Skip to main content
Program Reports

Programs done in September

By September 29, 2022November 12th, 2022No Comments

3rd October

Cardiopulmonary Resuscitation

Spouse Dilip Dhamankar

Dr Varun Niwargi an eminent intervention cardiologist explained what CPR cardio pulmonary resuscitation meant, how a common man should diagnose it, perform it in an emergency and how it can save a life if performed in the first few minutes of a cardiac arrest. This information was shown with some video clipping and presentations  

Though a very serious subject Dr Varun made is interesting with his humorous and engaging oratory. He made it very interactive by giving demonstrations on a mannequin and the members were given a hands on experience. The members were happy they learnt the technique and could actually perform it.

This program was arranged from District 3131 initiative and on the account of “ World Heart Day “ 

Dr Dilip Dhamankar introduced the speaker and Rtn. Manjiri Dhamankar gave the vote of thanks.

१९ सप्टेंबर

"पितृ पंधरवडयाचे पारंपरिक महत्व"

रो. माधुरी  गोखले

सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी आपल्याला  क्लब मधे वेदमूर्ती डॉक्टर माधव गजानन केळकर वक्ते म्हणून लाभले .

मृत्यू , मृत्यूनंतर केल्या  जाणाऱ्या क्रिया, नंतर आत्म्याचा होणारा प्रवास ह्याबद्दल माणसाच्या मनात नेहमीच भीती, औत्सुक्य, गोंधळ निर्माण होतो.पण अशा प्रश्नांची खात्रीलायक उत्तर कुठे मिळणार? आपल्या भाषणात वेदमूर्ती माधव गुरुजींनी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.

पितृ कार्य करण्याबाबत ही समाजात अनेक समज , गैरसमज आहेत. हे कधी कराव ,कोणत्या पदधतीने कराव , कोणी कराव ह्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपल्या पूर्वजांनी करून ठेवल आहे.

कुठलयाही कारणाने मृतदेह न मिळाल्यास पळसाच्या पानाचा कृत्रिम देह करून पालाश विधी करण्याबाबत त्यांनी सांगितले. 

अनेक पारंपरिक विधींमागील शास्त्र गुरुजींनी समजावून सांगितले. अनेक विधींमागील शास्त्र आणि कारणमीमांसा त्यांनी विषद केली. श्राद्ध का करावे? कुठले विधी कुठल्या दिवशी करावे ?एकोद्दिष्ट आणि महालय श्राद्ध म्हणजे काय? चट श्राद्ध, हिरण्यश्राद्ध, आमान्न, प्रातिनिधिक श्राद्ध, आत्मश्राद्ध म्हणजे काय? श्राद्धाचे अधिकारी कोण तेही त्यांनी सांगितले.

धर्मशास्त्रानुसार जे विधी प्राचीन काळी सांगितले गेले ते सध्याच्या काळात कालसुसंगत कसे होतील ते गुरुजींनी छान सांगितले. अनेक कार्यांना त्यांनी यथार्थ पर्याय सांगितले. आपद्धर्म सांगितले.

शेवटी हया सर्व पितृ कर्मातून आपण आपल्या पूर्वजांबददल कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्या आत्म्याचा प्रवास हा त्याने आयुष्यात केलेल्या कर्मावर अवलंबून असतो.

सांप्रत काळात धर्म पालनाची बुद्धी कमी होत चालली असताना गुरुजींसारख्या अधिकारी व्यक्तींकडून यामागील शास्त्र समजावून घेणयाची संधी आपल्या सभासदांना लाभली. 

रो. माधुरी ने गुरुजींची ओळख करून दिली आणि रो. शेखर ने आभार मानले.

२६ सप्टेंबर

अद्भुत जपान

ऍन  शोभना दाते

दिनांक  २६ सप्टेंबर रोजी  आपल्या क्लब मध्ये श्री.  सलील वैद्य यांचे अद्भुत जपान यावर लेक्चर झाले.  सुरुवातीला रो. श्रीकांत दाते यांनी ओळख करून दिली आणि लहानपणी सायोनारा शब्दातून जपानची ओळख झाल्याचे सांगितले.  श्री.  सलील वैद्य आठ वर्षे जपानमध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांचे वीस वर्ष व्यावसायिक कारणामुळे जाणे येणे असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जपानी लोक हे परिपूर्णतावादी असतात आणि ते कामाच्या रिझल्ट पेक्षा कामाच्या प्रोसेसला जास्त महत्त्व देतात.  त्याचबरोबर त्यांनी चार मुख्य जपानी शब्दांचा अर्थ सुंदर रीतीने सांगितला. 

वाबी” –  अपूर्णतेतील  सौंदर्य . पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे ” वापर आणि फेक ” न करतारिसायकल, रियूज या गोष्टींना जपानमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे . “साबी” – मुरण्यातील सौंदर्य म्हणजे जुन्या वस्तू मोठ्या वयाचे लोक यांना खूप महत्त्व दिले जाते . 

शिंबोई” – साधेपणातील सौंदर्य , त्यांना भडक रंग फारसे आवडत नाहीत . 

युगेन” –  साधेपणातील सौंदर्य पण यात गहन अर्थ असतो . 

त्यांनी जपानी संस्कृतीवर खूप छान माहिती दिली.  त्यामुळे खूप माहिती नसलेल्या गोष्टी सर्वांना समजल्या.  सर्व सभासदांनी हे लेक्चर आवडल्याचे दर्शवले . सर्वात शेवटी रो.  मानसी हिने आभार प्रदर्शन केले.  खास जपानी सुशी या वेळेला फेलोशिप म्हणून मुद्दामून ठेवली होती.  सर्वांना फेलोशिप देखील अत्यंत आवडली . 

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016