Rotary Club of Pune Shivajinagar Bulletin 5th December 2022

एकांकिका

Upcoming Programs

डिसेंबर महिन्याचे कार्यक्रम:

 • 05 डिसेंबर: प्रगतिशील शेतकरी: श्री. ज्ञानेश्वर बोडके.
 • 12 डिसेंबर: एकांकिका स्पर्धा
 • 19 डिसेंबर: एकांकिका कौतुक
 • 26 डिसेंबर: AGM

Our participation in District

PDG Dr Deepak, PP Vrinda Walimbe and President Dr Mrinal were felicitated the district foundation event “औदार्य” and were handed over certificates for participation in Global Grant projects. PP Nitin Abhyankar has a lions share in Gobal Grant project.

Rotary Designated Month

December is Disease Prevention and Treatment Month. This month includes: World AIDS Day on the 1st and International Day of Disabled Persons on the 3rd of December

Programs done in November

1. Bee Man’s visit to our club
2. The Culture of Local Languages
3. मेडिटेशन आणि त्याचे फायदे

Projects done in November

1. Global Grant Project
2. Mental Health Awareness Programme
3. Youth Avenue
4. Service project

Beyond Boundaries

Let’s learn the history of the first Rotary eClub in the world and their Signature projects …

Our Participation In District

PDG Dr Deepak, PP Vrinda Walimbe and President Dr Mrinal were felicitated  the district foundation event “औदार्य”.

PP Nitin Abhyankar has a lions share in Gobal Grant project.

Achievements

Let’s acknowledge and appreciate our members, Anns and Annetts for their achievements in various fields.

संगीतानुभव

काही  गाणी, त्यातील शब्द, सूर किंवा लय – ह्यामुळे आपल्या मनाचा ठाव घेतात . एक वेगळीच अनुभूती देतात .  पाहू या … ह्या सदरातून …

भाषा भगिनी

ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity ,equity  and  inclusion ” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे . त्यावर आधारित “Diversity ,inclusion” अर्थात भाषा भगिनी हे  दृक श्राव्य सदर ….

Support Group

December month support group
 • Rtn. Sandeep Tapaswi ( Leader )
 • Ann Vaishali Tapaswi
 • Rtn. Nitin Naik
 • Ann Dr Shilpa Naik
 • Rtn. Pradeep Godbole 
 • Rtn. Ajay Godbole
 • Ann Anjali Godbole
 • Rtn. Rahul Pendharkar 
 • Ann Kalyani Pendharkar 

होम मेकर्स आणि बरंच काही!

कलावंत अश्विनी

ऐन उमेदीच्या वयात सहचराची  साथ सुटलेली अश्विनीआज  ज्या  तडफेनं आणि उत्साहानं  मार्गक्रमण करत आहे त्यामागे तिने व तिचा पती अश्विनयांनी आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर जे सुसंवादाचे पूल निर्माण केले होते त्यांचा मोठाच हातभार आहे.   त्यावेळी अश्विनीला बँक व्यवहारापासून ते “अश्विन” च्या व्यवसायापर्यंत सर्व गोष्टींची नीट व्यवस्था लावण्यात या दोघांच्या सुहृदांनी सर्वतोपरी मदत केली.  तसंच अश्विनीला तिच्या आवडत्या नाटकलेच्या क्षेत्रात पाय रोवून उभे  राहायलाही !

 

अश्विनी मूळची पुण्याचीचअश्विनी पुराणिक . भवानी पेठेत ती अकरा जणांच्या एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाली . शिवाय त्यांच्या घरात तीनशे वर्षाचं जुनं तेलफळादेवीचं देऊळ होतं.  त्यामुळे अश्विनीला लहानपणापासूनच देवळातल्या पूजाअर्चानैवेद्यसण , उत्सवरुढीपरंपरा , मंत्र जागर इत्यादी साऱ्या गोष्टींचा केवळ परिचयच  नव्हता तर त्या करण्यातल्या सहभागाचा आनंदही तिने पुरेपूर लुटला होता.त्यावेळी तिच्या साथीला अर्थातच त्याची चुलत भावंड, आई वडीलकाका काकू असे सारेच असत.  यातच भर म्हणजे पंढरपूरच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या दोन दिवसांचा मुक्काम पुण्यात पालखी विठोबा जवळ असतो.  तेव्हा तिथल्या रस्त्यावरच त्यांच्या पंगती जेवायला बसतात.  त्यावेळी त्यांच्यासाठी लाडू वळणं , त्यांच्यासाठी शिधा बांधून देणे इत्यादी काम रात्री जागून करण्यात किती मजा येईहे अश्विनीने सांगितलं.  अशा या साऱ्या मोठ्या मोठ्या कामांचं मोठंच “खटलं” तिने लहानपणापासून अनुभवलं.  त्यामुळे खूप लोकांमध्ये वावरण्याची तिला सवय लहानपणापासूनच झाली.  तशी ती लहानपणापासूनच धीटहसरी आणि उत्साही होती. 

