Skip to main content

30th June, 2023

Installation

रेश्मा कुलकर्णी

दर वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या क्लबचा पदग्रहण समारंभ सर्वांच्या सहकार्याने व मेहनतीने 30 जून 2023 रोजी अविस्मरा हॉल येथे अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डी जी मंजू फडके उपस्थित होत्या. त्यांच्या बरोबर ए.जी. कल्याणी गोखले सुद्धा उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे पी डी जी मुकुंदराव यावेळी उपस्थित होते. प्रांताचे अनेक अधिकारीही या वेळी उपस्थित होते. स्मिता ताईंच्या COPS met प्रेसिडेंट रजनी दुवेदी, प्रेसिडेंट रूपा गजेश्वर, प्रेसिडेंट अनुप कर्णिक, कॉसमॉस फाउंडेशनचे चेअरमन Adv ocate पंचपोर तसेच स्मिताताईंच्या भगिनी डॉक्टर कादंबरी यंदे इत्यादी उपस्थित होते. स्मिताताईंचा मुलगा डॉक्टर आशिष जोग यांनी चित्रफितीद्वारे आईला शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि रोटरी गीताने झाली. सुरुवातीला आय पी पी डॉ. मृणाल यांनी उपस्थितांचे स्वागत करून थोडक्यात गेल्या वर्षीच्या कामाचा आढावा घेतला. नंतर आय पी पी डॉ. मृणाल व अध्यक्ष डॉक्टर स्मिता जोग यांनी चार्टर व कॉलरचे आदानप्रदान करून मृणाल ने रीतसर अध्यक्षपदाची सर्व सूत्रे स्मिताताईंकडे सुपूर्द केली. नियमाप्रमाणे प्रमाणे पूर्व सेक्रेटरी प्रमोद यानेसुद्धा विद्यमान सेक्रेटरी डॉक्टर भारती कडे सचिवपदाची सर्व सूत्रे सोपविली. नंतर डी जी मंजू यांच्या हस्ते सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांना पिन्स देण्यात आल्या. तसेच पुश आणि रोस्टरचे प्रकाशनही झाले. पुश उत्तम व वेळेवर तयार झाल्याबद्दल एडिटर pp वृंदा व टीम चे सर्वानी अभिनंदन केले. सुबक व बिनचूक रोस्टर तयार करण्यासाठी सेक्रेटरी भारतीने विशेष श्रम घेतले.
यांनतर अध्यक्ष स्मिता ताई यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी पुढील वर्षात केलेल्या योजनांचे थोडक्यात विवरण केले. तसेच संचालकांनी चित्रफितीद्वारे पुढील वर्षातील योजना सांगितल्या. याच कार्यक्रमात नवीन दोन मेंबर्स विजय गोखले आणि हरीश पाठक यांचे इंडक्शनही झाले. पदग्रहण समारंभापर्यंत आपल्या क्लबच्या सदस्यांनी सुमारे 4350 डॉलरची भरघोस वर्गणी जमवून डिस्ट्रिक्ट रोटरी फौंडेशनचे मेंबर श्री नितीन मुळे यांना सुपूर्त केली. याचे विशेष कौतुक स्मिताताई आणि डी जी मंजू यांनी केले.
ए जी कल्याणी गोखले यांनी ओघवत्या भाषेत डी जी मंजू फडके यांची अतिशय समर्पकओळख करून दिली. डी जी मंजू यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर चे कौतुक केले आणि आपल्या क्लबकडून या वर्षी त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत असे सांगितले. डिस्ट्रिक्टने हाती घेतलेल्या वर्ष 23- 24 साठीच्या योजनांची रूपरेषा सुद्धा त्यांनी सांगतली. डिस्ट्रिक्ट कॉन्फेरेंस यावेळी पंडित फार्मस, पुणे येथे होणार आहे. त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
शेवटी सेक्रेटरी भारती ने येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो मंजिरी ने केले. आभार भावी अध्यक्ष रो. भारतीने मानले. त्यानंतर सर्वांनी फेलोशिप चा आनंद घेतला.
प्रतिमाने फेलोशिप ची व्यवस्था छान ठेवली होती.
एकंदरीत सर्व कार्यक्रम अगदी आखीव- रेखीव झाला. प्रत्येकाने आपापली कामे चोख पणे पार पाडली. एकामागून एक कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडल्यामुळे जवळपास दोन तास चाललेला कार्यक्रम अतिशय खिळवून ठेवणारा झाला. कार्यक्रमानंतर अनेकांनी भेटून आवर्जून कार्यक्रम आयोजनाची स्तुती केली. याचे श्रेय इव्हेंट टीमचा प्रमुख अजय गोडबोले, संपूर्ण इव्हेंट टीमला आहे. तसेच मी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणाऱ्या जुलै सपोर्ट ग्रुपला व आपल्या अनेक मित्र मैत्रिणींना जाते. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल प्रत्येकाचे नाव घेऊन कौतुक करायचे म्हटले तर लेख फारच मोठा होईल, त्यामुळे सर्वांचे एकत्रित आभार व अभिनंदन. अविस्मरा हॉलमध्ये पार पडलेला हा कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय झाला.

