Skip to main content
Project reports

Projects done in September

By September 29, 2022October 3rd, 2022No Comments

7th September , 2022

Youth Avenue : माध्यमिक विद्यालय प्रोजेक्ट

Ann Shobhana Date

तारीख ८ सप्टेंबर “वर्ल्ड लिटरसी डे”  चे औचित्य साधून ७ सप्टेंबरला RCPS  तर्फे माध्यमिक विद्यालय कोथरूडला सहा ग्रीन बोर्ड दिले

शाळेच्या मुलांनी ढोल लेझीमच्या गजरात आपल्या मेंबर्स चे सुंदर स्वागत केले. हॉल समोर सुंदर रांगोळी घालून सर्वांना ओवाळून हॉलमध्ये बसवले.  त्यानंतर सरस्वती पूजन करून सर्व मेंबर्स तर्फे दीप प्रज्वलन केले . आपले उपस्थित मेंबर्स प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल , पीपी अंजली , पीइ डॉक्टर स्मिताताई, रो. अजय गोडबोलेरो. संजीव चौधरीऍन शोभना दाते यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. पीपी अंजली आणि प्रेसिडेंट डॉक्टर मृणाल थोडक्यात पण खूप छान बोलल्या. 

शाळेच्या  मुख्याध्यापिका नीलिमा  कोंढे खूपच उत्साही आहेत.  शेलार सरांनी निवेदन केले आणि आपल्या मेंबर्सच्या हस्ते त्यांच्या स्टाफ चा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींनी दोन सुरेख नृत्य सादर केली.  आपल्या प्रेसिडेंट डॉक्टर मृणालने  देखील त्यात उत्साहाने भाग घेतला.  एकूणच कार्यक्रम खूप छान झाला. 

8 सप्टेंबर 2022

Youth Avenue : Installation at Poona school and home for blind girls

Secretary Pramod Pathak

दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स शाळेतील इंटरॲक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ अध्यक्ष डॉ.मृणाल नेर्लेकर, रो अश्विनी अंबिके, रो माधुरी गोखले,रो वृंदा वाळींबे, रो डॉ. स्मिता जोग, सचिव. प्रमोद पाठक, यांच्या उपस्थितीत व डिस्ट्रिक्ट लिटरसी डायरेक्टर रोटे.ममता कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

शिक्षक दिन आणि जागतिक साक्षरता दिन ह्या दोन्हींचे औचित्य साधून सौ ममता कोल्हटकर यांच्या हस्ते शाळेतील २० शिक्षकांचा गौरवही करण्यात आला.

इंटरॲक्टचे नवनिर्वाचित पदाधिकारी खालील प्रमाणे,

अध्यक्ष. आकांक्षा जोगदंड

 उपाध्यक्ष. पूनम शेळके

 कोषाध्यक्ष. धनश्री पवार

 सचिव. अल्फिया सय्यद

9th September

Service project (Non -Medical) : school upliftment

Ann Alka Abhyankar

The food grains were delivered to Sarthak Seva Sangh.  Thank you PP Nitin Abhyankar, and Ann. Alka for these consistent efforts.

