Skip to main content
Program Reports

Programs done in Feb 2023

By April 3, 2023May 8th, 2023No Comments

27th February, 2023

मराठी भाषा दिवस

रो सचिन जोगळेकर, पी पी शिरीष क्षीरसागर

दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मराठी भाषा दिनानिमित्त डॉ. वर्षा तोडमल यांचे आपल्या क्लब भाषण आयोजित केले होते. त्यांनी केलेल्या साध्या पण प्रभावी भाषणात त्यांनी भाषेचे महत्त्व प्रकाशम्हणून अधोरेखित केले.त्यांनी उपनिषदांमधून संदर्भ देऊन मराठी भाषेचा इतिहासही सांगितला. संस्कृतमधून मराठी भाषा कशी उदयास आली आणि फारसी आणि उर्दूतील शब्दांचा समावेश करून मराठीचा पुढे कसा विकास झाला हेही विशद करून सांगितले. 

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात कुसुमाग्रज यांच्यासारख्या कवींनी बजावलेली महत्त्वाची भूमिका तसेच प्रेम व्यक्त करण्यात मराठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावते, असेही त्यांनी स्पष्ट केले.आपल्या दैनंदिन जीवनात मराठी वाचनासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, हेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या भाषणाला उपस्थित सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला आणि पसंतीही मिळाली.

Ann प्रतिमा दुरुगकर यांनी अतिथी डॉ  वर्षा यांची ओळख करून दिली आणि  रो. प्रदीप दुरुगकर यांनी आभार प्रदर्शन केले.

7th March, 2023

DG येती घरा....

PP C D Mahajan

दर वर्षी DG visit हा प्रत्येक क्लब साठी महत्वाचा सोहळा असतो. या वर्षी ७ मार्च ( मंगळवार ) 2023 रोजी  हॉटेल अविस्मरा येथे हा आयोजित करण्यात आला होता .   त्या दिवशी धुळवडीचा  सण असल्यामुळे डी.जी  डॉ. अनिल परमार व फर्स्ट lady  रो डॉ हेमलता यांचे स्वागत थोडेसे रंग लावून करण्यात आले.  

ठरलेल्या वेळापत्रकानुसार ठीक 6 वाजता सेक्रेटरी , ट्रेजरर , AG व व प्रेसिडेंट यांच्याबरोबर मीटिंग झाली.त्यानंतर इन्टेरॅक्ट व रोट्रॅक्टर यांच्या बरोबर डीं. जी नी संवाद साधला . क्लबचे झालेले उपक्रम ऐकुन डी.जींना समाधान वाटले.

त्यानंतर strategic planning  संदर्भात P.E डॉ स्मिताताई व P.N. डॉ भारती डोळे  व प्रेसिडेंट यांच्याशी संवाद झाला . यावेळी D.G नी अतिशय मोलाच्या सुचना पुढील वाटचाली करिता दिल्या.  नंतर सर्व डायरेक्टरर्स व committee chairpersons नी आपल्या कामाचा   आढावा सादर केला.आपण केलेल्या सर्व उपक्रमांचे D.G नी कौतुक केले. यानंतर डी.जी , ए .जी . DGND first lady ह्या सर्वांचे स्वागत आपटे मुक – बधीर च्या मुलांनी केलेल्या वस्तु देऊन करण्यात आले.  D.G. visit च्या Special push  चे अनावरण ,  Push committee chairperson  ऍन कल्याणी व त्यांचा टीमच्या उपस्थितीत , D.G.च्या. हस्ते करण्यात आले. 

प्रेसिडेंट डॉ सौ मृणाल नेर्लेकर यांनी आपल्या 8 महिन्यात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती थोडक्यात सांगितली , तसेच आपल्या क्लब ची  वैशिष्ट्ये आपल्या अध्याक्षीय भाषणात अधोरेखित केली. डीजींनी आपल्या भाषणात आपल्या काही उपक्रमांचा आवर्जुन उल्लेख केला . ऍनिमियाचा मिशन शक्ती प्रोजेक्ट , बेबी वॉर्मर   प्रोजेक्ट तसेच    ऍम्ब्युलन्स चा Global Grant  Project ,त्याच बरोबर एकांकिका स्पर्धेचा देखील आवर्जुन उल्लेख केला.

रोटरी फाऊंडेशन चे महत्व,   प्रांत पातळीवर होणाऱ्या कार्याची पद्धत व त्यांचे अनुभवतसेच सर्व उपक्रमात  रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर  चा सहभाग याविषयी देखील D.G  बोलले.

