Skip to main content
Program Reports

Programs done in January 2023

By February 7, 2023February 10th, 2023No Comments

13th January, 2023

Prof. D.B. Deodhar Award

Rtn Sandeep Tapaswi

This year RCPS conducted the award  at Sportive academy,  Aundh. This year Master Sahil Parakh vice captain Maharashtra under 16 group cricketer was felicitated and Prof. D.B. Deodhar award trophy was given to him. The chief guest for the function was former Maharashtra Ranji Captain Shanthanu Sugwekar.

Vocational Director Rtn.  Sandeep Tapaswi , rtn. Pradeep Godbole with the help of January support group organized this event very well. PP Vrinda introduced both the awardee and Chief Guest. 

President Dr  Mrinal, Secretary Pramod Pathak, PP  Vrunda and many Rotarians were present  for this wonderful D B  Deodhar award function 

The audience were treated to some nice nostalgic snippets about Prof. Deodhar by our member Pradeep. With over 6500 First class runs chief guest Shantanu told the budding cricketers the need to focus on your strengths. He told everybody cannot be an all-rounder.

21st & 22nd January, 2023

District Conference

PP Vrinda Walimbe

जसे वारकरी बंधू नेमाने न चुकता वारीला जातात किंवा कंपनी अधिकारी त्यांच्या Annual Conferences ना जातात तसेच रोटेरिअन त्यांच्या District Conference ला जात असतात. ह्या वर्षीची District Conference,  Aamby Valley येथे २१ व २२ जानेवारीला  पार पडली. रोटरीच्या सात फोकस एरिया मध्ये केले जाणारे विविध प्रकल्प ह्या दोन दिवसांत मांडले गेले.

 

भारतीय सेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे ह्यांनी त्यांच्या मुलाखतीत भारतीय सेना करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिलीच पण त्यांचा एक संदेश खूप महत्वपूर्ण होता तो म्हणजे “हिंसा / युद्ध हे कधीच उत्तर नसते पण जर आपल्यावर युद्ध लादले गेले तर आपण सक्षमतेने त्याचा सामना करण्यास नेहमीच सज्ज असणे अतिशय गरजेचे असते”. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला    तो म्हणजे आता गेल्या दशकात आपण संरक्षण सामग्री तयार करण्यात आत्मनिर्भर झालो आहोत. त्यामुळे आता सेनेवर खर्च होणारा पैसा, हा भारतातच फिरत आहे जे महत्वाचे आहे.

 

पुणे-मुबंई-पुणे मधील गुणी कलाकार जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या बरोबर  गप्पाटप्पा, आपल्या सर्वांचा  आवडता क्रिकेटर दिलीप वेंगसरकर ह्याची मराठीतून पीडीजी शैलेश पालेकर ह्यांनी घेतलेली  मुलाखत, पहिल्या दिवशीचा टोन सेट करून गेली.

 

तृतीयपंथी गौरी सावंतने 40 मिनिटांच्या भाषणात सर्वानाच अंतर्मुख केले. तृतीयपंथी लोकांना आईवडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी व समाज ह्यांच्या कडून मिळणाऱ्या वागणुकीला आणि परिस्थितीला आपण समाजच जबाबदार आहे असे जेव्हा  ती सांगत होती तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध होत होते.

 

Amazing AutoAnna हा चेन्नईती रिक्षावाला तर खरेच मॅनेजमेंट गुरू निघाला. हायस्कुल ड्रॉप आउट असलेला हा रिक्षावाला Customer Satisfaction म्हणजे काय हे भल्याभल्यांना शिकवू शकेल. त्याचे Ted Talks वरील व्हिडिओ जरूर बघा. 

250 कोटी turnover असणाऱ्या आणि अनेक गरीब गरजू महिलांना रोजगार पुरवणाऱ्या अन्नपूर्णा संस्थेच्या संस्थापक मेधा पूरव सामंत ह्यांचे भाषण आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या आणि नंतर मार्केटिंग मधील उच्च शिक्षण घेतलेल्या सारिका कुलकर्णी  ह्यांच्या राम फौंडेशनचे कार्य देखील उद्बोधक होते. Water Scarcity ह्या प्रॉब्लेम वर काम करून आणि तो प्रश्न सोडवण्याचे मॉडेल करून, सारिका ताईनी अनेक महिलांचे वाया जाणारे श्रम वाचवले आहेत आणि महाराष्ट्रातील ह्या अनेक ग्रामीण महिला सक्षम होत सामाजिक कामे आणि व्यवसाय जोमाने करत आहेत ह्याची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.

 

Dare to Dream हे अंध दिव्यांशु गणात्रा ह्याचे मनोगत अनेकांचे डोळे उघडून गेले तर तारक मेहता फेम शैलेश लोढा ह्याने अतिशय प्रभावी संवाद साधला.