9th September

क्लब पिकनिक

रो. अजय गोडबोले

होणार, नाही होणार, परत होणार, नाही होणार, असं करत करत शेवटी नऊ सप्टेंबर ची क्लब पिकनिक यशस्वीपणे पार पडली. सुरुवातीला जवळपास 50 जणांनी पिकनिकला सहभागी होणार असं कळवलं होतं मात्र काही वैयक्तिक अडचणी यामुळे शेवटी 39 सदस्य या ट्रिप मध्ये सहभागी झाले. सुरुवातीचा आकडा विचार करता एकूण 25 खोल्यांची आवश्यकता होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नऊ सप्टेंबरला उपलब्धता मिळू शकत नव्हती. मात्र नितीन अभ्यंकर च्या सहकार्यामुळे लोणावळ्या मधील हॉटेल मिळाले आणि मग प्रमोद पाठक नेहा व आम्ही दोघं असे जाऊन त्या हॉटेलची रेकी करून आलो. जेवणाचा मेनू एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात किरण, शिल्पा आणि नितीन नाईक यांचा मोलाचा वाटा होता. प्रेसिडेंट डॉ.मृणाल नेर्लेकर च्या मान्यतेनंतर डिटेल ट्रिपचा अजेंडा तयार करण्यात आला. सर्वजण ठरल्या वेळेत नऊ तारखेला हॉटेलला पोहोचले आणि इव्हेंट टीमने सर्वांना प्रेमाने पहिल्या टोप्या घातल्या. नंतर दुपारची फेलोशिप भरपूर गप्पा आणि नंतर जेवण यानंतर सर्व मुला मुलींना पुणेरी वामकुक्षी घेण्याकरता सोडण्यात आलं आणि साडेपाच पासून दुपारचा चहा आणि त्यानंतर संध्याकाळचं दंगायुक्त गेट-टुगेदर करता येण्याचे बजावण्यात आले यात बाउन्सर म्हणून किरण आणि आशिष यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक मुलं वेळेत येतील याची खात्री करून घेतली. संध्याकाळच्या भरगच्च कार्यक्रमाची सुरुवात कराओकेच्या साथीने गाणे कपल डान्स वैयक्तिक आणि ग्रुप डान्स ने झाली. त्यानंतर नितीन आणि शिल्पा नाईक या जोडीने एक कावळेबावळे मावळे असा गमतीशीर खेळ घेतला. यातील विजेत्यांना चार्ली चॅप्लिन, मिस्टर अँड मिसेस युनिव्हर्स उर्फ सेक्रेटरी प्रमोद यांच्या हस्ते भव्य बक्षीस वितरण समारंभ पार पडला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जज माननीय श्री रविकिरण देसाई यांनी परीक्षकाचे काम चोखपणे पार पाडले. ऋजुता आणि भारती यांनी सादर केलेले एक विडंबन सगळ्यांना पोटभर हसवून गेले. स्पिरीच्युअल फेलोशिपचा आस्वाद घेता घेता हाऊसी या खेळाचे सूत्रसंचालन नितीन अभ्यंकर आणि अलका या जोडीने केले. माझ्या आठवणीनुसार पहिल्यांदा जवळजवळ अकरा वाजेपर्यंत सर्व मुलं व मुली मनसोक्त दंगा करत होते. आपल्या क्लब मधला एव्हरग्रीन संजीव यांनी नंतर संगीताच्या तालावर उत्कृष्ट डांस तर केलाच पण त्याचबरोबर जवळपास सर्व मुला मुलींना त्यामध्ये सहभागी व्हायला लावले. आपल्या क्लब मधले सगळ्यात तरुण जोडपे म्हणजे चंदुकाका आणि हेमाताई यांनी सुद्धा यामध्ये उत्साहाने भाग घेतला होता. अत्यंत रुचकर भोजनाने या दिवसाची समाप्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी रवाना झाले. मात्र याच वेळी एक नवीन ट्रिपचे नियोजन करा असा हुकुम मात्र हक्काने प्रत्येकाने दिला. इव्हेंट टीमच्या सदस्यांचे तर कौतुक करावे तेवढे थोडे कारण प्रत्येकाने या ट्रीपच्या यशस्वीपणामध्ये हातभार लावला होता. थँक्यू माय टीम. 

क्लब पिकनिक चे फोटो आणि व्हिडीओ पाहायला खालील लिंक वर क्लिक करा :

https://photos.app.goo.gl/BH3kSfbeSdSGTHzH6

13th September

Youth Avenue : Money Matters

Rtn. Sachin Joglekar

A Programme was conducted for Youth under the Title  “Money Matters”Financial management for Youth in Bharati  Vidyapeeth (Deemed to be University) Homoeopathic Medical College. Pune on 13th Sep.

This Programme was conducted for around 50 P.G students and Interns of the college.

Rtn. Sachin Joglekar conducted this session and explained the basics of  Investment and money management in a very simple way.

Principal Dr Mhetre was present on the occasion & addressed the students. 

President Dr Mrinal Nerlekar presented the work of RCPS and the Purpose of the Programme.

Youth Director Rtn Sanjeev gave a Vote of thanks.

१७ सप्टेंबर

Service project (Medical) : Health Check-up camp at Blind School

ऍन अंजली गाडगीळ

७ सप्टेंबर ला आपल्या क्लबने  “Poona blind school for girls”   गांधींभवन कोथरूड येथे भारत विकास परिषदेच्या मदतीने Hemogram estimation for anaemia आणि blood group estimation साठी कॅम्प आयोजित केला होता. आपण इयत्ता पहिली ते आठवी च्या १०८ मुली  आणि  १७ चतुर्थ कर्मचारी  अश्याचे estimation केले. कॅम्प खूप छान झाला . शाळेतील staff ने सुद्धा त्यांचे estimation करून घेतले. पी इ  डॉ स्मिताताई , ऍन डॉ . वसुंधरा , क्लब सचिव प्रमोद पाठक, ऍन अंजली गाडगीळ उपस्थित होते व जातीने लक्ष घालत होते .  कॅम्प  खूप शांतपणे, शिस्तीत पार पडला.  थत्ते मॅडम आणि तेथील staff ने सर्व सहकार्य केले. तेथे मुलींनी केलेल्या अनेक वस्तू विक्रीसाठी आहेत.  

