Skip to main content
Program Reports

Programs done in Previous Month

By January 6, 2023January 13th, 2023No Comments

5th December, 2022

A Visionary Farmer

Ann Dr Shilpa Naik

On 5 th December a visionary and bluntly honest, forthrightly speaking farmer, Shri Dnyaneshwar Bodke, was our guest speaker. Though education till 10th standard, he has set up an example in organic farming, earning more than IT engineers, farming in their farms located in IT park at Hinjewadi, right next to big IT companies. And he is very firm about staying put farming, and not selling land to the big IT corporates around. 

Shri. Dnyaneshwar Bodke is the founder of the 4500 member group called Abhinav Farmers Club, which is a pioneer in community organic farming. They grow and sell organic vegetables, flowers to retail outlets in cities like Delhi, Kolkatta, Mumbai and also export to Europe. 

Mr. Bodke appeals to everyone to eat organically grown produce as its chemical free, healthy and tastes very different, very tasty. 

Their Community group farmers are well settled now but getting labour to work in farms is getting difficult day by day as people keep shifting to cities and opting other work. Educated people should turn to farming and help farmers. He furthur said that Rotary clubs do great work for schools in villages but they should also consider helping farmers in creating market to sell organic produce, housing, finance especially. 

Shri Dnyaneshwar represented Maharashtra when farmers from different states had met Modi 2 years back and was given 2 min to speak on the topic of ‘ how to double farmers income’. He told there that if farmers sell directly in cities to customers then they can earn considerable profit. Conditions are not so good in villages as no good roads, knowledge of many scientific things. Educated people should come into farming is what he hoped. 

Listening to Mr Bodke was a pleasure for all as he told different healthy ways of living, drinking tea especially and different recipes. 

Ann Anjali Godbole introduced Shri Dnyaneshwar Bodke and Ann Dr. Shilpa Naik gave vote of thanks.

11th December, 2022

Ekankia report

PP C D Mahajan

यंदाच्या रोटरी वर्षात एकांकिका स्पर्धा डिसेंबर मध्ये घेण्याचे ठरले.  त्याप्रमाणे भरत नाट्य मंदिराचे पेन्सिल बुकिंग करून ठेवले. त्यानंतर म्हणजे साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान सर्व रोटरी क्लबना एकांकिका स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर बऱ्याच क्लबशी म्हणजेच त्या क्लबच्या अध्यक्षांशी फोनवर बोलणे सुरू झाले. एकांकिका आपल्या क्लब ने भरविण्यास सुरुवात केली त्यानंतरचे हे 23 वे वर्ष.  प्रत्येक वर्षी आपल्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभत आला आहे.  पण यावर्षी अनेक रोटरी क्लबचा थोडा नकारात्मक प्रतिसाद वाटू लागला. एकांकिका स्पर्धा भरविण्याचे खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने स्पर्धा प्रवेश शुल्क प्रत्येक क्लबला जरा जास्तीचेच वाटत होते.

 सर्वसाधारणपणे वीसेक एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ शकतील या अंदाजाने प्रवेश शुल्क ठरविले गेले. 

 प्रवेश शुल्क जरी काही अंशाने जास्त वाटले असले तरी एकुणात च अनेक मान्यवर आणि नेहमीच्या यशस्वी रोटरी क्लबने माघार घेत यावर्षी आपापली वर्णी न लावण्याचा निर्णय पक्का करून टाकलेला निदर्शनास आला.

 यामध्ये खरंतर एक गोष्ट मला नक्कीच नमूद करावीशी वाटते म्हणजे जर आपण आपल्या क्लब ने आपल्याला उपलब्ध करून दिलेले पैसे हे थोडेफार  लक्षात घेतले असते तर कदाचित ही प्रवेश शुल्काची रक्कम आपण करू शकलो ही असतो. 