3rd July, 2023

Ganeshvandana

Mrs Archana Pantsachiv and Mr. Abhijeet Panchbhai

आपल्या क्लबची या नविन रोटरी वर्षाची (2023-24) पहिली सभा 3 जुलै रोजी “भक्तीधारा” या श्री गजाननाच्या भक्तीगीतांनी संपन्न झाली. त्याच दिवशी गुरूपौर्णिमा होती हा एक खास योगायोग.
सौ. अर्चना पंतसचिव व श्री. अभिजित पंचभाई यांनी आपल्या सुमधूर आवाजात सारी गीते सादर केली. या गीतांमध्ये पांडुरंगाच्या गीतांचाही समवेश होता. त्यांना अमित कुंटे, दिप्ती कुलकर्णी, उद्धव कुंभार व मोहित या वादक कलाकारांनी उत्तम साथ दिली.
श्री श्रेयस बडवे यांनी आपल्या माहितीपूर्ण आणि खुमासदार सुत्र संचलनाने कार्यक्रमात वेगळीच रंगात आणली.
“पांडुरंग हा भेटीचा देव” , “लावणी” या संगीत प्रकाराचा उगम आपल्या शेतांतील लावणी तून झाला याचा त्यांनी खास उल्लेख केला.
मोठ्या संख्येने उपस्थीत असलेल्या सर्व सभासदांनी हा कार्यक्रम अगदी तल्लीन होऊन ऐकला.
प्रदीप गोडबोले ह्यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व रेश्माने आभार मानले.

