Skip to main content

संगीतानुभव

ऍन सीमा महाजन

ज्या काळात मराठी रसिकांना बालगंधर्व ,छोटा गंधर्व ,दिनानाथ  मंगेशकर या दिग्गजांचा नाट्यसंगीत ऐकण्याची सवय होती त्या काळात मराठीतील उत्तम कवितांना कोणालाही सहज गाता याव्यात गुणगुणता याव्यात अशा चाली लावून जाहीर कार्यक्रम करणे आणि याचा पायंडा पडणे हे सोपे नव्हते. हे करणारे आणि त्यामुळे भाव संगीताचे  सम्राट ठरलेले गजानन वाटवे उर्फ अण्णा हे प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत ठरले.

संगीताची जबरदस्त ओढ असल्याने ते आपले जन्मगाव सोडून पुण्यात आले. पुण्याच्या गोपाल गायन समाजामध्ये संगीताचे चार वर्षे वर्ष शास्त्रीय शिक्षण घेतलं आणि वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी काव्य गायनाला सुरुवात केली. त्यांनी कवी माधव जुलियन यांच्या “आई” या गाण्यामुळे ते प्रसिद्ध झाले तर वारा फोफावला  हे गाणे मराठी रसिकांना विशेष भावले. ते भावसंगीताचे नवयुग निर्माते ठरले.

अण्णांचे अतिशय प्रसिद्ध भावगीत “फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे” या गीताबद्दल आज आपण थोडी माहिती घेऊयात .हे गाणे मराठी रसिकांना जेवढे आवडले त्याच्याहून जास्त हिंदी संगीतकारांना ते भावले.

त्याच्यावर हिंदी गाणे बसवू का असे प्रख्यात संगीतकार शंकर जयकिशन यांनी त्यांना विचारले अण्णांचा या संगीत द्वयी बरोबर मैत्री होती. त्यांनी लगेचच होकार दिला आणि त्यानंतर एक सुंदर अजरामर गीत जन्माला आलं.

चित्रपट चोरी चोरी, गीत ,पंछी बनू उडती फिरू. असाच त्यांचा स्नेह एन. दत्ता यांच्याबरोबर होता .त्यांनाही हेच गाणं हिंदीत आणावस वाटलं आणि असंच एक सुंदर गीत निर्माण झालं. चित्रपट, धूल का फूल गीत ,झुकती घटा गाती हवा. आपण या तीनही  गाण्यांचा आनंद घेऊयात आणि अण्णांच्या भावगीत गायनाला सलाम करूयात.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016