सरते शेवटी एकूण दहा रोटरी क्लब यांची एकांकिका स्पर्धेत भाग घेण्याची तयारी आणि तसा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला.  खरंतर या वर्षी आपल्या क्लबच्या अध्यक्षांनी एक सुंदर आणि कल्पक निर्णय घेतला होता. तो निर्णय म्हणजे किमान चार रोटरॅक्ट क्लब ना या स्पर्धेत प्रवेश द्यायचा. प्रत्यक्षात बरेच क्लब  या साठी तयारी दाखवतील असं वाटत होते पण यासाठी एकही रोटरॅक्ट क्लब पुढे आला नाही. कदाचित यासाठी माझे प्रयत्न पुरेसे ठरले नसावेत.

 तर एकूण दहा रोटरी क्लबच्या दहा एकांकिका करण्याचे नक्की झाले.  यावेळेस नेहमीच्या प्रमाणे काही परीक्षकांना एकांकिका परीक्षणासाठीही विचारणा केली. पण पैसे कमी, कार्यबाहुल्य वगैरे कारणांनी परीक्षक मिळणे अवघड होत होते. यावेळेस जाणत्या पण तरुण व्यक्तींना नाट्य परीक्षणास बोलवण्याचे ठरले. अतिशय समंजस आणि नाट्य  नाट्यसमीक्षणाचा, परीक्षणाचा आवश्यक तसा पिंड आणि ध्यास असलेले तीन परीक्षक आपल्याला मिळाले.  श्री मयुरेश्वर काळे श्री अक्षय जोशी आणि कुमारी सायली फाटक यांनी त्यांचे काम अतिशय चोखपणे पार पाडले.  यावेळी आपल्याला तरुण, नाट्यसिने  अन मालिकातून प्रमुख भूमिका करणारा तडफदार नायक श्री ओंकार गोवर्धन  प्रमुख पाहुणा म्हणून लाभला. तसेच पुढील वर्षीच्या प्रांतपाल रोटेरियन मंजू फडके या  सन्माननीय अतिथी म्हणून लाभल्या. एकूणच एकांकिका स्पर्धा सकारात्मकतेने व उत्तम रीतीने पार पडल्या. अनेकांनी छान व्यासंग जोपासला. नवे प्रयोग करण्यात आले. 

आपल्या क्लबच्या “किनारा”  या एकांकिकेत  अतिशय छान कथानक, सुंदर देखणा अभिनय, योग्य दिग्दर्शन याचा सुंदर मिलाफ आपणास दिसून आला. रोटेरियन स्नेहा भावे, अण्णा अशोक कांबळे, सदा यशस्वी कसलेले अभिनेते रोटेरियन चंद्रशेखर यार्दी आणि ann   गिरिजा यार्दी, तसेच एका सहजगत्या एनट्रीत ज्या दोघांनी अभिनयाचे बक्षीस मिळविले ते रोटेरियन अजय गोडबोले आणि रोटेरियन प्रमोद पाठक या सर्व टीमचा समर्पक अभिनय यशस्वीरित्या सादर केला गेला. 

खरतर  आपल्या क्लबला यावर्षीचे प्रथम पारितोषिक मिळणं जवळपास जणू नक्की झालं होतं पण केवळ काही तकनीकी कारणांनी ते हुकलं. पण महत्त्वाचे दुसरे पारितोषिकवैयक्तिक अभिनय, सहाय्यक अभिनय, नेपथ्य व संगीत अशी बक्षिसे आपल्या क्लब नी मिळविली.

 यावर्षीचे प्रथम पारितोषिक हे रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स या क्लबला त्यांच्या “सुसंगती सदा घडो” या एकांकिकेेस मिळाले. दुसरे आपल्या क्लबला तर तिसरे पारितोषिक “ब्रेकिंग न्यूज”  रोटरी क्लब पुणे मेट्रो यांना मिळाले.