 

अश्विनीच्या आत्याच्या कुटुंबाचे गजानन सरपोतदारांसह अनेक मराठी नाट्य चित्र सृष्टीतील कलाकारांशी उत्तम परिचय होतेत्यामुळे आत्याकडे राहायला गेल्यावर अश्विनीला अशोक सराफ ,रंजना, रमेश भाटकर , अमोल पालेकर अशा दिग्गज कलाकारांना जवळून पाहायला मिळे.  सरपोतदारांनी तर तिला लहानपणीच सिनेमात काम करशील का असं विचारलं होतं!

 

अश्विनीचा चुलत भाऊ त्यावेळी बी.  जे. मेडिकलला शिकत होता.  तोही नाटकात नेहमी भाग घेत असे.  हा भाऊ अश्विनीचा लहानपणापासून आदर्श होता . त्यामुळे त्याच्यासारखंच आपणही नाटकात काम करायचं असं तिने मनाशी ठरवलं होतं.  तशी ती पण शाळेच्या सर्व वर्षात नाटकातनाचात भाग घेत होती . अहिल्यादेवी शाळेत ती पाचवीच्या प्रवेशासाठी गेली तेव्हाच  शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी तिला नाटकासाठी सिलेक्ट केले . आणि त्या आंतरशालेय स्पर्धेत तिला विदूषकाच्या कामासाठी पहिलं बक्षीसही मिळालं.  त्यामुळे पुढे सर्व वर्ष ती नाटकात असणं ओघानच आलं ! 

कॉलेजमध्ये ही नाट्यकलेत पुढे जाता यावं म्हणून तिने बी. एम.  सी.  सी. त प्रवेश घेतला. तिथेही प्राध्यापक प्रकाश भोंडे सरांनी तिच्या नाटकाच्या बक्षिसाची यादी बघून तिला लगेच प्रवेश दिला . याचा तिला खूप फायदाही झाला. दरवर्षी तिने नाटकात भाग घेतला. त्यावेळी तिला अभिराम भडकमकर, शिरीष लिमये, प्रसाद वनारसे आदी दिग्दर्शक कलाकारांकडून खूप शिकायला मिळाले.  बारावीत असताना तिने उज्वल केसकर यांच्या पुणे युवक केंद्रातर्फे सादर होणाऱ्या नाटकात काम केलं आणि राज्य नाट्य स्पर्धेचा अनुभव घेतला.  कॉलेजतर्फे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आदी स्पर्धांमध्ये ती भाग घेत होतीच.  पुणे युवक केंद्रातही तिने तिला मिलिंद फाटकरसिका जोशी , प्रसन्न केतकर, सतीश तारे, माधव अभ्यंकर, त्यागराज खाडिलकर यांच्या सारखे कलाकार भेटले आणि त्यांच्याशी मैत्री झाली अभिजात आणि जागर या संस्थांच्या नाटकातही तिने कामं केली.

Click here to read more …

कलावंत – रो. अश्विनी अंबिके

सुसंवाद -लहानपणापासून सुविचार किंवा संस्कृत श्लोकातून ऐकलेला हा शब्द.  पण त्याचं महत्त्व आपण जेव्हा या जगाच्या व्यवहारात प्रत्यक्ष उतरतो , आणि फायद्या तोट्याची सुखदुःखाची गणित आपल्याला सामोर येतात तेव्हा उमजू लागतं हे खरं!  सुसंवादाने गैरसमज दूर होतातमाणसं मनाने एकमेकांजवळ येतातएकमेकांना मनापासून सहकार्य करतात , पर्यायाने अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकतं , सौदाहार्याचे वातावरण नक्कीच निर्माण होतं. 

आज हे सारं मनात येण्याचं कारण , आपली अश्विनी , अश्विनी अंबिके!

