Skip to main content

4th September, 2023

Teachers Award

Rtn. Sachin Joglekar

All teachers from our club who were present for the meeting were felicitated on the occasion of Teacher’s Day. We felicitated two Gurus and presented them with a memento. Ms. Vidya Ghugari (30 years of experience in the Social Development sector) & Ms. Suchitra Date (Bharatanatyam Danseuse trained under the Gurukul system & has completed Visharad and Arangetram)
Ms. Vidya Ghugari has done M.Phil. in Education (Interdisciplinary), Masters in Social Work, Post Graduate Diploma in Communication Media for Children, Graduation in B.HSC. (Home Science – child development). She has more than 30 years of experience in the Social Development sector especially in family and child development. Currently she is working as an independent consultant in Early Childhood and Primary Education. She also has many research study assignments to her credit.  She has also held various positions as Programme Manager (Training) at Centre for Learning Resources, Programme Coordinator at Door Step School, Pune, Programme Officer, CASP PLAN project, Training Officer, Chaitanaya, Rajgurunagar.
She also has many publications to her credit. Film – activity based early childhood education programme, editing assistance – ‘Shikshan mulanche Shabhag sarvancha’, Article in Maitrichya palikade –a magazine published by Vidarthi Sahayak Samiti, Stories for children written in Nirmal Ranwara, published by Vanchit Vikas, Monthly flyers for Anganwadi workers, Workbook for primary school children on emergent literacy & Theme based Manual for teachers. She showed a short film of her work.

 Ms. Suchitra Date, established “Nrityaprerana”, School for Bharatnatyam in 1984 and is a full-fledged institution since 1987. She is trained in Bharatnatyam under the able guidance of famous Guru Krishna A. Mani. He was trained under great gurus Laxmikantam, and Guru Kittappa Pillai, son of Thanjavoor Quartret Guru Ponnaiah Pillai. An established Bharatnatyam Danseuse, she been a National TV Bharatnatyam artist. She has choreographed and performed with over 70 students in dance drama/ballets like Kunti–Ek-Katha, Deepshikha, Nritya Ramayan, Samudramanthan, & most recently Shaktidaatri – Daughters of the Soil. Each one of these have been widely acclaimed. Over 120 students have performed Arangetram under her able guidance at Nrityaprerana. She has been invited and performed at famous NATYANJALI Dance festival performing at Thiruvayoor, Kumbakonam, Brihadeeshwara and many more temples. Ms. Date also uses Nritya (Bharatnatyam Dance) as Therapy for various illnesses like Equinus deformity, Parkinson affected, senior citizens, special children, autism, polio affected blind, deaf and hard of hearing, diabetics, arthritis, etc. at UNESCO’s world Dance therapists meet in Athens and in several cities of Germany. She conducted a small demo for all present which was greatly appreciated by everyone. Our member’s enthusiasm & participation was impeccable. Two of her students presented a small but graceful Bharatnatyam performance.
Kalyani did a wonderful job of anchoring. In the end, Rtn Sachin Joglekar proposed vote of thanks.

