Diversity and Inclusion
आपले संतजन “शब्देविण संवादु ” म्हणाले तरी आपल्या सारख्या सर्वसामान्यांना भाषा हे संवाद साधण्याचे , एकमेकांशी जोडण्याचे , आपलेसे करण्याचे माध्यम आहे . ह्या वर्षी रोटरी इंटरनॅशनल “Diversity, Equity, and Inclusion” ह्या संकल्पनेला कटिबद्ध आहे.
ह्या वर आधारित आम्ही “Diversity and Inclusion- अर्थात भाषा भगिनी ” हे दृकश्राव्य सदर घेऊन येत आहोत . आपल्या क्लब मधील मेंबर्स, Anns आणि, Annets हयांच्या सहयोगाने आपण विविध भाषांचा आस्वाद घेणार आहोत.
ह्या वेळी पाहूया “पोर्तुगीज” भाषेचा लहेजा …
पोर्तुगीज – ही पोर्तुगाल देशाची भाषा !!
जरी फक्त ५% पोर्तुगीज बोलणारे लोक हे पोर्तुगाल मध्ये राहत असले तरी , आज जगभरात प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या भाषेत ही “सहाव्या” क्रमांवर आहे . स्पॅनिश भाषेशी खूपच मिळती जुळती ही भाषा .
पाहूया ह्या भाषेची झलक आपल्या क्लबच्या Annette – सौमित्र महाजन बरोबर !!