याची देही याची डोळा...

प्रकाश शेलार (उपशिक्षक)

माध्यमिक विद्यालय एरंडवणा

याची देही याची डोळा…..

दीपावलीची सुट्टी चालू होती. रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर चे पदाधिकारी संजीव चौधरी यांचा मला फोन आला. आगामी २८ नोव्हेंबर रोजी क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर मृणाल नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयाच्या इंटरॅक्ट क्लबची एनडीए दीक्षांत समारंभासाठी भेट देण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी क्लबच्या वतीने विचारणा केली. मी स्वतः लोकमतचा पत्रकार असल्याने एनडीए बाबत माहिती असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी या भेटीसाठी तात्काळ होकार दिला. सोमवार दिनांक २८ रोजी पहाटे ५.१० वाजता इंटर क्लबचे १५ विद्यार्थी व मी एन.डी.ए. इंडिया खडकवासलाच्या दिशेने रवाना झालो.

त्रिशक्ती गेटवर प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आम्ही परेड ग्राउंड च्या दिशेने निघालो. एकूण ७००० हजार एकरावर विस्तारलेल्या या एन.डी.ए बाबत एव्हाना कल्पना आली होती.सकाळी ६.३० वाजता संचलन सुरु झाले.यावेळी तुम्ही फार काही पाहू शकणार नाही परंतू तुम्ही दोन आवाज ऐकु शकता. हा आवाज आहे छात्रांच्या बुटांचा. छात्र आणि आमच्यातील अंतर साधारण ४०० ते ५०० फुटांचे असेल. इतक्या लांबून एक सुरात हा आवाज ऐकताना आमच्या तोंडातुन जबरदस्तच हाच शब्द बाहेर पडला. इंडियाच्या अधिकाऱ्यांना सलाम दिला जातो.

संचनलानंतर सर्व छात्र एका वेगळ्या ग्राऊंडवर जमा होतात. तिथे मौज मस्ती चालते. ज्याला जे वाटेल ते तो करतो. हे छात्र फुल एनर्जीमध्ये असतात. त्याच हे दृष्य पाहताना पालकांच्या डोळ्यात मात्र आनंदाचे अश्रू असतात. एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू अशी परिस्थिती असते. ३ वर्षे खडतर प्रशिक्षण केले. परेडशिवाय जीवन यांचे अधुरे. मग अशा सर्वोच्च आनंंदाच्या क्षणी परेड की झलक तो बनती है असेच म्हणावे लागेल.परेड संपल्यानंतर भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने सलामी देतात. या चित्तथरारक हवाई कसरती काळजाचा ठोका चुकवतात. कालची सकाळ अगदी मजेत गेली. संचलन , हवाई कसरती, जल्लोष, आनंदाश्रू सगळे काही नेत्रदीपक होते.

Click here to read more …

प्रकाश शेलार (उपशिक्षक)

दीपावलीची सुट्टी चालू होती. रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर चे पदाधिकारी संजीव चौधरी यांचा मला फोन आला. आगामी २८ नोव्हेंबर रोजी क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर मृणाल नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयाच्या इंटरॅक्ट क्लबची एनडीए दीक्षांत समारंभासाठी भेट देण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी क्लबच्या वतीने विचारणा केली. मी स्वतः लोकमतचा पत्रकार असल्याने एनडीए बाबत माहिती असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी या भेटीसाठी तात्काळ होकार दिला.

सोमवार दिनांक २८ रोजी पहाटे ५.१० वाजता इंटर क्लबचे १५ विद्यार्थी व मी एन.डी.ए. इंडिया खडकवासलाच्या दिशेने रवाना झालो. त्रिशक्ती गेटवर प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आम्ही परेड ग्राउंड च्या दिशेने निघालो. एकूण ७००० हजार एकरावर विस्तारलेल्या या एन.डी.ए बाबत एव्हाना कल्पना आली होती.सकाळी ६.३० वाजता संचलन सुरु झाले.यावेळी तुम्ही फार काही पाहू शकणार नाही परंतू तुम्ही दोन आवाज ऐकु शकता. हा आवाज आहे छात्रांच्या बुटांचा. छात्र आणि आमच्यातील अंतर साधारण ४०० ते ५०० फुटांचे असेल. इतक्या लांबून एक सुरात हा आवाज ऐकताना आमच्या तोंडातुन जबरदस्तच हाच शब्द बाहेर पडला…