Skip to main content
Project reports

Projects done in November

By December 3, 2022December 5th, 2022No Comments

18th November, 2022

Services ( Medical ) Avenue

President Dr Mrinal Nerlekar

दि. अठरा नोव्हेंबर 2022 – अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय येथे भाविप दक्षिण पुणे व रोटरी क्लब आॅफ शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इ. आठवी व नववीच्या विद्यार्थीनींचे ब्लड सँपलिंग करण्यात आले.

भारत विकास परिषद संचालित जनकल्याण पॅथाॅलाॅजी लॅबचे निष्णात टेक्निशियन यांनी मोलाची कामगिरी केली व अगदी कमी वेळात हे सँपलिंग पार पाडले.

रोटरीतर्फे प्रेसिडेंट डाॅ. सौ. मृणाल नेर्लेकर उपस्थित होत्या.

भाविप दक्षिणचे 

 • श्री. व सौ. पाटणकर
 • श्री. धुपकर
 • श्री. पाध्ये 
 • श्री. गोडसे
 • श्री. एकबोटे
 • श्रीमती माधुरीताई कुलकर्णी 
 • सौ. मंजुषा गोगटे
 • श्री. पदमवार
 • श्री पुरंदरे हे उपस्थित होते.

अरण्येश्वर शाळेचा सर्व शिक्षक वर्ग (तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग) व माध्यमिक शाळेच्या सौ. जाधव मॅडम तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम यांनी सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या. सर्व विद्यार्थीनींनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.

समुपदेशक डाॅ. नेनेमॅडम यांनीही विद्यार्थीनींना धीर देत या ब्लड सँपलिंग उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.  या सर्व टीम वर्कमुळेच हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. सर्वांचेच मनापासून आभार.

सुमारे पासष्ट विद्यार्थीनी व अठ्ठावीस शिक्षिका यांचे ब्लड सँपल कलेक्शन करण्यात आले.

समुपदेशक डाॅ. नेने मॅडम यांनीही विद्यार्थीनींना धीर देत या ब्लड सँपलिंग उपक्रमात उत्साहाने भाग घेतला.  या सर्व टीम वर्कमुळेच हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. सर्वांचेच मनापासून आभार.

सुमारे पासष्ट विद्यार्थीनी व अठ्ठावीस शिक्षिका यांचे ब्लड सँपल कलेक्शन करण्यात आले.

18th November, 2022

Global Grant Project : Baby sleeping bag distribution and Asha workers Training

आय पी पी डॉ शोभा राव  

विविध  PHC  मधून आशा वर्कर्स ना बेबी वॉर्मरचे प्रशिक्षण देण्याचे काम  जोरदार चालू आहे. ह्यात बेबी वॉर्मर बरोबर स्तनपानाचे आणि आरोग्यपूर्ण आहाराचे महत्व आय पी पी डॉ शोभा राव   आणि  पीइ डॉ स्मिता जोग सांगत आहेत.

१८ नोव्हेंबर रोजी  “आशा”  वर्कर्स च्या प्रशिक्षणाचा दुसरा वर्कशॉप खामगाव येथे झाला. खामगाव आणि राहू दोन्ही सेंटरच्या एकूण  ६५ आशा आल्या होत्या. आपल्या क्लब तर्फे पीइ डॉ स्मिता जोग , पी पी डॉ राव, ऍन अलका आणि आय पी पी डॉ शोभा राव असे ४ जण गेले होते.

२४ नोव्हेंबर रोजी कुरकुंभ, तालुका दौंड,   इथल्या पी एच सी मध्ये आशा वर्कर्ससाठी वर्कशॉप झाला. ८० आशा वर्कर्स नी ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आई पी पी डॉ शोभा राव, पी इ  डॉ  स्मिता जोग आणि पी पी डॉ राव उपस्थित होते.

तसेच ३० नोव्हेंबर रोजी रावणगाव आणि केडगाव येथे प्रशिक्षण देण्यात आले आणि बेबी बॅग देण्यात आली.