प्रदीप गोडबोले

10th July, 2023

Vocational Award given to Dr. Parikshit Gogte

रोटे अश्विनी अंबिके

कुशल नेत्र तज्ज्ञ डॉ परीक्षित गोगटे यांना व्यावसायिक गुणवत्ता प्रमाणपत्र
डॉ परीक्षित गोगटे हे नेत्र तज्ज्ञ तर आहेतच, परंतू जगभरातून अनेक वैद्यकीय पदव्या मिळालेले अत्यंत निष्णात,ख्यातनाम आणि कुशल नेत्रतज्ज्ञ आहेत.या व्यतिरिक्त IPS ही नागरी सेवा परीक्षा देखील ते उत्तीर्ण झाले आहेत. Community Eye Care Foundation चे ते व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत.
ग्रामीण आणि वंचित समाज, शालेय विद्यार्थी, दिव्यांग मुले, HIV बाधित लोक अश्या, समाजातल्या दुर्लक्षित लोकांना अतिशय वाजवी दरात, वेळ पडल्यास मोफत नेत्र सेवा देणे हे काम डॉ परीक्षित गोगटे समाजकार्य म्हणून आनंदाने करत आहेत. अश्या रुग्णांसाठी डॉ गोगटे हे देवदूतच आहेत.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा डॉ गोगटे यांचा हातखंडा. त्यांनी आजवर 62,000 हून जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत, तसेच 1500 हून अधिक लहान मुलांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा आकडा कमालीचा थक्क करणारा आहे.
आजन्म नेत्र सेवेचे अनमोल योगदान हाच वसा घेतलेले डॉ गोगटे खरोखरच महान.
आपल्या क्लब च्या वतीने प्रेसिडेंट डॉ स्मिता ताई जोग यांनी डॉ गोगटे यांना Vocational Excellence Award देऊन सन्मानित केले. रोटे अश्विनीने त्यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले तसेच आपल्या अनेक सभासदांनी देखील त्यांना प्रश्न विचारले. डॉ गोगटे यांनी सर्वांच्या शंकाचं निरसन केलंच, पण आपणा सर्वांना बहुमूल्य मार्गदर्शन देखील केलं.

16th July, 2023

Birthday/Anniversary meet at Amaya

रो. आनंद नवाथे

नवीन अध्यक्षांचे रोटरी वर्ष सुरु झाले कि काहीतरी नवीन उपक्रम चालू होतात, नवीन कल्पना सुचतात आणि उत्साहाने त्यांचे वर्ष सुरु होते.अर्थातच हे त्या अध्यक्षाला आपले वर्ष उत्तम घालवण्यात किती रस आहे ह्याचे निदर्शक होय. अशीच एक नवीन कल्पना घेऊन आल्या आहेत ह्या वर्षीच्या अध्यक्षा रो. स्मिताताई.
बर्थडे फेलोशिप हि आपल्याकडे रुळलेली जुनी संकल्पना आहे. त्या त्या महिन्यातील वाढदिवस व लग्न वाढदिवस असणाऱ्या रोटेरिअन्स व अन्सनी एखाद्या हॉटेलात जमायचे, अध्यक्षांनी आणलेला केक कापायचा आणि खाऊन पिऊन घरी जायचे असा शिरस्ता पडला होता.पुढे पुढे दोन दोन महिन्यातील बर्थडेज एका वेळी होऊ लागले तर काहीवेळा होऊच नाही शकले. संख्याही रोडावत चालली होती.
ही आलेली मरगळ झटकण्यासाठी स्मिताताईंनी आता सर्व क्लबची मीटिंगचं त्या व्हेन्यूवर घेण्याची कल्पना काढली.त्यामुळे सर्व क्लबचा सहभाग वाढला आणि सोहळा साजरा करण्यातील गंमत वाढली. ह्या वर्षीच्या जुलै महिन्याचा कार्यक्रम बी एम सी सी रोड वरील ‘आमया ‘ रेस्टॉरंटमध्ये रविवार दि. १६ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. गुरु ह्या ग्रुपचा लीडर होता. त्याच्या आणि माधुरीच्या पाठपुराव्यामुळे चक्क ४५ जण हजर होते.
सुरवातीला स्मिताताईंनी छान प्रास्ताविक केले. अध्यक्ष झाल्यावर वक्तृत्व वृद्धिंगत होते हे जाणवले. ह्यानंतर माधुरीने एक छान खेळ घेतला. ह्या महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांचे नाव चिठ्ठीत निघालेल्या मेम्बरने इतरांना प्रश्न विचारून ओळखायचे. खूप धमाल आली. हसणं-खिदळण, आरडा-ओरडा ह्यामुळे कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे कि काय असे वाटत होते.त्याला कोणी अटकावही केला नाही कारण हीच खरी फेलोशिप असते. त्याचबरोबर उत्तम चविष्ट डिशेस येत होत्या आणि सर्वजण त्यावर ताव मारून खात होते.ही ब्रंचच असल्याचे आधीच सांगितले होते. स्वतंत्र हॉल मिळाल्यामुळे खूप मोकळेपणा मिळाला.खेळातील विजेत्यांना माधुरीच्या मुलीने स्वतः बनवलेली प्रेझेन्ट एन्व्हलप्स अध्यक्षांच्या हस्ते मिळाली. मग सर्वांचे वय लक्षात घेऊन बनवलेला पौष्टिक केक कापण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ सभासद आर. टी. यांच्या हस्ते झाला. सर्वांनाच ही कल्पना पसंत पडल्यामुळे पुढील महिन्याची लीडर कल्याणीने २० ऑगस्ट तारीख जाहीर केली. कारगिल प्रोग्रॅम व क्लबची अनंत चतुर्दशीच्या ट्रीपची घोषणा होऊन दोन तास चाललेली मिटिंग अध्यक्षांनी बरखास्त केली. बाहेरील मोकळ्या जागेत फोटो काढून मंडळी रविवार सकाळ छान गेल्याच्या आनंदात घरोघरी परतली.

