होम मेकर्स आणि बरंच काही

समजा , तुम्हाला नोकरी करायला आवडत नाही म्हणून  तुम्ही नोकरी करायचीच नाही असं ठरवलेलं आहे.  पण योगायोगाने सहजपणे नोकरी तुमच्या पुढ्यात आलीच आणि नाकारायला काही सबळ कारण नसेल तर काय होईल?

कदाचित तुम्ही ती स्वीकाराल.  पण तुम्ही काहीशा नाराज असाल. तुमची चिडचिड होऊ शकेल आणि तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही, वगैरे वगैरे. पण आपली एक मैत्रीण अशी आहे की तिने अशा परिस्थितीत वडिलधाऱ्यांचा मान राखलानोकरी स्वीकारली  आणि ती अगदी शांत, स्वच्छ मनाने नोकरीला सामोरी गेली !

आणि काय आश्चर्य!  त्या नोकरीने तिला २८-२९  वर्षे खूप आनंद दिलाप्रेमळ मैत्रिणी दिल्या , आणि मुख्यतः तिला तिची स्वतंत्र ओळख देऊन आयुष्यभरासाठी प्रचंड आत्मविश्वास दिला!  पैसे तर मिळालेच पण नोकरीला सुरुवात करताना पैशाचा हेतु मुख्य नव्हता त्यामुळे बाकीचे मुद्दे अधिक महत्त्वाचे ! असं तिला वाटलं.

लाघवी नेहा

क्लब मेंबर

ही हकीकत आहे आपल्या नेहाची. नेहा पाठकची. नेहा पूर्वाश्रमीची वैशाली मुळे. ती मूळची मुंबईची. घरात एक धाकटा भाऊ आणि आई-वडील अशा सधन चौकोनी कुटुंबातली. तिचं लहानपण खूप मजेत, लाडाकोडात गेलं. एवढंच नाही तर तिचं "लक" असं की थोर वाटणाऱ्या अशा काही लोकांकडून तिला विविध विषयातलं मार्गदर्शनही लाभलं. ख्यातनाम "मार्गारेट विल्सन" यांनी काढलेल्या "सेंट कोलंबा" शाळेत ती शिकली आणि मग हिंदुजा कॉलेजमधून तिने बी. कॉम. ची पदवी मिळवली. कॉमर्सची पदवीधर म्हणजे नोकरी मिळायला भरपूर वाव. पण तिला नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती. तिनं नोकरी करायची नाही असं पक्क ठरवलंच होतं. एवढंच नाही तर लग्नासाठी नवराही नोकरी करण्याची अट न घालणाराच हवा, असं तिने आई-वडिलांना स्वच्छ सांगितलंही होतं. या गोष्टीला तिच्या आई-वडिलांनी विरोध केला नाही. मात्र आई स्वतः खूप उद्योगी असल्याने लहानपणापासूनच तिने नेहाला काही ना काही शिकण्यात ,करण्यात व्यस्त राहण्याची सवय लावली होती . अर्थात नेहाला ही गाणं, ड्रॉईंग ,पेंटिंग इत्यादी गोष्टींची खूप आवड होती. त्यामुळे वयाच्या नऊ-दहा वर्षांपासूनच ती गाणं शिकत होती. तेही मुंबईतल्या प्रसिद्ध व्ही . आर . देवधर स्कूलमध्ये . हे देवधर म्हणजे कुमार गंधर्वांचे गुरु आणि विष्णू दिगंबरांचे (पलुस्कर) शिष्य ! त्यामुळे नेहाला देवधर सरांच्या वाढदिवसाला कुमार गंधर्वांचे गाणे ऐकण्याची संधी बरेच वेळा मिळाली . नेहानेही गाणं शिकण्यात सातत्य ठेवलं. त्यामुळे लग्न ठरेपर्यंत तिने गाण्यातील "विशारद" पदवीही मिळवलेली होती.