 यावर्षी लक्षात आलेल्या  काही गोष्टी… स्पर्धेचे नियम तसेच स्पर्धेचा पूर्वीसारखा गणपती विसर्जनानंतर स्पर्धा घेण्याचा प्रयत्न आणि प्रवेश शुल्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न आपण करून स्पर्धेत जास्त क्लब कसे भाग घेतील याचा विचार नक्कीच केला पाहिजे. क्लब ने या प्रकल्पास उपलब्ध केलेली रक्कम आणि जास्त क्लबचे पार्टिसिपेशन याचा विचार करून प्रवेश शुल्क देखील कमी करता येईल असा विश्वास मला वाटतो. याप्रमाणे आपण या रौप्य महोत्सवी 25 व्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वर्षात किती सक्षमतेने पोहोचू शकतो याचे भान या प्रकल्पास साठी आपण देऊयात.

19th December, 2022

Kautuk

Ann Dr Shilpa Naik ,  Rtn. Sandeep Tapaswi

As is the club’s culture the subsequent meeting after Ekankika was predominantly for the “kautuk” of Ekankika team both at District and Club. In the meeting the Immediate Past President  Shobha Tai announced the Board for 23-24. The club congratulated the new team.  President Mrinal thanked and congratulated the entire Ekankika team. President Mrinal talked about the young team which worked with Sneha in making the ekankika a huge success.  The meeting was attended by our director Suraj Parasnis, Asst Music Director Sangharshan Jogdande. Omkar Gokhale the author of our Ekankika couldn’t attend.

Many club members spoke in the meeting regarding the Ekankika. I am mentioning the important points

 • Most of the members, especially Sneha and Kamble sir lauded the efforts of the director where by memorising the script became easy for the actors.
 • Characters were added as the practise of Ekankika evolved.
 • In this regard, Ajay mentioned how Secretary Pramod’s role was added in the script.
 • Nitin spoke about how creation of music was an enriching experience and the director helped him creating a score which enmeshed with the script.
 • Ajay was also responsible for getting the sand for the “Kinara” spoke about the effort in creating the sand on the stage.
 • PP Shekhar spoke about how our club lost the first prize by a whisker.
 • It was noted how Lonavla trip became a catalyst for scouting new talent namely Kamble sir.

Meeting ended with joyous camaraderie and lots of photos

26th December, 2022

AGM

ऍन वैशाली तपस्वी

२६ डिसेंबर ला आपल्या क्लबमध्ये AGM होती. सर्वप्रथम आई पी पी डॉ शोभा राव यांनी प्रास्ताविक सादर करून रोटरी वर्ष २३-२४ चे बोर्ड सांगितलं. त्याच प्रमाणे नवीन प्रेसिडेंट्स शोधण्यात येणाऱ्या चॅलेंजेसची माहिती करून देऊन, मीटिंग ची सुरवात झाली. 

त्या नंतर पी पी वृन्दा वाळिंबे, रो. भारती डोळे, पी पी अनिल दामले, पी पी शरद डोळे, पी इ डॉ. स्मिताताई जोग, रो. अजय गोडबोले, रो. संजीव चौधरी, पी पी. अशोक गाडगीळ, रो. प्रदीप दुरूगकर आणि पी पी आनंद नवाथे यांनी आपली मतं मांडली. 

अतिशय मोकळ्या वातावरणात पार पाडलेली ही Agm, प्रेसिडेंट डॉ मृणालने छोटे मोठे मुद्दे सांगत छान हाताळली. 

ह्या सगळ्यात मला भावलेली गोष्ट म्हणजे कितीही वेगवेगळे विचार आणि मतं असली तरीही आपला क्लबनी पुढे खूप छान प्रगती करावी आणि  समाज उपयोगी प्रोजेक्ट्स अजून चांगल्या पद्धतीने करावेत ही थीम सगळ्याच मीटिंगमध्ये प्रामुख्याने पुढे आली. 

आपला क्लब. पुढे जायला अजून काय पाहिजे?

काही महत्वाचे मुद्दे चे ह्या मिटिंग मध्ये मांडले गेले. त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे :
1) PP Vrinda informed the members about the proposed bye-laws updation as per MOP 2022 and the same is expected in a few days.