ग्लोबल ग्रॅन्ट प्रोजेक्ट आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांची दाखल अनेक वृत्तपत्रानी घेतली आहे

19th November, 2022

Youth Avenue

Rtn. Madhuri Gokhale

On 19th November Rotary club of Pune Shivajinagar  donated a device called “U Read” to Blind School along with Rotary Club of Pune Sarasbaug. This device is like a table lamp. You keep a book below it and it reads the book in an almost human like voice. Number of books in braille is very limited. They mostly support school curriculum. This device will help the girls to read more books. 

After the handing over ceremony, the manufacturer conducted a training session for the staff. 

President Dr Mrinal, spouse Ashish, Rtn Madhuri and Vijay’s granddaughter Maahi and Rtn Madhuri  attended this handing over ceremony.

19th November, 2022

Mental Health Awareness Programme for the Police Personnel at Shivajinagar Police Campus

PE Dr Smita Jog 

शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये हिरकणी हॉलमध्ये मानसिक आरोग्य या विषयावरचे कार्यशाळा घेण्यात आली .

कार्यक्रमात ची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर प्रेसिडेंट मृणाल नेर्लेकर यांनी रोटरी क्लब शिवाजीनगर याविषयी माहिती सांगितली .

त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इन्स्पेक्टर कळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले.ते म्हणाले पोलीस खात्यातील लोकांना वेगवेगळ्या थरातील जनतेशी संपर्क साधावा लागतो .तसेच कित्येक वेळा अनपेक्षित पणे कठीण आणि गुंतागुंतीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे ही लोकं कायमच ताण तणावाखाली काम करत असतात. त्यांना अशा प्रकारच्या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल .हा उपक्रम रोटरी क्लबने घेतल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पहिल्या वक्त्या होत्या प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल कुलकर्णी . त्यानी मन या विषयाची संकल्पना स्पष्ट केली व वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपलं मन कसं प्रतिसाद देत तेही सांगितलं .मनाची कार्य कुठली कुठली असतात व त्यावर मेंदूच्या कुठल्या भागाचं नियंत्रण असतं हेही त्यांनी आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलं. काही मानसिक आजारांची तोंड ओळख करून दिली. त्यानंतर नाठाळ मनाला काबूत आणण्यासाठी साठी त्यांनी सर्वांनाच एक श्लोक म्हणायला सांगितला. अत्यंत सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी सर्वांशी संवाद साधला.

त्यानंतर पी पी वृंदा वाळिंबे बोलल्या. त्यांनी वेगवेगळ्या मानसिक आजाराची माहिती दिली. प्रसंगाला सामोरे जाताना येणारा ताण किंवा स्ट्रेस आणि anxiety मधला फरक त्यांनी स्पष्ट केला. तसेच डिप्रेशन ,ओ सी डी ,आणि इतर आजारांची माहिती दिली. सायको थेरेपीस्टआणि psychiatrist यामधला फरक ही त्यांनी सांगितला . मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची टिंगल टवाळी न करता त्यांना सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे व योग्य ते उपचार त्यांना मिळायला हवेत. मानसिक आजार टाळण्यासाठी अथवा त्यांना काबूत ठेवण्या साठीचा एक गुरुमंत्र त्यांनी दिला. त्या म्हणाल्या हेल्दी लाइफस्टाईल ही हेल्दी माईंड राखण्यासाठी आवश्यक आहे. भाषण करताना त्यांनी श्रोत्यांशी खूप चांगला संवाद साधला.