 प्रसिडेंट डॉ मृणाल नेर्लेकर  यांच्या नेतृत्व गुणांचे व सर्व बोर्ड मेम्बरच्या मोलाच्या सहभागाचे  त्यांनी कौतुक केले . कार्यक्रमाच्या शेवटी कापडी पिशवी घरोघरी ह्या synergy उपक्रमाचे  लोकार्पण D.G. D G N.D यांच्या हस्ते झाले.  सर्व सभासरांना क्लबचा लोगो असलेल्या कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.

 ह्मा कार्यक्रमाला RYE ची फ्रान्सहून आलेली विद्यार्थिनी Gabriella चा सत्कार करण्यात आला.

 APF ला 500 व  अधिक डॉलर दिले म्हणून पी पी शरद डोळे व रो. नितीन नाईक   यांना certificate देऊन D.G नी अभिनंदन केले .रो डॉ.भारती डोळे यांनी सुत्रसंचालन केले.  तर PE   डॉ स्मिताताई यांनी आभार मानले.  यानंतर सर्वानी अतिशय लज्जतदार भोजनाचा चा आस्वाद  घेतला.या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुयोग्य नियोजन इव्हेंट टीम , प्रोग्रॅम कमिटी  , व फेलोशिप कमिटी ने केले होते.

ह्या संपूर्ण कार्यक्रमाची क्षणचित्रें  खालील लिंक वर मिळतील :

Facebook Link

 

13th March, 2023

"मनाने वर्तमानात राहण्याची गरज"

ऍन सरिता भावे

आयुष्याचा प्रत्येक  क्षण   आनंददायी होण्यासाठी आपण प्रत्येक क्षणी संपूर्णपणे वर्तमानात राहण्याची आवश्यकता असते.”असे प्रतिपादन आपली   मैत्रिण कौन्सिलर पीपी वृंदा वाळिंबे  हिने  तिच्या   भाषणात केले. 

सोमवार 13 मार्च रोजी आपल्या क्लब मध्ये “माइंड फुलनेस” या विषयावर  ती  बोलत होती  . प्रारंभी रो.  डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी  तिचा  औपचारिक   परिचय  करून  दिला  . लायब्ररीयन्  म्हणून केलेल्या  यशस्वी कारकिर्दी मधून निवृत्त झाल्यावर  वृंदा ने कौन्सिलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले. या क्षेत्राबद्दल भरपूर प्रशिक्षण घेऊन आता  ती पूर्ण वेळ काउंसलर म्हणून कार्यरत आहे. 

माइंड फुलनेस”  म्हणजे ढोबळ मानाने जागरूकता असे म्हणता येईल . पण गरज असते ती प्रत्येक क्षणी आपण जे काय करत असू त्यामध्ये आपण शंभर टक्के सहभागी असण्याची.  वास्तवात मात्र सर्वसाधारणपणे असे आढळते की दर क्षणी आपल्या मनात  विविध विचारांची गर्दी असते.  त्याची जाणीव कदाचित असेल किंवा नसेल पण त्याचा परिणाम होतच असतो आणि आपल्या जागरूकतेत न्यूनत्व येत असते.  आपल्या मनाची जागरूकता वाढवण्यासाठी आपली पाच ज्ञानेन्द्रिये सजगपणे वापरणे , तसेच रोज ध्यानधारणा करणे याचा उपयोग होतो असे  वृंदाने स्पष्ट केले. 

सर्वसाधारणपणे आपल्या जुन्या आठवणी प्रसंग यामध्ये बुडून राहण्याची आपली प्रवृत्ती असते.  मग या आठवणी सुखदायक असोत नाही तर त्रासदायक.  याच्याच बरोबरीने भविष्याची स्वप्ने पाहण्यात रमून जाणं किंवा कल्पनेनेच त्यामधील प्रसंगाची दृश्य डोळ्यासमोर आणण्यातही बरेच जणांचा वेळ जातो. या दोन्ही गोष्टी टाळून जास्तीत जास्त वर्तमानात राहण्याची गरज  तिने आवर्जून सांगितली. 

 शेवटी ऍन नेत्रा वाघ  हिने आभार मानले .

18th March, 2023

क्लब डे

ऍन स्वाती जोशी

दरवर्षीप्रमाणे आपला क्लब डे २५ मार्च रोजी पी वाय सी क्लब मध्ये जोशात पार पडला . “धमाल” ही थीम घेऊन  आपल्या क्लबच्या यशस्वी कलाकारांनी 22 गाणी व एक ग्रुप डान्स सादर केला.  या कार्यक्रमाकरिता पी पी  शिरीष  क्षीरसागर , ऍन  डॉक्टर शिल्पारो नितीन नाईक यांनी खूप मेहनत घेतली. 