२१ च्या संध्याकाळी Incredible India Theme होती आणि बरेच रोटेरिअन विविध प्रांतांच्या वेषभूषा करून आले होते. पीपी वृंदा पण बंगाली वेषभुषेत होती व ह्या स्पर्धेची जज पण होती. ह्या काॅन्फरन्स मधे आपल्या क्लबमधून ११ जणांची उपस्थिती होती. पीपी शोभा व पीपी गौरीने डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नात्याने आपापल्या विभागाचे काम सादर केले.

28th January, 2023

Bawarchi Night

PE Dr Smita Jog

दरवर्षी ज्याची सगळे मेंबर्स उत्साहाने वाट बघतात ती बावरची नाईट 28 जानेवारीला रोटेरियन आनंद नवाथे आणि  ann जयश्री नावाचे यांच्या बंगल्याच्या लान मध्ये संपन्न झाली. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच सगळे बावरची  venue वर जमा झाले .

गळ्यात अडकवलेला एप्रन आणि डोक्यावर शेफची टोपी ,बरोबर आपल्याला लागणारी आयुध आणि कच्चा माल अशा जय्यत तयारीत ते आले होते. आनंद आणि जयश्री नी venue वर चोख  व्यवस्था ठेवलेली होती .

झालर लावलेले कव्हर्स घालून टेबल्स, माफक दिव्यांची रोषणाई यांनी  venue  सजला होता .आणि अर्थातच रंगीबेरंगी कपडे घालून आलेले रोटेरियन्स आणि  anns यांनी सगळी संध्याकाळ रंगीन करून टाकली होती. इव्हेंट इन्चार्ज अजय गोडबोले आणि त्यांची टीम व जानेवारीचा सपोर्ट ग्रुप ही जातीने सगळीकडे लक्ष ठेवून होते. आता बघूया काय काय मेनू होता ते. अजयने खास चिपळूण वरून सुरमई आणली होती .बारीक रव्यात घोळलेली खरपूस भाजलेली गरम गरम चविष्ट सुरमई वाईन बरोबर खाताना मस्त मजा आली .

क्लब मध्ये नवीनच असलेले पण उत्तमरीत्या  assimilate  झालेल्या अशोक कांबळे यांनी कोल्हापुरी मिसळ खिलवली .

प्रदीप दुरुगकर ने काबुली  चना  चाट तयार केला होता. छोट्या छोट्या कप्स मध्ये लेअर्स घालून त्यानी  तो पेश केला.  खूपच चविष्ट होता.

सी. डी. महाजन नी खुसखुशीत कांदा भजी बनवली.

डा.दिलीप धामणकर यांनी बनवले आरोग्यदायी सलाड तर शेखर यार्दी नी delicious chicken lolly pop.

 विजय गोखले यांनी रोटेरियन माधुरी गोखलेच्या डायरेक्शन खाली खास दोडका सूप बनवले होते. दोडक्यापासून इतकी छान रेसिपी बनते हे बघून आश्चर्य वाटले.

 पीपी शरदजी डोळे हे इतर कामात गुंतल्यामुळे स्वतः येऊ शकले नाही पण भारतीबरोबर त्यांनी मसाला पीनट्स पाठवले होते. हे चटकदार शेंगदाणे खाताना 

दिल मांगे मोर 

असच म्हणावसं वाटत होतं.

 चंदूकाका अतिशय उत्साहात ड्रिंक्स साठीचे कुपन देऊन टेबलवर ड्रिंक्स सर्व करत होते. बार सांभाळत होते अच्युत गोखले .

 त्यांच्या उत्साहाला त्रिवार सलाम. रोटेरियन सचिन जोगळेकर यांनी डिनर स्पॉन्सर केले होते .

गरम गरम पावभाजी, दहीभात आणि नंतर स्वादिष्ट कुल्फी असा मेनू होता. सर्वजण खाऊन पिऊन तृप्त झाले. कार्यक्रम संपता संपता  रोटेरियन नवाथे आणि जयश्री यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना एक छोटीशी गिफ्ट प्रेसिडेंट मृणाल च्या हस्ते दिली व फोटोशूट चा कार्यक्रम पार पडला.

बावरची नाईट चा मोहोल हा अविस्मरणीय म्हणायला हवा. त्यावरून मला काही ओळी पेश कराव्याशा वाटतात.

ए खुदा मेरी ये अर्जी कबूल करले,

 सारा साल खुशहाल मे बीते|

 और कोई प्रोजेक्ट्स हो ना हो ,

बावरची नाईट बरकरार रहे ||

 आणि हो 

दिन ब दिन सारे बावरची अपने काम मे,

 बेमिसाल बनते चले, बेमिसाल बनते चले |

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016