त्यानंतर डॉक्टर सुधाकर येरनानी यांनी आत्महत्याला प्रवृत्त होण्या पाठीमागची वेगवेगळी कारणे विशद केली .त्याचबरोबर या व्यक्तींच्या वागणुकीविषयी सुद्धा श्रोत्यांना माहिती सांगितली. त्यांनी वेळीच मदत मिळाली तर त्यांच्या आत्महत्या रोखता येतील असे प्रतिपादन त्यांनी केले. श्रीमंत ,गरीब सुशिक्षित अशिक्षित या सगळ्या स्तरांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते .तसेच काही काही वेळेला कुटुंबात ह्याची हिस्टरी असू शकते. तसेच ज्यांचे बालपण सामान्य राहिले नाही अशा व्यक्तींच्यात हा आजार दिसून येतो. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी हे स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टी सामान्य वाटू शकतात त्याच गोष्टीसाठी दुसऱ्या व्यक्तीला आत्महत्या करावीशी वाटू शकते. हेल्पलाइन चा उपयोग करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

शेवटचा सेशन हा आर्ट थेरपी वरती झाला .हा सेशन , The secret Ingredient चे संचालक Annette अभिषेक भावे आणि हर्षदा ह्यांनी घेतला. गाणी नाच याचा वापर करत त्यानी वातावरण एकदम हलके फुलके केले व श्रोत्यांना त्यांनी हे दाखवून दिले की अशा गोष्टी करताना आपण आपल्या पूर्ण विवंचना विसरून जातो. त्यांच्या या सेशनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागे असलेले मुल आणि तारुण्य हे त्याने सरफेस ला आणले.

खूप चांगल्या आणि मोकळ्या वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला चित्र काढून सांगा असे हर्षदा मॅडमने सांगितल्यावर एका पोलीस महिलेने खालील चित्र काढून दाखवले

कार्यक्रमाच्या समारोपाला एडिशनल कमिशनर ऑफ पोलीस (ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ) डॉक्टर जालिंदर सुपेकर हे आवर्जून उपस्थित राहिले. सीनियर इन्स्पेक्टर कळस्कर हेही पूर्ण कार्यक्रमा साठी उपस्थित राहिले. पोलीस इन्स्पेक्टर जोशी यांनी कार्यक्रमांमध्ये लागणारी मदत केली.डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ताण तणाव सहन करायचा असेल तर सर्व पोलिसांनी नियमित व्यायाम करून आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे हे त्यांनी सांगितले .तसेच प्रत्येकाने कुठला ना कुठला छंद जोपासावा .याचा उपयोग निवृत्तीनंतर प्रत्येकाला करता येईल व आनंदाने आयुष्य जगता येईल हे ही त्यांनी सांगितले. तसेच पोलीस खात्यात काम करताना काय काय चॅलेंजेस येतात याचाही आढावा त्यांनी घेतला व अशा कार्यक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल रोटरी क्लबचे अभिनंदन केले.

ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात रो. प्रताप गोखले यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली .आभार प्रदर्शन करताना पी. इ. डॉक्टर स्मिता जोग म्हणाल्या रोटेरियन प्रताप यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम मुहूर्त स्वरूपात देणे शक्य नव्हते. एक चांगला कार्यक्रम केल्याचे समाधान सर्वांनाच मिळाले.

मध्यंतरामध्ये सर्वांना वडापाव व चहा अशी रिफ्रेशमेंट देण्यात आली.

ह्या कार्यक्रमासाठी आपल्या क्लब मधून प्रेसिडेंट डॉ मृणाल , पी इ डॉ. स्मिता जोग ,पी पी वृंदा वाळिंबे, रो. मनोज फुलंब्रीकर, रो. प्रताप गोखले, रो. मंजिरी धामणकर , ऍन वसुंधरा आणि ऍन शोभना दाते उपस्थित होते.

20th November, 2022

Tekdi

Rtn. Sachin Joglekar

Plastic Mukta Tekadi – this project was conducted by Dsitrict 3131 where  ten rotary clubs participated alongwith some NGOs working for this cause. 

This was a grand project. A good cause project and great Satisfaction.