2) Few of the proposed changes were informed with reference to the constituting of the Board in RY 2023-24. They are as follows:

a) PE & Director, Club admin will be a separate entity
b) Jt. secretary & Membership Director should be delinked
c) Nomenclature of Public Image Avenue does not have IT in it. PI & IT are two different committees.
d) International Service Director will be added as per Rotary International directives
e) Only two physical meetings are mandatory as per MOP 2022. The other two meetings can be online or out of the venue.
f) President-Elect will be Vice President and assist President in discharging Presidential duties. Similarly, Jt Secretary will assist Club Secretary.

2nd January, 2023

संयुक्ता दाणी पुरस्कार

Ann Seema Mahajan

दसरा उजाडला की मला संयुक्ताताईंची आठवण प्रकर्षाने येते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या क्लब मध्ये रोटेरियन विनू भाऊ संगीत स्पर्धा घेतात त्याची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही सर्वसाधारणपणे करतो. दसरा ते दिवाळीच्या सुट्टीदरम्यान मुलांच्या ऑडिओ क्लिप्स मागवतो आणि आमची धावपळ सुरू होते. करोना काळापासून हे सर्व ऑनलाईन होत असल्याने तसा फारसा ताण पडत नाही. रोटेरियन नितीन आणि रोटेरियन संजीव यांच्या भक्कम टेक्निकल सपोर्टमुळे हे सर्व सुरळीत होते. यावर्षी दहा ते पंधरा शाळांमधून 95 मुलांनी भाग घेतला होता .त्यात 30 मुलांची फायनल राऊंडला सीमा, डॉक्टर शिल्पा, डॉक्टर मृणाल, प्रमोद यांनी निवड केली. डॉक्टर रेवा नातू या अभ्यासू गायिकेने त्यातून दहा गुणी गायक यांची निवड केली. 2 जानेवारीला क्लब मध्ये त्यातल्या नऊ मुलांचं गाणं आम्हाला ऐकायला मिळाले. सर्व मुलांनी खूपच गोड निरागस आणि सुस्वर  गायन केले .हे शामसुंदर, नाविका रे, भरजरी ग पितांबर दिला फाडून, अशा सारखी सदाबहार मराठी गाणी लहान मुलांनी सादर केली. त्याबरोबरच काही अनवट अभंगही मुलांनी सहजपणे सादर केले. क्लब मध्ये त्यादिवशी जवळजवळ 80 लोकांनी हा कार्यक्रम ऐकला आणि पाहिला. उपस्थिती खूपच छान होती. एन मीनानी खास मुलांसाठी केक मागवला होता .डॉक्टर शिल्पाने सर्व मुलांची आणि  परीक्षकांची छान ओळख करून दिली आणि नेहाने योग्य ते आभार प्रदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे युट्युब प्रक्षेपण रोटेरियन संजीव च्या टीमने उत्तम रीतीने केले त्यामुळे बाहेर गावचे आणि बाहेरच्या देशातले प्रेक्षकही याला लाभले. चांदीची आणि bronze ची पदक यावेळी मुलांना देण्यात आली. ती याप्रमाणे

इयत्ता चौथी व पाचवी

चांदीचे पदक

 •  सिद्धांत नगरकर
 •  साची जोशी
 •  राधेय कापरे

bronze medal

 • ऋषभ जोशी
 • माही शिरसीकर

इयत्ता सहावी व सातवी

चांदीचे पदक

 • स्वराभोळे
 • मल्हार पटवर्धन
 • कनिष्का बडगुजर

bronze medal

 • अजय ओक
 • अथर्व रावेतकर

8th January, 2023

रोहा ट्रिप

ऍन  वंदना पालकर

पोहे म्हटलं ,की पोह्याचे खूप पदार्थ डोळ्यासमोर येतात.  आणि सगळेच पदार्थ चविष्ट लागतात.  कोकणातील पोह्याची चव काहीतरी विशेष असते.  असे हे पोहे बनतात कसे हे मात्र आजपर्यंत पाहिलं नव्हतं.  पी पी श्रीकांत आणि सरिताने हा योग घडवून आणला. रोह्याला जाऊन पोह्याची आणि तांदळाची फॅक्टरी बघण्याचे ठरले. 

