर म्हणून काम केले आता पुढच्या वर्षी युथची ती डायरेक्टर आहे आणि 25 -26 झाली ती प्रेसिडेंट आहे.

त्यांच्या विद्यार्थ्यांना फी, रिसोर्सेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासाठी मदत करून त्यांना योग्य एक्सपोजर देणे हे दोघांचे ध्येय आहे.

मुलगा अर्णव हा सध्या कॅनडामध्ये law चे शिक्षण घेत आहे.

अलका व अशोक युथ नवीन उंचीवर नेऊन ठेवतील यात शंकाच नाही.त्यांना रोटरी मधील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

ऍन प्रतिमा दुरुगकर