 

आर वाय इ मधून आलेल्या गॅब्रिएला हिने तिच्या नृत्य कौशल्याची चुणूक दाखवत कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली. आपल्या अनेक ऍन नि तिला छान साथ दिली . ” बहारो फुल बरसाओ “, शिरीष च्या या वायलीन वादनाने खरंच या संध्याकाळी बहार आणली .  “कोई कहे कहता रहे”  या नितीन नाईक, नितीन अभ्यंकर, राहुल आणि संदीप यांच्या गाण्याने धमाल सुरू झाली.  त्याला मेंबर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  राहुलशिल्पा , नितीन नाईक ,नितीन अभ्यंकरगौरी, मानस , आशिष , संदीपदीपकप्रदीप गोडबोले , अनिरुद्ध , मंजिरी , सीमा यांनी छान छान गाणी निवडून उत्तम सादर केली.  ” जुबी डुबी ” या गौरीच्या गाण्याने नाचायचा मूड निर्माण केला.  रिदम मशीन , सिन्थ , साऊंड इंजिनिअरिंग यांनी अप्रतिम साथ देऊन कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दिली.  या सर्व गाण्यांमध्ये स्मिताताईंचे काव्यवाचन आणि अशोक कांबळे सरांचे कथाकथन हटके आणि सुंदर झाले. श्रीकांत भावे (रोहेकर ) यांच्या कोळीगीताने ही धमाल वरच्याच लेवलला नेली.  ग्रँड फिनाले ग्रुप डान्स मध्ये मंजिरी-दिलीपअजय -अंजली संदीप -वैशालीनितीन – शिल्पा , गुरु – रोहिणी  आणि प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल -आशिष   यांचा सहभाग होता.  यात नंतर अनेक उत्साही मेंबर देखील सामील झाले . अडतिसाव्या  क्लब – डे चे केक कटिंग माजी प्रेसिडेंट यांनी डॉक्टर मृणाल हिच्या समवेत केले.  या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍन कल्याणीने चुटकुले  सांगत उत्तम केले . सर्वांनी प्रोग्राम खूपच एन्जॉय केला.  प्रोग्राम कमिटी, इव्हेंट कमिटी ,फेलोशिप कमिटी , सपोर्ट ग्रुप यांनी चोख कामगिरी केली. स्वादिष्ट जेवण आणि फेलोशिप नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

आपल्या क्लब डे  च्या संपूर्ण कार्यक्रमाची YouTube  लिंक :

27th March, 2023

रोटरीतील गमतीजमती

 रो मंजिरी धामणकर

२७ मे रोजी आपल्या साप्ताहिक सभेत पी डी जी डॉ दीपक शिकारपूरचा ‘रोटरीतील गमतीजमती’ हा खुमासदार कार्यक्रम झाला. वास्तविक थोडेफार मजेदार अनुभव सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात येत असतात, पण ते आठवणीत ठेवून, गुंफून, रंगवून सांगणे ही मात्र कला आहे आणि दीपकला ती चांगलीच अवगत आहे. अगदी कॉलेजमध्ये रोटरॅक्ट क्लबचा सदस्य असताना कॉलेजमध्ये रोटरी ग्रुप एक्स्चेंज मध्ये आलेल्या, प्रथमच अमेरिकेबाहेर पाउल टाकलेल्या अमेरिकन ग्रुपच्या भारताबद्दलच्या कल्पना, त्यामुळे उडालेली धमाल ऐकताना खूपच मजा आली. कहर म्हणजे, नंतर अनेक वर्षांनी दीपक अमेरिकेला गेला असताना त्या ग्रुपचा पत्ता काढून त्यांना भेटला, तेव्हा, ज्या पत्राने धमाल उडवली, ते मूळ पत्र चक्क त्याला मिळालं. ते त्याने कार्यक्रमात वाचून दाखवलं. त्यानंतर रोटरी क्लब शिवाजीनगरचा सदस्य होण्यापासून ते प्रेसिडेंट, आणि पुढे डी जी होण्यापर्यंतच्या प्रवासातील, आणि अर्थातच नंतरचेही मजेदार अनुभव त्याने अगदी  रंगवून सांगितले. ओळख करून देताना निवेदक कशा चुका करतात, एका पोर्टबद्दल बोलताना अचानक एका वक्त्याला आधीच्या वक्त्याचं शुध्द हिंदी भाषण ऐकून हिंदीत बोलायची उर्मी आली आणि त्याला ‘ रोटरी में बंदर बहुत है’, हे बोलायची कशी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी झाली’ यासारख्या अनेक किश्श्यांनी कार्यक्रम रंगला. RI च्या कौंसिल ऑफ लेजिस्लेचर’ वर बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्वांच्या वतीने प्रेसिडेंट डॉ मृणालने दीपकचे अभिनंदन केले.

पी पी. शिरीष क्षीरसागर ने परिचय करून दिला. पी पी. उज्ज्वल मराठे ने आभार मानले.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016