24th July, 2023

Kargil Vijay Diwas ( RYLA) at Modern College

Vijay Diwas is celebrated to commemorate the victory of Kargil War in 1999, leading to an armed conflict between two countries. In association with RCPS 3131,Rotract Club of P. E. Society’s Modern College of Arts, Science and Commerce College, Shivajinagar, Pune 5 celebrated the Vijay Diwas as RYLA on 24th July 2023 at P. E. Society’s Auditorium in Shivajinagar. Total 500 students participated in the RYLA. Rotary Club of Shivajinagar Pune invited Lt Gen Sudarshan Hasbnis PVSM, VSM, ADC, Deputy Chief of Army Staff as a guest of honour. He presented his experiences of gallantry at various wars, especially Kargil. He stated the importance of discipline and dedication. Major Gen Alok Deb SM, VSM shared the his experiences at Artillery Regiment in Operation Vijay and the hierarchies in defense services. Lt Col (Dr.) Sanjay Borase gave an exciting information about the use of animals especially dogs and horses in warfare. He gave information on how animals are trained to become animal warriors. Lt Col Prashant Kakade motivated students and gave the details about joining defense services. Lt Col Milind Thosar spoke on the importance of electronic communication department in the defense and warfare. He gave details of the Signal department and it’s functioning. They have displayed exemplary courage, valor , sacrifice and utmost professionalism during the years of your service to nation in defense. RCPS and Rotractors were inspired by their speeches.
Five Rotractors from Modern College were awarded with RYLA Awards for their achievements in NCC Parade at Republic Day Parade in New Delhi in January 2023. RYLA Awardees are Cadet Chintamani Burase, Cadet Tanuja Talikhede, Cadet Akanksha Biradar , Cadet Astha Singh and NSS volunteer Shrikrushna Sutar.
Dr. Smita Jog, President RCPS, welcomed the august gathering. Principal Dr. R. S. Zujarrao and Prof. Shamkant Deshmukh, Secretary P.E. Society also welcomed the guests and stated the significance of association of RCPS and Modern College. Secretary Dr. Bharati Dole, also welcomed the guests.
Event Team Dirctor Rtn. Ajay Godbole was instrumental in inviting and arranging the management of the guests. Rtn. Manjiri Dhamankar done the amazing work of MOC. Rtn. Pratima Durugkar looked into the arrangements of fellowship. Rtn. Madhuri Gokhale, Rtn. Ashwini Ambike ,Rtn. Kapil Kulkarni and Ann Reshma, Rtn. Pramod Pathak and Ann Neha , Ann Anjali Godbole, Rtn. Nitin Naik, Rtn. Sharad Dole and other team members worked meticulously to arrange this program successfully. Around 35 Rotarians were present for the programme.
NCC Cadets contributed the programme by giving the introduction of guests and participated in arrangements of the programme. It was a learning experience for them. Spouse Prof. Ashok Kamble took immense efforts to organize this programme. Youth Director Rtn. Prof. Alka Kamble presented the vote of thanks.