दीपावलीच्या आधी त्यांचे प्रदर्शन असतें.  सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. चोख, सुंदर नियोजन केल्या बद्दल पीपी ऋजुता, प्रेसिडेंट डॉ. मृणाल या दोघींचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. 

१८ सप्टेंबर

Service Avenue : Environment awareness and PI

२ चाकं , ४३५ दिवस

रो. सचिन जोगळेकर

प्रणाली चिकटे हिनी महाराष्ट्रातील पाणी व पर्यावरण स्वतःच्या नजरेतून पाहण्यासाठी सायकल वरून एकटीनी ४३५ दिवस आणि 17000 km प्रवास केला आहे. 

तिच्या लघुचित्रफितीचे उद्घाटन काल संध्याकाळी  फिल्म अर्काईव्ह थिएटर, प्रभात रोड इथे झाले. 

आपला क्लब या समारंभात सह आयोजक होता. दीपस्तंभ संस्थेचे प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. कलेक्टर श्री भारुड, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी,पर्यावरण तज्ञ विजय परांजपे यांची विशेष उपस्तिथी होती..

प्रेसिडेंट डॉ.मृणाल नेर्लेकर नी सर्व प्रमुख पाहुण्यांचा , प्रणाली आणि तिच्या आई वडिलांचा क्लब तर्फे सत्कार केला. 

लघुपटाचं पहिलं स्क्रिनिंग झालं आणि प्रणाली व लघुपट निर्मिती टीम ची प्रा.महाजन यांनी मुलाखत घेतली. 

रो. सतीश खाडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. 

अतिशय स्फुर्तीदायक आणि रोमांच आणणाऱ्या या कार्यक्रमाला 300 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. सभागृह पूर्ण भरल्यामुळे काही लोकांनी खाली बसून कार्यक्रम पाहिला. 

आपल्या क्लब तर्फे प्रेसिडेंट  डॉ म्रीणाल नेर्लेकर, सेक्रेटरी प्रमोद पाठक, पीपी  गौरी शिकारपूर, स्पॉउस आशिष नेर्लेकर आणि रो. सचिन जोगळेकर उपस्थित होतो.

21st September

International Service and Peace : Release of World Peace day song

PP Dr Pradeep Wagh

Genesis: During Pradeep’s international travel this summer, he went to Germany and USA from India He felt inspired by Mother Nature, wherever he went, to see that She blesses all equally wherever one be in her World. 

This brought forth the following lyrics: 

|| LET PEACE BE ABIDING ||

Let your LOVE reach HORIZON,
WORLD’s a FAMILY!
TEARS of AFFECTION,
Make CLIMATES lovely. || 1||

The WINDS bring tidings,
Streams whispering
Let PEACE be abiding
GREY SKY is crying || 2||

For the CLOUDS in rumbling,
Streaks of LIGHTNING,
NATURE in UNISON,
BLESSETH all dearly. ||3||

YouTube Link Please click on this for the song.
or scan QR Code

 Meanwhile RID 3131 District PEACE Team of Rotary took upon itself a herculean task of celebrating WORLD PEACE DAY on 21 September 2022, in a unique way by inviting ROTARY CLUBS to do some PEACE-related activity that day and send its information to the RID 3131 Peace Team. Clubs from all over the world are participating. As a lyricist and being the  Counsellor of PEACE  of RID 3131, he consulted DG Dr  Anil Parmar . and worked on this idea along with and District Director Peace Smita Vikhankar

 An upcoming reputed BOLLYWOOD and Oriya Film Industry Music Director Mr Priyabrat Panigrahi liked this idea and offered to do a musical version. His professional charges which are usually quite handsome, he generously decided to waive for the cause of PEACE that ROTARY espouses. 

Based on his Music track, some visuals of ROTARY POSITIVE PEACE through SERVICE FOCUS areas were added and the video was presented on behalf of the RID 3131 Peace Team to all on this WORLD PEACE DAY 21 September 2022.

27th September - 28th September

Service Avenue : Medical

President Dr Mrinal Nerlekar

Ear check up was done at Apte Mukabadhir centre in coordination with Bharati Vidyapeeth’s Audiology centre in concessional rates. PE Dr Smita, PP Anajli Ravetkar and President Dr Mrinal Nerlekar were instrumental in this project

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016