त्याप्रमाणे आठ जानेवारीला सकाळी सात वाजता स्वप्नशिल्प पासून बस मधून ५५ जण निघालो.  बस मध्ये मस्त नाश्ता मिळाला.  पॅटीसअळीवाचे घरगुती लाडू ( सरिताजयश्री आणि अंजली गोडबोले यांनी केलेले ) आणि निरूपमाने केलेल्या आल्याच्या वड्या , वेलची केळे असा पोटभर नाश्ता झाल्यावर “क्विक बाईट्स ” ला चहापानासाठी थांबलो.  मुळशी धरणाच्या पाण्याजवळचे हे ठिकाण फारच रमणीयआहे.  

अकराच्या सुमारास रोह्यात पोहोचलो .रोह्याची ग्रामदेवता असलेल्या धावीर  देवस्थानाच्या आवारात पोहोचलो.  अतिशय सुंदर स्वच्छ आणि भव्य परिसर असलेले हे शंकराचे मंदिर फारच छान आहे.  आजूबाजूला फुलझाडं ही बरीच लावलेली आहेत . दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. थोड्यावेळाने रोटरी क्लब ऑफ रोहा याचे प्रेसिडेंट भेटायला आले. त्यांनी देवळाबद्दल छान माहिती दिली. त्या क्लब ने आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.  त्यासाठी आपल्या क्लब ने दहा हजार रुपये देण्याचे ठरवले आहे, असे प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल हिने जाहीर केले. 

नंतर पोह्याची आणि तांदुळाची फॅक्टरी विजिट झाली. सर्व प्रोसेस छान पाहायला मिळाले .नंतर एका मंगल कार्यालयात जेवणाचा कार्यक्रम झाला. खूप सुंदर आणि चविष्ट जेवण मिळाले. मोदक तर खूपच छान होते. पीपी श्रीकांत आणि सरिताने सर्व मेनू ठरविला होता आणि सर्वांना आग्रहाने वाढतही होते. मस्त जेवण झाल्यावर सर्वांना वामकुक्षीची आठवण यायला लागली. जवळ श्रीकांत सरिताचा वाडा होता तिथे त्यांचा पुतण्या आणि त्यांची पत्नी राहतात .त्यांनी खूप मनापासून आमचे स्वागत केले त्यांचीही वास्तू 160 वर्षे जुनी होती. वेळोवेळी वाड्याची दुरुस्ती केल्यामुळे उत्तम अवस्थेत ही वास्तू होती. श्रीकांत चे वडील थोर स्वातंत्र्य सेनानी कै. गजानन काशिनाथ भावे यांचा वाड्याच्या अंगणात सुंदर पुतळा श्रीकांत ने बसविला आहे .आपले रो चंदुकाका गोडसे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. आम्ही सर्वच त्यांच्या थोर कार्यासमोर नतमस्तक झालो. नंतर गरमागरम चहा घेऊन निघण्याच्या तयारीला लागलो.

सर्वांचे आभार  रो डॉ . भारती ने मानले .निघताना रोहा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट ने सर्वांना १-१ किलो पोहे भेट म्हणून दिले.  त्याआधी पोह्याची ऑर्डर सर्वांनी दिलीच होती. असे भरपूर पोहे घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

श्रीकांत सरिता पूर्ण इव्हेंट्स टीम पीपी आनंद जयश्री अशा अनेक जणांनी खूप परिश्रम घेतले म्हणूनच ही ट्रीप खूपच छान आणि निर्विघ्नपणे पार पडली. सर्वांचे मनापासून आभार

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016