नेहाच्या शाळेत शिवणकाम, भरतकाम ,ड्रॉइंग शिकवत. तसेच "बागकाम" ही नियमितपणे शिकवले जाई. तेही नेहाला खूप आवडे. किंबहुना त्यामुळे तिला लहानपणापासूनच बागकामची आवड निर्माण झाली. नेहाचं ड्रॉइंग चांगलं होतं. पण तिला पेंटिंगची जास्त आवड होती . त्यामुळे पेंटिंग शिकायला ती गेली ते थेट प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडे. त्यावेळेला तिने साड्या, बेडशीट्स ,ओढण्या, दारांचे मोठमोठे पडदे अशा बऱ्याच गोष्टी पेंट केल्या.
नेहा म्हणाली," आमची कॉलनी मोठी होती. तिथे गणपतीत , दिवाळीत कार्यक्रम केले जात . लीलाताई भागवत आमच्या कॉलनीतच राहत. त्या वेळोवेळी कार्यक्रम बसवत." त्यात नेहा भाग घेत असे. त्या काळात लीलाताई भागवत मुंबई रेडिओवरच्या "वनिता मंडळ" या महिलांसाठीच्या कार्यक्रमाच्या संचालिका होत्या. त्यावेळी त्या खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत्या. त्यावेळी संगीत "शारदा" नाटकात नेहाने गाणाऱ्या "वल्लरी"ची भूमिका साकारली होती. तसच संगीत शाकुंतल नाटकाच्या गाण्यांना प्ले बॅक दिला होता. असंच त्या काळात प्रसिद्ध असलेल्या सिंधु डोक्रस यांच्याकडे नेहाने "पर्सनल चार्म" हा चार महिन्यांचा मेकअप वगैरे बाबतचा कोर्सही केला होता.

ही हकीकत आहे आपल्या नेहाची. नेहा पाठकची.  नेहा पूर्वाश्रमीची वैशाली मुळे.  ती मूळची मुंबईची.  घरात एक धाकटा भाऊ आणि आई-वडील अशा सधन चौकोनी कुटुंबातली. तिचं लहानपण खूप मजेत, लाडाकोडात गेलं.  एवढंच नाही तर तिचं “लक” असं की थोर वाटणाऱ्या अशा काही लोकांकडून तिला विविध विषयातलं मार्गदर्शनही लाभलं. ख्यातनाम “मार्गारेट विल्सन” यांनी काढलेल्या “सेंट कोलंबा”  शाळेत ती शिकली आणि मग हिंदुजा कॉलेजमधून तिने बी.  कॉम. ची पदवी मिळवली. कॉमर्सची पदवीधर म्हणजे नोकरी मिळायला भरपूर वाव.  पण तिला नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती. तिनं नोकरी करायची नाही असं पक्क ठरवलंच  होतं. एवढंच नाही तर लग्नासाठी नवराही नोकरी करण्याची अट न घालणाराच हवाअसं तिने आई-वडिलांना स्वच्छ सांगितलंही होतं.  या गोष्टीला तिच्या आई-वडिलांनी विरोध केला नाही.  मात्र आई स्वतः खूप उद्योगी असल्याने लहानपणापासूनच तिने नेहाला काही ना काही शिकण्यात ,करण्यात व्यस्त राहण्याची सवय लावली होती . अर्थात नेहाला ही गाणं, ड्रॉईंग ,पेंटिंग इत्यादी गोष्टींची खूप आवड होती. त्यामुळे वयाच्या नऊ-दहा वर्षांपासूनच ती गाणं शिकत होती.  तेही मुंबईतल्या प्रसिद्ध व्ही . आर . देवधर स्कूलमध्ये . हे देवधर म्हणजे कुमार गंधर्वांचे गुरु आणि विष्णू दिगंबरांचे (पलुस्कर) शिष्य ! त्यामुळे नेहाला देवधर सरांच्या वाढदिवसाला कुमार गंधर्वांचे गाणे ऐकण्याची संधी बरेच वेळा मिळाली . नेहानेही गाणं शिकण्यात सातत्य ठेवलं.  त्यामुळे लग्न ठरेपर्यंत तिने गाण्यातील “विशारद” पदवीही मिळवलेली होती

नेहाच्या शाळेत शिवणकाम, भरतकाम ,ड्रॉइंग शिकवत.  तसेच “बागकाम” ही नियमितपणे शिकवले जाई.  तेही नेहाला खूप आवडे. किंबहुना त्यामुळे तिला लहानपणापासूनच बागकामची आवड निर्माण झाली. नेहाचं ड्रॉइंग चांगलं होतं.  पण तिला पेंटिंगची जास्त आवड होती . त्यामुळे पेंटिंग शिकायला ती गेली ते थेट प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडे. त्यावेळेला तिने साड्या, बेडशीट्स ,ओढण्या, दारांचे मोठमोठे पडदे अशा बऱ्याच गोष्टी पेंट केल्या.