31st July, 2023

संस्कृत नाट्यशास्त्राचे तत्वज्ञान आणि संस्कृत सिनेमा

Ann प्रतिमा दुरूगकर

३१ जुलै रोजी आपल्याकडे ‘संस्कृत नाट्यशास्त्राचे तत्त्वज्ञान आणि संस्कृत सिनेमा’ या विषयावर बोलण्यासाठी श्री. संदीप सागर हे आले होते. संस्कृत हा त्यांचा पीएचडीचा विषय आहे. ‘World Peace Centre MIT’ ‘Department of peace studies MIT world peace University ,Pune ,Bharat’येथे ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
वेद, संस्कृत, प्राकृत, जैनोलॉजी, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयात प्राविण्य मिळविलेल्या श्री संदीप सागर यांनी या कार्यक्रमात प्रथम नाट्यशास्त्राची ओळख करून दिली. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील तत्त्वज्ञान उलगडून दाखविले. पाचवा वेद असे नामानिधान प्राप्त झालेल्या नाट्यशास्त्रातील तत्त्वज्ञान, काव्याचे प्रयोजन याचा आढावा घेतला. लोकोपदेश हा प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवून महर्षी वेदव्यासानी वेद, उपनिषदे, महाभारत, पुराणे यांची रचना कशी केली ते सांगितले.
संस्कृत मध्ये कथेचे तत्त्वज्ञान ठाई ठाई आढळते .खरे तर संस्कृत ही फक्त भाषा नसून ती विज्ञान आणि जीवन सुद्धा आहे हे सांगून त्यांनी नवरसांचे वर्णन केले . यावेळी त्यांनी ‘भारतीय मोनालिसा’ म्हणून एका दक्षिणात्य व्यक्तीची अप्रतिम भावमुद्रा दाखविली. बघणाऱ्याला त्या एकाच मुद्रेत चार ते पाच रसांपासून नवरसापर्यंत चा प्रत्यय येत होता.भरतमुनी पासून सुरू झालेला साहित्याचा प्रवास आत्ताच्या काळातील शॉर्ट फिल्म, जाहिराती ,मालिका इथपर्यंत त्यांनी आणला.
संस्कृत सिनेमाविषयी विवेचन करताना आदी शंकराचार्य या पहिल्या चित्रपटापासून सुरुवात केली. आजपावेतो फक्त 40 संस्कृत सिनेमे तयार झाले आहेत. त्यांची माहिती दिली आणि त्यातील काही सिनेमांच्या क्लिप दाखविल्या. शाकुंतल सिनेमातील कलात्मक चित्रण तसेच क्राउड फंडिंग च्या द्वारे तयार झालेला संस्कृत सिनेमा तसेच पुण्यकोटी हा पहिला ॲनिमेटेड संस्कृत सिनेमा याच्या क्लिप्स त्यांनी दाखविल्या.
संस्कृतचे एक ओटीपी चॅनल आहे तसेच संस्कृत मध्ये सध्या एक महाकाव्य लिहिले गेले आहे ,अशा अनेक गोष्टी त्यांच्या भाषणातून समजल्या. संस्कृत भाषेत अजून खूप मोठे काम होण्याची गरज आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. विशेषतः मुलांच्या कानावर संस्कृत जेवढे जास्त पडेल तेवढे ते आत्मसात करतील .त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सिनेमा आणि टीव्ही यावरून हिंदी ऐकू ऐकून मुलांना सहज समजते तेच संस्कृतच्या बाबतीत व्हावे असे त्यांनी बोलून दाखविले.
सिनेमांचे व्हिडिओ आणखी बघायला मिळाले असते तर अधिक चांगले झाले असते अशी रुखरुख मात्र सर्वांना जाणवली.
कार्यक्रमात वक्त्याची ओळख प्रदीप दूरुगकर यांनी करून दिली. आणि आभार Ann प्रतिमा दुरूगकर यांनी मानले.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016