10th September, 2023

Birthday fellowship at Tamhini

Ann Pratima Durugkar

10 सप्टेंबर ची ताम्हिणी नेचर ट्रेल सप्टेंबरमधील आउटडोर वीकली मीटिंग होती. डॉक्टर राव यांनी सुचविल्याप्रमाणे प्रोग्रॅम कमिटीने हा ट्रेल पावसाळ्यात ठरविला. श्रावणातील ती रम्य सकाळ होती. गाडी सुरू होताच भूक भूक करणाऱ्या सर्वांना मॉनिटर ने शेंगदाणा चिक्कीचे बार देऊन तोंड बंद करण्याचा निरर्थक प्रयत्न केला. थोड्या गप्पा होताहेत तोपर्यंत ब्रेकफास्टचे ठिकाण आले. हिरव्यागार निसर्गात छोटेसे रेस्टॉरंट. मग काय सर्वांनी गरम गरम पोहे, खुसखुशीत अळूवडी, चहा, कॉफी यावर ताव मारला. जयश्रीने शिऱ्याची मूद पाडून केक करण्यास सांगितले वर काजू चे डेकोरेशन. हा अभिनव भारतीय केक जयश्री व रमेश भाटिया यांनी कापून सप्टेंबर बर्थडे एनिवर्सरी साजरी केली. गाडी पुढे निघाली. आता ती प्रथम मुळशी व नंतर ताम्हिणी घाटात मार्गक्रमण करणार होती. सोबत श्री भानुदास हे एक्सपर्ट होते. वाटेत निसर्गाचे मनोहारी रूप दिसत होते. हिरवीगार धरती सह्याद्रीचे उंच काळे कभिन्न सुळके, रौद्र दर्या सारेच विलोभनीय होते. देवकुंड येथे चार खोल दर्यांनी प्लस आकार घेतला होता. रौद्र भीषण रूप होते ते. वाटेत मॉनिटर ने कांदा व बटाटा भजी आणली. पुढे देवराई लागली. पाऊस सुरू झाला देवराईचे स्वरूप श्री भानुदास यांनी सांगितले. तेथील पिवळा रातांबा, रामबिबा, साजेरी ( हे शेकरूचे आवडते खाद्य आहे) ही झाडे दाखविली. देवराई म्हणजे देवाचे जंगल तेथील काही फळे पाने रोपे बाहेर आणत नाहीत व बाहेरचे आत नेत नाहीत अशा असंख्य देवराया कोकणात तसेच महाराष्ट्रात आहेत. भारतात इतरत्रही दिसतात. या धार्मिक भावनेने निसर्गाचे रूप जसेच्या तसे जतन केले आहे. अनेक नाश होत चाललेल्या species जपल्या आहेत.
       सप्तपर्णी (सात विंग) हे प्रचंड झाड बघून तर सर्वांना फार आश्चर्य वाटले. पुढे ताम्हिणी घाट लागला. या भागात खूप आत आम्ही गेलो. रिसॉर्ट अगदी निसर्गात होते. तेथे श्री भानुदास यांनी छोटासा नेचर ट्रेल घेतला. प्रचंड मोठी रानकेळी, कावळा भाजी, कुरडू भाजी, भारंगी भाजी या रानभाज्या दाखविल्या. भूर भूर पावसात तेथे फिरायला खूप मजा आली. डॅम वर जाऊन तेथे थोडा वेळ मजेत गप्पा टप्पा झाल्या. नंतर उत्कृष्ट जेवण आले. गरम गरम तांदळाची भाकरी. खमंग पिठले, ठेचा, भारंगी व कुर्डू या रानभाज्या, भात, आमटी, तांदळाची खीर व प्रेसिडेंट स्मिताताईंनी आणलेली सोलापुरी शेंगदाणा चटणी यावर सर्वांनी ताव मारला. बाहेर पाऊस कोसळत होता, झोपडीत बसून तो पहात जेवण म्हणजे वेगळाच आनंद. यानंतर परतीच्या प्रवासात सात वर्षांनी फुलणारी कारवी पाहिली. निसर्ग शोभा बघत बघत आणि ताम्हणी घाटाला बाय-बाय करत गाडी पुण्याला आली. निसर्गात एक दिवस मजेत घालून सर्व ताजेतवाने झाले होते. आता पुढची ट्रिप कुठे याची चर्चा करतच सर्वजण घराकडे परतले.

15th September, 2023

एकांकिका स्पर्धेची धामधूम

रो अश्विनी अंबिके, डिस्ट्रिक्ट एकांकिका कनव्हेनर

सणाची, उत्सवाची जशी धामधूम असते, अगदी तशीच एकांकिका स्पर्धेची धामधूम सुरु आहे. मंगळवार 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत आपण 14 एकांकिकांचा आस्वाद घेणार आहोत आणि मग एक दिवस भारत पाकिस्तान match मध्ये पाकिस्तान चा फडशा पाडून 15 ऑक्टोबर ला पुन्हा ताजेतवाने होऊन बक्षीस समारंभाचा सोहळा आयोजित करणार आहोत. म्हणजेच 14 ऑक्टोबर ला सुट्टी आहे. एकांकिका महोत्सवाचे वेळापत्रक whsspp वर आम्ही पाठवूच. त्याची तयारी सुरु आहे.
10 ऑक्टोबर ला स्पर्धेचे उदघाट्न आणि 2 एकांकिका बघायला मिळतील.नेहमी प्रमाणे opening बॅट्समन RCP शिवाजीनगर आहे. त्यानंतर 11 / 12 आणि 13 तारखांना 4/4 एकांकिका होतील आणि स्पर्धा संपेल. निकाल त्याच दिवशी लागतील आणि 15 तारखेला दुपारी 1 ते 4 या वेळात बक्षीस समारंभ होईल.
सन्माननीय अभिनेते, लेखक, नाटककार *हृषीकेश जोशी* यावर्षी आपल्याला Guest of Honour म्हणून लाभले आहेत. तसेच DGN संतोष मराठे मुख्य अतिथी असतील.
सर्व संघांना एकांकिका स्पर्धेसाठी शुभेच्छा…!

स्पर्धेच्या जय्यत तयारी साठी RCPS ची फौज सज्ज आहे. Events Team, सपोर्ट ग्रुप, एकांकिका टीम याशिवाय उत्स्फूर्त पणे अनेकांनी प्रतिनिधित्व करण्याची इच्छा दर्शवली आहे..
बाकी कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहेतच…!
सर्व सहभागी संघान्ना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि नटराजाला वंदन

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016