नेहा म्हणाली,” आमची कॉलनी मोठी होती.  तिथे गणपतीत , दिवाळीत कार्यक्रम केले जात . लीलाताई भागवत आमच्या कॉलनीतच राहत.  त्या वेळोवेळी कार्यक्रम बसवत.”  त्यात नेहा भाग घेत असे.  त्या काळात लीलाताई भागवत मुंबई रेडिओवरच्या “वनिता मंडळ”  या महिलांसाठीच्या कार्यक्रमाच्या संचालिका होत्या.  त्यावेळी त्या खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत्या. त्यावेळी संगीत “शारदा”  नाटकात नेहाने गाणाऱ्या “वल्लरी”ची भूमिका साकारली होती. तसच संगीत शाकुंतल नाटकाच्या गाण्यांना प्ले बॅक दिला होता. असंच त्या काळात प्रसिद्ध असलेल्या सिंधु डोक्रस यांच्याकडे नेहाने “पर्सनल चार्म” हा चार महिन्यांचा मेकअप वगैरे बाबतचा कोर्सही केला होता.

बी. कॉम.  ची पदवी घेतल्यानंतर लगेचच नेहाचं लग्न ठरलं आणि लग्न करून ती पुण्यात आली. घरात प्रमोद , ती आणि सासू-सासरे अशी इन मिन चार माणसं.  सासू-सासरे दोघेही ऍक्टिव्ह आणि खूप प्रेमळ. नेहा म्हणते, “त्या दोघांनी मला आपल्या मुलीप्रमाणे खरोखरच सदैव प्रेम दिलं.” त्यामुळे पुण्यात नव्याने आलेल्या नेहाला सोपं गेलं. ती म्हणाली, ” पुण्यात माझे माहेरचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि ओळखीही नव्हत्या. सासरे बँकेत होते.  खूप जिनियस.  सदैव उद्योगात असत.  बँकेत फार थोड्या काळात त्यांनी वरची पदे मिळवली होती.” 

नेहा बी. कॉम.  होतीच.  त्यामुळे ते तिला म्हणाले की ” घरात नुसतं बसून काय करणारबँकेची परीक्षा तर देऊन ठेव पुढचं पुढे.”  तेव्हा नेहा प्रेग्नेंट होती.  पण तिने परीक्षा देऊन टाकली. पण योग असा की तिला बँकेकडून परीक्षेच्या निकालाबाबत काहीही कळवण्यात आलं नाही. दरम्यान प्राचीचा जन्म झाला आणि नेहा प्राचीचं करण्यात गुंतून गेली. अर्थात घरात सासू-सासरे नेहाला संपूर्णतः मदत करत.  प्राची दोन वर्षांची झाली आणि अचानक कॉसमॉस बँकेकडून नेहाला परीक्षेतील निकालानुसार “कॉल” देण्यात आला आणि नोकरी चालून आली.

घरात नेहाला सासू-सासरे आई-वडिलांप्रमाणेच प्रेम देत होते. ते म्हणाले, ” मुलीची काळजी तू करू नकोस. आम्ही तिचा सर्व बघू.  पण तू आलेली संधी सोडू नकोस. बँकेची नोकरी करून तर पहा.  नाही आवडलं तर सोडून दे.”  नेहा म्हणाली  की, ” सासऱ्यांना मनापासून वाटे की मी स्वतःच्या पायावर उभे असावं.  मला स्वतःची स्वतंत्र ओळख असावी. मी आत्मविश्वासाने सर्वत्र वावरावं. म्हणून ते सदैव प्रोत्साहन देत. त्याला अनुसरूनच ते मला बँकेची नोकरी करून बघ , असं म्हणत होते.  घरातल्या कामाची किंवा प्राचीची काळजी करण्याचं मला काहीच कारण नव्हतं कारण ते दोघेही नेहमीच माझ्या पाठीशी होतेप्रमोदचं ही मला सदैव सहकार्य होतं.  त्यामुळे घरातून मला काहीच अडचण नव्हती.  त्यामुळे मी कॉसमॉस ची नोकरी स्वीकारायचे ठरवली.”