Following are the salient features of this :

 • Total 187 bags plastic collection from Taljai tekadi
 • All 10 clubs President and there members are very co – operative  so very good assimilations.
 • Great awareness about Rotary was created. Lot of by-passers shown interest to join Rotary.
 • Presence of District officers :DGE Manju Phadke, Deputy commissioner Jagtap sir, PDG Deepak Shikarpur. District Dir Gauri Shikarpur, District synergy Dir Pallavi Sable and  AG Santosh Pardeshi
 • A very good logistics and fellowship by Zone 23 Region 4 Presidents.
 • Leading newspapers appreciated these efforts and got good PI. 

From our club,  Dr. Rao, Anna Ashish Nerlekar,  Rtn Abhishek Jadhav & Rtn Sachin Joglekar participated in this project.

Total 5 bags of blood donation received Arranged by RCP Fortune.

32 + members checked there’s Sugar test. Organised by RCP Diamond.

25th November, 2022

Youth Avenue Installation at Muktangan English School, Sadashiv Peth

Rtn. Madhuri Gokhale

Installation of Interact Club of Muktangan English Medium school, Sadashiv Peth  took place on Friday 25th November. 

The program started with the national anthem. Head Mistress of Muktangan School felicitated all the guests by presenting lovely handmade paper flowers. President Dr Mrinal Nerlekar gave a speech telling the importance of Interact Club.

She along with Secretary Rt Pramod Pathak & PP Rtn Anjali Ravetkar presented Rotary Pins to this year’s Rotaract President Isha Bhondwe , Secretary Sneha Konde and Treasurer Yash Chakole.

Past Interact President and Past Interact Secretary spoke about their work & expressed gratitude for getting this opportunity. 

President Dr. Mrinal Nerlekar, Secretary Pramod Pathak, PP Rtn. Anjali Ravetkar, Rtn. Ashwini Ambike & Rtn. Madhuri Gokhale attended the program.

28th November, 2022

Youth Avenue

President Dr Mrinal Nerlekar

our Interact club children of Madhyamik School attended the Parade at NDA and also could visit the place . This event was organised by District 3131 .

Good job done by Rtn Harshad Khonde and Shelar Sir for making this trip successful .

Special mention of Youth Director Rtn Sanjeev Choudhary  who did a wonderful job of coordination and making this happen .

30th November, 2022

Youth Avenue

Rtn. Sanjeev Chaudhary

Installation of Rotaract club at Modern College of art, science and commerce Shivajinagar  Pune  . President Dr. Mrinal Nerlekar , Installed Rotaract President Aditya Ghodke, Youth Director Sanjeev Chaudhary,  installed Rotaract secretary Ajay Koli PP. Anjali Ravetkar installed Rotaract treasurer Harshika Kale.

From last 7 years Our Rotary Club of Pune Shivajinagar  and modern College consistently running a Rotaract club . Thanks to Dr. Zunzarrao sir , Prof. Kamble sir and Rtn Alka Kamble for kind cooperation.We also inaugurated our Eco bricks project in campus of Modern College which was initiated by PP. Vrinda Walimbe and IPP. Dr. Shobha Rao 

We also gifted our Special Diwali Push bulletin to Dr. Zunzarrao sir and 4 copies to Modern college library. President Dr Mrinal also felicitated Principal Dr Zhunzarrao sir as he was elected in SPPU ( Pune University ) principal forum . 

For this installation event President Dr. Mrinal Nerlekar, secretary Pramod Pathak, youth Director Rtn.Sanjeev Chaudhary. PE. Dr. Smita Jog ,Rtn. Alka Kamble , Spouse  Ashok kamble ,  PP. Anjali Ravetkar,IPP. Dr. Shobha Rao, PP. Dr. Rao, PP. Vrinda Walimbe, rtn. Ajay Godbole,  Rtn. Ashwini Ambike, Ann. Anjali Godbole, Rtn. Balkrishna Damle.  Annet. Sukhada Damle were present.

1st December, 2022

Service project (Non -Medical) : school upliftment

Ann Alka Abhyankar

The food grains were delivered to Sarthak Seva Sangh  for the month of October and November .  Thank you PP Nitin Abhyankar, Ann Alka for this consistent efforts .

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016