आणि आज ? मागे वळून पाहताना त्या निर्णयाचे महत्त्व नेहाला फार फार पटतं. ती म्हणाली , “गेल्या २८ वर्षात या नोकरीने मला आनंदच दिला.  नोकरीत कधीच काही अडचण आली नाही किंवा कटू प्रसंगही आले नाहीत. बँकेच्या वेगवेगळ्या शाखेत माझ्या बदल्या झाल्या.  पण सगळीकडे खूप छानच अनुभव आला.  सगळीकडे मला अक्षरशः प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या.  कामातही माझी प्रगती होत गेली . आपोआपच माझा आत्मविश्वास वाढत गेला.”

बँकेचंविद्यापीठ रस्त्यावर जे मुख्य ऑफिस आता उभारलं गेलं गेलंय तिथल्या ब्रँचची संपूर्ण जबाबदारी ज्या पाच जणांवर टाकण्यात आली होती त्यामध्ये नेहाचा समावेश होता.  ती म्हणाली , ” ऑफिसचं  बांधकाम होण्यापूर्वी आम्ही एका अगदी छोट्या खोलीत कामकाज सुरू केलं होतं.  आम्ही त्या भागातल्या नागरिकांना घरोघर जाऊन भेटत होतो. आणि बँकेची सेवा त्यांना उपलब्ध करून देत होतो. त्या काळात मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मनापासून बँकेची घरपोच सेवा दिली आणि त्यांचा विश्वास कमावला.”  नेहाच्या सर्व प्रामाणिक कष्टांची बँकेने नेहमीच दखल घेतल्याचही तिने यावेळी नमूद केलं.

 गेल्या चार पाच वर्षांपूर्वी मात्र सासू -सासर्‍यांची वयामुळे काही आजारपणं सुरू झाली.  तेव्हा सुद्धा नेहाला घराला जवळ अशा शाखेत बदली देण्यात आली. त्यामुळे सासु सासऱ्यांचं करण्यात नेहाला अडचण आली नाही. मात्र २०१६ मध्ये सासरे गेले आणि २०१९ मध्ये सासूबाई गेल्या. त्यानंतर घरात नेहाला चैन पडत नसे

त्यातच गेल्यावर्षी नेहाला कोविड झाला. त्याने तिला चांगलाच त्रास झाला. डॉक्टरांनी चार महिने घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुन्हा “चिकन गुनिया” झाला. तेव्हा नेहाने सरळ वर्षभराची रजा घेतली. ती म्हणाली, ” असंही पुढच्या महिन्यात माझी नोकरी संपणारच आहे. मी रिटायर होत आहे.  त्यामुळे या शेवटच्या वर्षात मला रजा मिळायला काही अडचण नव्हतीच.”  आता रिटायर झाल्यावर नेहाला आपल्या रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य करण्याची इच्छा आहे.  तसेच मधल्या काळात तिचं गाणं थांबलय  तेही तिला पुन्हा वाढवायच आहे. तिने लग्नानंतर पुण्यात आल्यावर इथे प्रसिद्ध गायिका मीरा पणशीकर यांच्याकडे शिक्षण घेतलं होतं.  आता पुन्हा तिने रियाज आला प्रारंभ केला आहे. याशिवाय तिचं पेंटिंग ,प्रवास ,वाचन या साऱ्याला तिला मनसोक्त वेळ देण्याची आता इच्छा आहे.  तिला कादंबरी हा प्रकार फार आवडतो. ते वाचनही तिने सुरू केलं आहे.  लहानपणापासूनच प्रेमळ ,शांत ,अजिबात हट्ट न करणाऱ्या ,दुसऱ्याला त्रास न देणाऱ्या नेहाला स्वतःलाही आयुष्यभर सगळीकडे खूप चांगली माणसं भेटत गेली.  त्याचा तिला खूप आनंद आहे.  मात्र तिच्या आईला   शिवण , स्वयंपाक यासह अनेक गोष्टी अतिशय उत्तम अवगत होत्या.  त्या तिच्याकडून आपण पुरेशा शिकून घेतल्या नाही असं तिला आता वाटतं. पण आई-वडिलांना मात्र नेहाच्या सर्वांगीण प्रगतीने खूप आनंद दिला आहे.

ऍन सरिता भावे